दरवर्षी कोळसा खाण कामगार दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? Coal Miners’ Day
दरवर्षी ४ मे रोजी कोळसा खाण कामगार दिवस साजरा केला जात असतो.हा दिवस कोळसा खाण काम करत असलेल्या कामगारांचे कौतुक करण्याचा तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
औद्योगिक क्रांती मधील काही थोर नायक आणि त्यांनी घेतलेल्या परीश्रमा विषयी जाणुन करून देण्यासाठी, त्यांनी घेतलेले कष्ट ओळखण्यासाठी दरवर्षी ४ मे रोजी हा दिवस साजरा केला जात असतो.
कोळसा हे एक असे नैसर्गिक संसाधन आहे जे आपल्या आर्थिक अणि सामाजिक विकासात हातभार लावण्याचे त्याला गतिशीलता आणण्याचे काम करतो.
कोळसा खाण हा आपल्या देशातील एक अत्यंत कठिण अणि महत्वाचा उद्योग व्यवसाय आहे ज्यामध्ये कोळसा खाण कामगारांना खाणींमध्ये खोदकाम करावे लागते.बोगदे कोळसा काढावा लागत असतो.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर मानवी जीवन टिकवून ठेवण्यासाठी साहाय्यकारी ठरणारी श्रीमंती धन बाहेर काढण्यासाठी ते जमिनीवर खोलवर खोदकाम करत असतात.
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कोळसा खाण कामगार देत असलेले आपले योगदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे
अणि कोळशाच्या खाणीत काम करत असताना कोळसा खाण कामगारांना ज्या काही अडीअडचणी संकटांना तोंड द्यावे लागत असते त्या सर्व गोष्टी एकदम कौतुकास्पद आहेत.पण कोळसा खाण कामगारांच्या ह्या अमुल्य योगदानाचे कुठलीही दखल घेतली जात नसते.
बुदध पौर्णिमा का साजरी केली जाते हया दिवसाचे महत्व काय आहे?
त्यांच्या ह्या अमुल्य कार्याचे योगदानाचे कौतुक केले जात नाही म्हणून कोळसा खाण कामगारांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असतो.
त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक करण्यासाठी गौरव करण्यासाठी दरवर्षी आपण हा दिवस साजरा करत असतो.
कोळसा खाण कामगार दिनाच्या निमित्ताने आपल्या देशातील सर्व कोळसा खाण कष्टकरी कामगार वर्गाला आदरांजली वाहिली जाते ज्यांनी आपल्या भारत देशाच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना प्राप्त करून देण्यासाठी आपली एक विशिष्ट अशी महत्वाची भुमिका पार पाडली आहे.
पहिली कोळशाची खाण स्काॅटलॅड ह्या देशातील जाॅर्ज ब्रुस यांनी १५७५ मध्ये कानोर्क हया ठिकाणी उघडली होती.अणि तेव्हापासून ह्या उद्योगाला अधिक वेगाने चालना प्राप्त झाली.
भारतात कोळसा खाण उद्योगास आरंभ १७७४ मध्ये झाला होता.जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने झारखंड आणि पश्चिम बंगाल यांना ओलांडणारया दामोदर नदी काठी असनतोल अणि दुर्गापूर येथे असलेल्या राणीगंज ह्या कोळसा क्षेत्राचे शोषण करण्यात आले होते.
यानंतर राणी गंज येथील कोळशाच्या खाणी ह्या भारताच्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र बनल्या होत्या.हया व्यवसायाने देशाच्या विकासासाठी अणि वाढीसाठी महत्वाची भुमिका देखील बजावली असल्याचे आपणास दिसून येते.
कोळसा खाण कामगार दिवस सर्वप्रथम २०१७ मध्ये भारतात साजरा करण्यात आला होता.ज्याला भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय कोळसा खाण कामगार दिवस म्हणून घोषित करण्यात आले.
तेव्हापासून दरवर्षी कोळसा खाण कामगारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी गौरव करण्यासाठी देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ लागले.