बैलपोळा कोटस संदेश अणि शुभेच्छा Bail pola quotes sms and wishes in Marathi

बैलपोळा कोटस संदेश अणि शुभेच्छा Bail pola quotes sms and wishes in Marathi

आज पुज रे बैलाले
फेड उपकाराच देण
बैला खरा तुझा सण
शेतकरया तुझे त्रण

बैलपोळयाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

बैल पोळयाचा आला या सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे राबतो तु दिवसरात्र शेतात
सांग कसे फेडावे आम्ही तुझे त्रण

बैल पोळयाच्या आपणास अणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बैलपोळा
कराया सण साजरा गाव
झालया गोळा सर्जा राजाला घेऊ
अणि जाऊ सर्व देऊळा

बैल पोळयाच्या तुम्हाला माझ्याकडुन अणि माझ्या परिवाराकडुन हार्दिक शुभेच्छा

जसे दिव्याशिवाय वातीला
वातीविना दिव्याला काहीच महत्व नसते
तसे कष्टाविना मातीस
अणि बैलाविना शेतीस काहीच महत्व नसते

बैल पोळयाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

सण आला सर्जा राजाचा
त्रण त्याचे कपाळी आपल्या
सण आला गावाच्या मातीचा

बैल पोळा सणाच्या आपणास मनपुर्वक शुभेच्छा

आज बैलाले खावाले द्या खुराक
करा नैवैद्य दाखवाया बैलाले
पुरनाण्या पोळया
खाऊ द्या पोटभर
होऊ दे मगदुल

कृषी प्रधान संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचा सण उत्सव बैल पोळयाच्या आपणास अणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

चला शिंगे घासुया
बैलाला बाशिंगे बांधुया
मंडुळी बांधुया तोडे चढवुया
मोरकी आवळुन कासरा ओढुया
घुंगराच्या माळा वाजती खळखळा
आला या सण बैलपोळा

बैलपोळा विशेष संदेश –

नाही दिली जरी पुरण पोळी
तरी करणार नाही मनात
कुठलाही राग
वचन द्या मालक कत्तलखाण्यात विकुन
करणार नाही माझा त्याग

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्या जनावरांना देखील भावना असतात आपण त्यांची काळजी घ्यायला हवी,निगा राखायला हवी,त्यांची अमानुषपणे हत्या करू नये हे सांगणारा पवित्र सण बैल पोळयाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा

नाही लावणार कधी बळीराजा
आपल्या गळयाला फास
दे असे आज वचन आम्हास
बैल पोळयाच्या शुभ सणास

See also  बिहार बोर्ड १०वी टॉपर लिस्ट २०२३ | Bihar Board 10th Topper List 2023 PDF In Marathi, PDF DOWNLOAD

भारतीय कृषी संस्कृतीचा महापर्व म्हणुन ओळखल्या जाणारया बैल पोळा सणाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

कष्ट हवे या मातीला
म्हणुन जपुया सारे
मिळुन पशुधनाला

जगाचा पोशिंदा असणारया माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या मनपुर्वक शुभेच्छा

आज तुझ्याचमुळे आहे
आमच्या शेतीस हिरवाई
कर आज विश्रांती करू दे
आम्हास तुझ्यासाठी सर्वकाही
तुझ्याच अपार कष्टामुळे
बहरत आहे आज ही भुई सारी

शेतकरी बांधवांचा मित्र सर्जा राजाचा सण
बैल पोळयाच्या पवित्र सणाच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शेती शिवार अणि आहे
सर्व वाडविलांची पुण्याई
किती वर्णावे गुण तुझे
मन अक्षरश मोहरून जाई
तुझ्याच अनंत कष्टामुळे
बहरू राहिली ही भुई सारी
एक दिवस पुजुन तुला
कसे होणार आम्ही तुझे उतराई

वर्षभर आपल्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र शेतात राबणारया सर्जा राजाचा पुजनाचा आभार व्यक्त करण्याचा दिवस बैल पोळयाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

वर्षभर शेतात राबणारया तुझ्या देहास
आज भरपुर विश्रांती मिळु दे
तुझ्याच घामामुळे फुललेल्या
ह्या पिकास तुझ्या डोळी सजु दे

बैल पोळा सणाच्या खुप खुप शुभेच्छा

वर्षभर राबुन करीतो तो
रात्रंदिन ह्या धरणीमायेची सेवा
आजच्या दिनी थोडीशी विश्रांती
देऊन त्याला राखु त्याचे उपकाराचा ठेवा

धरणीमायेच्या ह्या सेवकाचा सण बैल पोळयाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

झुले,शेंब्या,तिफन,घुंगर,
शेती अवजारांचा आज थाट
औताला आज आहे सुटटी
सर्वत्र सर्जा राजा आनंदात

बैल पोळयाच्या पावन सणाच्या आपल्या अणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा

आपण मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवायला हवी ही अनमोल शिकवण सर्व जगाला देणारया बैल पोळा सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बघा
बैलपोळयाचा सण
सर्जा राजाच्या कौतुक
सोहळयाचा क्षण

हँपी बैल पोळा

आला या बघा बैलपोळयाचा
पावन सण जुंपणार नाही
कोणी बैलाला आज त्यास
सजवून आणतील गावभर फिरवून

See also  महाराष्ट्र राज्या विषयी जाणुन घ्यायची काही रोचक तथ्ये Amazing facts about Maharashtra state in Marathi

बैल पोळयाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

शेतकरींसोबत दिवसरात्र शेतात राबुन पिक फुलवणारया सर्जा राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण बैल पोळयाच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

नाही राहणार बैलाला
कुठलेही काम खाऊन मस्त
पुरणपोळीचे जेवण करीन तो आराम

बैल पोळयाच्या सर्व शेतकरी बंधुंना हार्दिक शुभेच्छा