इंग्रजी शिकण्यासाठी काही सोप्या टीप्स तसेच ट्रिक्स – Best tips and tricks for learning English in Marathi

इंग्रजी शिकण्यासाठी काही सोप्या टीप्स तसेच ट्रिक्स best tips and tricks for learning English in Marathi

खुप जण जेव्हा नवीनच इंग्रजी मध्ये लिहायला,वाचायला,तसेच बोलायला शिकत असतात.तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो.

इंग्रजी मध्ये मला लिहिता/वाचता तसेच बोलता यावे यासाठी मी काय करायला हवे.

काही जण तर असेही विचारत असतात अशी एखादी शाॅर्ट कट ट्रिक आहे का जिचा वापर करून मी लवकरात लवकर इंग्रजी मध्ये लिहायला/वाचायला/ बोलायला शिकु शकतो.

कारण आपल्याला लवकरात लवकर इंग्रजी शिकायचे असते.पण खर पाहायला गेले तर प्रत्येक गोष्टीला जसा एक विशिष्ट वेळ लागत असतो तसेच इंग्रजी शिकायला देखील वेळ लागत असतो.

कारण इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी आपल्याला किमान चार पाच महिने तरी रोज इंग्रजी मध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागते.आपल्या आजुबाजूचे वातावरण देखील यासाठी इंग्रजी बोलणारे निर्माण करावे लागते.

तेव्हा हळुहळु प्रॅक्टिस केल्याने आपले इंग्रजी सुधारत असते.अणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे practice make us perfect रोज केलेला अभ्यास तसेच सराव हाच आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये परिपूर्ण बनवत असतो.

ज्यांना इंग्रजी शिकण्याची मनापासून आवड अणि इच्छा आहे अणि ज्यांच्या मनात इंग्रजी शिकण्याची जिदद आहे अशा विद्यार्थ्यांसाठी,आज मी काही अशा सोप्या टीप्स ट्रिक्स सांगणार आहे ज्याचा वापर करून आपण रोज अभ्यास,सराव करून लवकरात लवकर इंग्रजी मध्ये बोलायला शिकु शकता.

१)रोज इंग्रजी ऐका –

जर आपल्याला इंग्रजी मध्ये बोलायला शिकायचे असेल तर आपणास आधी इंग्रजी शब्द वाक्य ऐकायला सुरूवात करावी लागेल.

रोज टिव्हीवर ज्या चॅनलवर इंग्रजी भाषेमध्ये चित्रपट मालिका वेबसीरीज प्रकाशित होत असतात ते आपण बघायला तसेच ऐकायला हवे.

कारण टिव्हीवर आपल्याला इंग्रजी फक्त ऐकायलाच मिळत नाही तर इंग्रजी मध्ये कोणता शब्द बोलताना कसे हावभाव भावना आपल्या चेहऱ्यावर निर्माण होत असतात.

इंग्रजी मध्ये बोलताना संभाषण करत असताना आपल्या शरीराची सर्व बाॅडी लॅग्वेज कशी असते हे देखील आपणास इंग्रजी चित्रपट,मालिका वेबसीरीज यांच्या माध्यमातून पाहायला समजायला मिळत असते.

See also  विद्राव्य खतांचं शेतीतल महत्व - भाग 08- Importance of Water soluble fertilizer in farming

याने आपल्याला इंग्रजी मध्ये बोलत असताना एखाद्याशी संवाद साधत असताना कोणती भावना विचार तसेच हावभाव व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द आपणास वाक्यात कुठे वापरायला हवा अणि वापरायचा आहे हे कळत असते.

कारण इंग्रजी मध्ये खुप असे शब्द आहेत ज्यांचा अर्थ एकच होत असतो.

उदा,watch -पाहणे,see- पाहणे,look – पाहणे या तिन्ही शब्दांचा अर्थ जरी एकच होत असला तरी इंग्रजी मध्ये बोलत असताना वाक्यात या तिघांपैकी कोणता शब्द नेमकी कुठे वापरला गेला पाहीजे हे आपणास कळत नसते.

म्हणून आपण टिव्हीवरील इंग्रजीत दाखवल्या जात असलेल्या मुव्ही वेबसीरीज सीरीअल ह्या त्यात दाखवल्या जात असलेल्या भावना,हावभाव व्यक्त करणे इत्यादी गोष्टी समजुन घेण्यासाठी बघणे गरजेचे असते.

म्हणजे कोणती भावना व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द अधिक योग्य आहे कोणता शब्द वाक्यात कसा वापरला जातो हे आपणास कळत असते.तसेच रोज रोज इंग्रजी शब्द कानावर पडल्यामुळे आपला इंग्रजी शब्दसाठा देखील वाढत असतो.

जेणेकरून पुढच्या वेळी इंग्रजीत कुठलेही वाक्य बोलत असताना आपोआप आपल्याला इंग्रजी मध्ये बोलण्यासाठी नवनवीन शब्द सुचत असतात.कारण रोज इंग्रजी ऐकुन ऐकून आपला शब्दसाठा अधिक वाढलेला असतो.

म्हणून ज्यांना लवकरात लवकर इंग्रजी बोलायला शिकायचे आहे त्यांनी इंग्रजी मुव्ही सीरीअल तसेच वेबसीरीज आवर्जून बघायला अणि ऐकायला हव्यात.

याचसोबत आपण रेडिओ वर इंग्रजी मध्ये ज्या चॅनलवर बातम्या सुरु असतात त्या बातम्या देखील नीट कान लावून रोज ऐकायला हव्यात.

2) रोज इंग्रजीत वाचन करा –

जर आपणास इंग्रजी मध्ये बोलायला/लिहायला वाचायला शिकायचे असेल तर आपण रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे इंग्रजी न्युज पेपर विकत घेऊन किंवा एखाद्या वाचनालयात जाऊन वाचायला हवा.

इंग्रजी न्युज पेपर वाचत असताना आपणास जे शब्द खुप अवघड वाटतात.ज्यांचा अर्थ नेमका काय होतो हे आपणास कळत नाही अशा अवघड इंग्रजी शब्दांखाली अंडरलाईन करायचे.

अणि मग नंतर घरी आल्यावर त्या अंडरलाईन केलेल्या कठिन इंग्रजी शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो हे आपण गुगलवर युटबवर इंटरनेटवर सर्च करायचे आहे.

See also  भगवान बिरसा मुंडा रोड योजना काय आहे? Bhagwan Birsa Munda road scheme information in Marathi

किंवा आपण एखादी चांगली इंग्लिश डिक्शनरी विकत घेऊन रोज त्या्मध्ये सुदधा त्या अवघड इंग्रजी शब्दांचा अर्थ काय होतो हे शोधु शकतो.

इंटरनेट वर आपल्याला कुठल्या अवघड इंग्रजी शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो हे तर दिलेले असतेच शिवाय तो शब्द बोलताना वाक्यात कसा उच्चारला जातो हे देखील pronounc…

इंग्रजी शिकण्यासाठी नेमकी किती अणि कोणते शब्द पाठ करणे आवश्यक आहे?

जे विद्यार्थी नवीनच इंग्रजी,लिहायला,बोलायला वाचायला शिकत आहेत त्यांना लवकरात लवकर इंग्रजी शिकायची इच्छा असते.

जेणेकरून त्यांना आपल्या घरात,शाळा महाविद्यालयामध्ये मित्र वर्गात तसेच दैनंदिन जीवनात इतरांसोबत इंग्रजी मध्ये संवाद साधता यावा,इतरांशी इंग्रजी मध्ये संभाषण करता यावे.

म्हणून मुलांचा तसेच इंग्रजी शिकत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा एक प्रश्न असतो की

लवकरात लवकर आपणास इंग्रजीत बोलता यावे म्हणून साधारणत आपण किती इंग्रजी शब्द करायला हवेत अणि कोणकोणते महत्वाचे इंग्रजी शब्द पाठ करायला हवेत.

ज्या व्यक्तींना फक्त आपल्या दैनंदिन जीवनात आपले मित्र मैत्रिणी,नातलग,आजुबाजुचे लोक तसेच इतरांशी संवाद साधण्यापुरता इंग्रजी मध्ये इतरांसोबत बेसिक संभाषण करण्यासाठी इंग्रजी शिकायचे आहे त्यांनी कमीत कमी तीन ते साडे तीन हजार इंग्रजी शब्द पाठ करणे आवश्यक आहे.

साधारणत तीन हजार ते साडे तीन हजार एवढा इंग्रजी शब्द साठा जर आपल्याकडे असेल

म्हणजेच एवढे इंग्रजी शब्द आपणास पाठ असतील अणि त्यांचा अर्थ आपणास माहीत असेल तर आपण सहजरीत्या आपल्या दैनंदिन जीवनात इतरांसोबत इंग्रजी मध्ये बेसिक संवाद साधु शकतो.संभाषण करू शकतो.

जसे की इतरांना आपला परिचय देणे,मित्र मैत्रिणी नातलग यांच्याशी इंग्रजी भाषेत गप्पा मारणे,दैनंदिन जीवनात भेटत असलेल्या इतर अनोळखी व्यक्तीशी संभाषण करणे त्यांच्यासोबत इंग्रजी मध्ये संवाद साधणे इत्यादी.

पण ज्या व्यक्तींना इंग्रजी मध्ये बेसिक संवाद साधायचा आहे पण सोबत इंग्रजी मध्ये इतरांना शिकवायचे देखील आहे जसे की इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक वर्ग अशा व्यक्तींचे इंग्रजी हे थोडे अॅडव्हान्स लेव्हलचे असणे खुप गरजेचे आहे.

See also  FSSAI  - खाद्य पदार्थ परवाना कसा काढावा - What is FSSAI food License and Procedure

कारण इंग्रजी शिकवत असलेल्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना येत असलेल्या प्रत्येक अडीअडचणीचे समस्येचे निराकरण करायचे असते छोटछोटया गोष्टी देखील त्यांना इंग्रजी मध्ये नीट व्यवस्थित स्पष्ट करून समजावून सांगाव्या लागत असतात.

जे शब्द सर्वसामान्य विद्यार्थी वर्गाला माहीत नसतात जे त्यांनी कधी ऐकलेले नसतात असे शब्द देखील शिक्षकांना माहीत असणे गरजेचे असते तेव्हाच शिक्षक विद्यार्थ्यांने विचारलेल्या कुठल्याही अवघडात अवघड इंग्रजी शब्दाचा अर्थ त्याला नीट व्यवस्थित समजावून सांगु शकतात.

म्हणुन अशा अॅडव्हान्स लेव्हलच्या इंग्रजी करीता शिक्षकांचे इंग्रजी देखील उच्च दर्जाचे अॅडव्हान्स लेव्हलचे असणे आवश्यक असते.याकरीता साधारणत इंग्रजी शिकवत असलेल्या शिक्षकांचा इंग्रजी शब्द साठा इंग्रजी व्होकॅबलरी हा पाच हजार शब्द इतका तसेच यापेक्षा अधिक असायलाच हवा.

इंग्रजी मध्ये बोलण्यासाठी कोणते शब्द पाठ करायला हवेत?

जर आपणास इंग्रजी मध्ये कोणाशीही बेसिक संवाद साधायचा असेल जसे की एखाद्याशी गप्पा मारणे त्याचा परिचय करून घेणे आपला अणि आपल्या कुटुंबाचा परिचय देणे

तर आपणास ते सर्व इंग्रजी शब्द पाठ हवेत त्यांचा अर्थ माहीत असायला हवा ज्यांचा आपण घरात मित्र मैत्रिणी नातलग यांच्याशी बोलत असताना संभाषण करत असताना नेहमी उल्लेख तसेच वापर करत असतो.

शाळेत जाणारया लहान मुलांना इंग्रजी मधील mother,father, tree,bird असे सोप्पे हजार दोन हजार इंग्रजी शब्द पाठ असतात अणि त्यांना काय म्हणतात त्याचा अर्थ देखील त्यांना माहीत असतो.एवढे इंग्रजी येणे शाळेत जाणारया लहान मुलांसाठी पुरेसे आहे.

पण जे मुले मुली काॅलेज मध्ये शिकत आहेत नोकरी करीत आहेत अशा तरूण मुलांना व्यक्तींना इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी इंग्रजी मध्ये मित्र मैत्रिणी सोबत बेसिक संवाद साधता येण्यासाठी साधारणत नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद,क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय इत्यादी मधील रोज वापरात येणारी इंग्रजी शब्द आपली पाठ असायला हवीत.