चालु घडामोडी मराठी 3 मे २०२३ – Current affairs in Marathi

३ मे २०२३ रोजीच्या महत्वाच्या चालु घडामोडी current affairs in Marathi

१)पाकिस्तान हा देश आशियातील सर्वात जास्त एडीबी कर्ज प्राप्त करणारा देश बनला आहे.एडीबीचा फुलफाॅम asian development bank असा होतो.

२)अणुऊर्जा आयोगाचे(atomic energy commission) चे नवीन अध्यक्ष म्हणून अजितकुमार मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याचसोबत अजितकुमार मोहंती हे अणुउर्जा आयोगाच्या सचिवपदाचा देखील कार्यभार सांभाळणार आहेत.

अणु ऊर्जा आयोगाची स्थापना ३ आॅगस्ट १९४८ रोजी झाली होती.याचे मुख्यालय मुंबई शहरात आहे.

३)जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस ३ मे रोजी दरवर्षी साजरा केला जात असतो.जागतिक पत्रकार दिनाची २०२३ मधील थीम शेपिंग अ फ्युचर आॅफ राईट: फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन अॅज ड्राइव्हर फाॅर आॅल अदर हयुमन राईट ही आहे.

४)कालेसर राष्ट्रीय उद्यान हरियाणा ह्या राज्यात स्थित आहे.हरियाणा मध्ये कालेसर राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्यजीव अधिकारींकडुन वाघ बघण्यात आला आहे.तब्बल ११० वर्षांनंतर येथे वन्यजीव अधिकारींना येथे वाघ दिसला असल्याचे सांगितले जात आहे.

१९१३ मध्ये शेवटच्या वेळी हरियाणा येथील राष्ट्रीय उद्यानात वाघ पकडण्यात आला होता.हे हरियाणा येथील यमुनानगर जिल्ह्यात आहे.

८ डिसेंबर २००३ रोजी कालेसर राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले होते.हे राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश उत्तरांचल युपी या तीन राज्यांशी याची सीमा आहे.

कालेसर हे नाव ह्या उद्यानास महादेवाच्या नावावरून ठेवण्यात आले होते.सध्या भारत देशातील वाघांची संख्या ३ हजार १६७ आहे.

५) रिफ्लेकशन ह्या नावाचे पुस्तक निर्मला सीतारमण यांच्या हस्ते लाॅच केले गेले आहे.

६) गुजरात राज्यातील हस्तकला मातानी पछेडीला जीआय टॅग देण्यात आला आहे.पछेडी ही एक धार्मिक कापडाची लोककला आहे.माताने पछेडीचा मराठीत अर्थ देवीच्या मागे असा होतो.

गुजरात राज्याशी संबंधित इतर जीआय टॅगची नावे संखेडा फर्निचर,पेठापुर प्रिंटिंग ब्लाॅक,टांगलया शाल,भालिया गहु असे आहे.

७) कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून टी एस शिवागमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

See also  जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day

८) यु एस ए ह्या देशाचा अंतराळ संस्थेचा निवृत्त उपग्रह आर एच ई एस एस आय याने त्याच्या प्रक्षेपणानंतर जवळपास २१ वर्षांनी पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला आहे.

९) कलेकटिव्ह स्पिरीट काॅनक्रिट अॅक्शन ह्या पुस्तकाचे लेखक शशी शेखर वेपटी असे आहे.

१०) भारत अणि युके ह्या देशाने नेट झिरो इनोव्हेशन वर्चुअल केंद्र तयार करण्याचे मान्य केले आहे.युकेचे नवीन पंतप्रधान त्रषी सुनक हे आहेत.युकेची राजधानी लंडन आहे.अणि चलन पाऊंड स्टर्लिंग असे आहे.

११) जम्मु काश्मीर हया केंद्रशासित प्रदेशाने दोन दिवसीय सिंथन स्नो फेस्टिव्हल २०२३ चे आयोजन केले आहे.जममु काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा ३१ आॅक्टोंबर २०२३ रोजी देण्यात आला होता.

१२) २०२७ पासुन भारत देश नागरी उड्डाण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय हवामान कृतीत समाविष्ट होणार आहे.

२०२७ मध्ये भारत देश आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेत सामील होणार आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नागरी विमान वाहतूक मंत्रालयादवारे हे जाहीर करण्यात आले आहे.

१३) बिलबोर्डच्या लॅटिन वुमन आॅफ द इयर ह्या पुरस्काराने शकिरा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.