चालु घडामोडी मराठी 9 मे २०२३- Current Affairs in Marathi
- भारत आणि बांगलादेश यांच्यातील दहाव्या लॅडपोर्टचे उद्घाटन मेघालय राज्यात करण्यात आले आहे.हया लॅडपोर्टमुळे भारत अणि बांगलादेश या दोघे देशांतील व्यापाराला चालना प्राप्त होणार आहे.ज्याचसोबत ह्याने दोन्ही देशांतील प्रवास सुलभ होण्यास साहाय्य प्राप्त होणार आहे.
- बाॅर्डर रोड आॅर्गनाइझेशनने ७ मे २०२३ रोजी आपला ६४ वा स्थापणा दिवस साजरा केला आहे.
- बिहार राज्यातील उच्च न्यायालयाने जातीनिहाय सर्वेक्षण cast wise survey तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
- भोगपुरम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आंध्र प्रदेश ह्या राज्यात स्थित आहे.हे विमानतळ तसेच ग्रीन फील्ड विमानतळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
- उत्तर प्रदेश ह्या राज्यात भारतातील पहिले फार्मा पार्क बनविण्यात येणार आहे.
- त्रषीकेश ह्या शहरात दोन दिवसीय युथ कंसल्टेशन प्रोग्राम परिषद आयोजित करण्यात आली आहे.याची थीम ही हेल्थ वेलनेस अणि स्पोर्ट्स अशी ठेवण्यात आली आहे.
- केरळ राज्यात असलेला वायनाड जिल्हा भारतातील पहिला उघड्यावर शौचास मुक्त open defecation free जिल्हा ठरलेला आहे.
- देशातील पहिले डिजीटल सायन्स पार्क केरळ मध्ये आहे.
- भारत देशातील पहिली वाॅटर मेट्रो कोची केरळ येथे धावली आहे.
- उत्तर प्रदेश हे सर्व सरकारी विभागात शंभर टक्के ईव्हीएस वाहने असलेले पहिले राज्य बनले आहे.
- पहिली शेर्पा सभा राजस्थान मध्ये असलेल्या उदयपुर राज्यात झाली आहे.
- पहिली पर्यटन कार्यगटाची बैठक गुजरात मध्ये घेण्यात आली आहे.
- नॅशनल मॅनयुफॅक्चरींग इनोव्हेशन सर्वे २०२१-२०२२ द्वारे कर्नाटक ह्या राज्याला नाविण्यपूर्ण स्थान देण्यात आले आहे.
- दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वोच्च गुण देण्यात आले आहेत.
- उत्तराखंड राज्याला पर्वतीय राज्यांमध्ये सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत.
- गोल्डन बाॅय नीरज चोप्रा हयाने डायमंड लीग २०२३ दोहा कतार येथे ८८.६७ मीटर इतका लांब अंतरावर भालाफेक करत जिंकली आहे.
- अजय वीज यांची अॅसेंचर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- ओडिसा ह्या राज्याकडुन केंद्रशासित प्रदेशाकडुन आदर्श काॅलनी पुढाकार सुरू करण्यात आला आहे.किनारपटटीची धुप अणि हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी भारतातील पहिली पुनर्वसन वसाहत उभारण्यासाठी ओडिसा ह्या राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशाकडुन आदर्श काॅलनी पुढाकार सुरू करण्यात आला आहे.
- वेकफिटचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून आयुष्यमान खुराणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- अमरा राजा बॅटरीज लिमिटेडने आपल्या ९ हजार ५०० कोटी रूपयांच्या रेगिगा फॅक्टरीची पायाभरणी तेलंगणा ह्या राज्यात केली आहे.
- ह्या गिगा फॅक्टरी मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांकरीता बॅटरी तयार केली जाणार आहे.