हिंदु फोबियावर प्रस्ताव पास करणारे जाॅर्जिया -अमेरिका देशातील प्रथम राज्य – America Hindu phobia latest news in Marathi
अमेरिका ह्या देशातील जाॅर्जिया राज्यातील विधानसभेकडुन समितीकडुन नुकताच एक महत्त्वाचा ठराव पास करण्यात आला आहे.ज्यात हिंदु फोबियावर म्हणजे हिंदु कट्टरते विरोधी टिका करण्यात आली आहे.
असे करून अमेरिका देशातील जाॅर्जिया हे राज्य हिंदु धर्म अणि हिंदु फोबिया विरोधात पाऊल उचलणारे अमेरिका ह्या देशातील पहिले राज्य देखील बनले आहे.
म्हणजेच हिंदु भय अणि हिंदुविरोधी कटटरतेचा जाहीर निषेध ह्या ठरावातुन केला गेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की अमेरिकेतील जाॅर्जिया हे राज्य अमेरिका देशामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आठवे राज्य म्हणुन ओळखले जाते.ह्या अमेरिकेतील जाॅर्जिया राज्यामध्ये सर्वाधिक हिंदु अणि अमेरिकन हिंदु समुदाय वास्तव्यास असल्याचे देखील सांगितले जाते.
जाॅर्जिया राज्या मध्ये एका समितीत अमेरिका ह्या देशातील फोरसिथ काऊंटीचे प्रतिनिधी असणारया टाॅड जाॅनस अणि लाॅरेंस मॅकडोनाल्ड या दोघा व्यक्तींनी हा ठराव मांडल्याचे न्युज चॅनलवर सांगितले जात आहे.
काय दिले आहे ह्या मांडलेल्या ठरावामध्ये?
ठरावात दिलेल्या अमेरिकन हिंदु समुदायाविषयी चांगल्या बाबी –
ह्या ठरावामध्ये हिंदुधर्म अणि हिंदु फोबिया यांच्या कट्टरते विरोधी निंदा करताना असे म्हटले गेले आहे की हिंदु धर्म हा जगातील सर्वात जुना अणि मोठा धर्म आहे.
- हिंदु धर्माचे संपुर्ण जगात शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये कोट्यवधी अनुयायी आहेत.हिंदु धर्मामधील लोकांमध्ये एकमेकांप्रती शांती अणि सन्मानाची भावना देखील आहे.यामुळे आजपर्यंत हा हिंदू समुदाय अमेरिकेतील जाॅर्जिया मध्ये गुण्यागोविंदाने राहत आहे.
- असे सांगितले गेले आहे आहे की अमेरिकेतील लोकांना हे मान्य आहे की जो अमेरिका देशात वास्तव्यास असलेला हिंदु समुदाय तसेच गट आहे ह्याने अमेरिका देशातील विविध क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान आजपर्यंत दिले आहे.
- ज्यात माहीती तंत्रज्ञान,विज्ञान,वैद्यक,अभियांत्रिकी,शिक्षण, वित्त, व्यापार उद्योग,आयुवेर्द,योग,ध्यानसाधना,अन्न,संगीत कलाअशा इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश होतो.
- अमेरिका देशातील राहत असलेल्या हिंदु समुदायामुळे, गटामुळे अमेरिका ह्या देशातील सांस्कृतिक जडणघडण देखील समृद्ध होण्यास हातभार प्राप्त झालेला आहे.ज्यामुळे आतापर्यंत येथील लाखो लोकांचे कल्याण देखील झाले आहे.
- काय म्हणाले अमेरिकन हिंदु समुदायातील लोक
- अमेरिकन हिंदु समुदायातील लोकांनी प्रस्तावात अमेरिकन हिंदु समुदाया बाबद नमुद केलेल्या बाबींसाठी आनंद व्यक्त केला आहे.