प्रोडक्ट अणि सर्विस ( उत्पादन व सेवा) मधील फरक Difference between product and service in Marathi

प्रोडक्ट अणि सर्विस ( उत्पादन व सेवा) मधील फरक Difference between product and service in Marathi

मित्रांनो आपण दुकानातील एखादे प्रोडक्ट खरेदी करत असतो.किंवा एखादी कंपनीची सर्विस ही नक्की विकत घेत असतो.

त्यामुळे आपल्याला वाटते की प्रोडक्ट अणि सर्विस दोघे एकच आहेत.दोघांचे कार्य एकच आहे.

पण तसे नाहीये मित्रांनो प्रोडक्ट अणि सर्विस या दोघांचे कार्य जरी जवळजवळ सारखे असले कस्टमरला सुविधा पुरविणे मदत करणे तरी या दोघांमध्ये खुप फरक असतो.

आजच्या लेखात या दोघांमधील हाच महत्वाचा फरक आपण जाणुन घेणार आहोत.

● कुठल्याही प्रोडक्टला तसेच वस्तुला आपण डोळयांनी बघु शकतो,हात लावू शकतो,स्पर्श करू शकतो.म्हणुन प्रोडक्टला टँजिबल प्राँपर्टी असे म्हटले जाते.यात प्रोडक्टचा फिजिकल अँपीअरन्स राहत असतो.

सर्विसला आपण डोळयांनी बघु शकत नाही,तसेच कुठल्याही प्रकारचा शारीरीक स्पर्श करू शकत नाही.सर्विसेसला कुठलाही फिजीकल अँपीअरन्स नाही म्हणुन यास इनटँजिबल प्राँपर्टी असे म्हणतात.

● वस्तु तसेच प्रोडक्टला आपण एका विशिष्ट ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो.त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो.

सर्विस ही एक सेवा सुविधा असते जी एखादी कंपनी काही ठाराविक कालावधीकरीता आपल्या कस्टमरला देत असते.सर्विसेसला आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही.

● प्रोडक्ट जर आपणास आवडला नाही तर आपण तो प्रोडक्ट ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीला रिटर्न करू शकतो.

पण सर्विसेसला आपण रिटर्न करू शकत नाही.म्हणजे समजा एखादा व्यक्ती आपणास शिकवतो आहे,किंवा एखादा सेलर आपणास त्याच्या कंपनीची काही माहीती देतो आहे अणि आपणास त्याचे बोलणे नही आवडले किंवा समजलेच नाही तर आपण त्याला म्हणु शकत नाही मला तुझी सर्विस आवडली नाही मला माझा घेतलेला वेळ रिटर्न कर.म्हणजेच एकदा घेतलेली सर्विस आपणास रिटर्न करता येत नसते.

● प्रोडक्टची काँलिटी आपण मेझर करू शकतो.

सर्विसेसची आपण काँलिटी मेझर नही करू शकत फक्त आपण आपले त्या सर्विस बाबतचे मत सांगु शकतो की ती घेतलेली सर्विस आपणास कशी वाटली त्यातुन आपला किती फायदा झाला आपणास किती व्हँल्युह प्राप्त झाली.इत्यादी.

See also  एम पीन म्हणजे काय? -Mpin meaning in Marathi

● प्रोडक्ट तयार करणारी कंपनी अणि तो प्रोडक्ट सेल करणारा व्यक्ती हे वेगवेगळे असु शकतात.म्हणजे जी कंपनी प्रोडक्ट तयार करते आहे तिच्याकडुन प्रोडक्ट खरेदी करून एखादा सेलर मार्केटमध्ये ते प्रोडक्ट कस्टमरला विकु शकतो.

पण सर्विसेसमध्ये असे नसते ज्या व्यक्तीची,कंपनीची सर्विस आहे तो व्यक्तीच आपणास स्वता सर्विस देत असतो.कोणी दुसरा व्यक्ती यात मध्यस्थी करु शकत नाही.

● प्रोडक्टचा मालकी हक्क बदलु शकतो एक व्यक्ती एखाद्याकडुन प्रोडक्ट खरेदी करून थोडे दिवस वापरून तो प्रोडक्ट दुसरया व्यक्तीला विकु शकतो.त्याचा मालकी हक्क त्याच्याकडे असतो.

पण सर्विसेसमध्ये आपण सर्विसचा फक्त वापर करू शकतो त्या सर्विसचा कुठलाही मालकी हक्क आपल्याकडे येत नसतो.किंवा तो बदलत नसतो.सर्विस ज्याची आहे त्याचीच राहत असते.

म्हणजे हाँटेलमध्ये जाऊन आपण तेथील सर्विसचा फक्त लाभ उठवू शकतो तिथले सर्व चांगले चांगले पदार्थ आँडर करून खाऊ शकतो पण ते हाँटेल याने आपले होत नसते.आपण सर्विसेसचा फक्त उपभोग घेऊ शकतो.

फक्त दोघांमध्ये ही एक समानता असते की प्रोडक्ट अणि सर्विस दोघेही कंपनी आपल्या कस्टमरला मदत करण्यासाठी त्यांना उत्तम सुविधा पुरविण्यासाठी त्यांची एखादी समस्या सोडविण्यासाठी देत असते.