आर्थिक समावेशन म्हणजे काय?- Financial inclusion meaning in Marathi

आर्थिक समावेशन म्हणजे काय?- Financial inclusion meaning in Marathi

 

ब‌ॅकिग सेवा ही सर्व गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांना उपलब्ध व्हावी सर्वसामान्य गरीब कुटुंबात राहणारया लोकांना देखील याचा लाभ घेता यावा यालाच आर्थिक समावेशन असे म्हणतात.

जेव्हा सर्व व्यवसाय,उद्योग आर्थिक सेवा़ंचा सुविधांचा लाभ घेऊ शकतात.तेव्हा त्यास आर्थिक समावेशन म्हणजेच फायनानशिअल इंकलुझन असे स़ंबोधिले जात असते.

आर्थिक समावेशनाच्या इतर व्याख्या –

● आर्थिक तसेच बँकिंग सेवा सुविधांचा लाभ घेण्याची स़ंधी तसेच उपलब्धता सर्व उद्योग व्यवसाया़ना खेडी तसेच शहरी भागातील लोकांना समान पद्धतीने प्राप्त होणे म्हणजेच आर्थिक समावेशन होय.

● आर्थिक समावेशन हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे सर्वसामान्य लोकांना देखील सर्व आर्थिक सेवा सुविधांचा लाभ प्राप्त करून दिला जातो.

असे व्यक्ती जे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेपासुन अजुनही वंचित राहीलेले आहेत.अशा आर्थिक विकासापासुन वंचित राहीलेल्या लोकांना आर्थिक सेवा सुविधांच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची समाविष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक समावेशन होय.

आर्थिक समावेशन का केले जाते?

सर्वांना ब‌ॅंकिग आर्थिक सेवांचा सुविधांचा समानरीतीने लाभ घेता यावा उपयोग करता यावा.

आपल्या पैशाची बचत करता यावी आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशांवर चा़ंगले व्याज प्राप्त करता यावे याकरीता आर्थिक समावेशन करण्यात येत असते.

थोडक्यात सर्व खेडयातील गरीब मध्यमवर्गीय तसेच शहरातील धनवान व्यक्तींना देखील सर्व बँकिंग सेवा सुविधांचा लाभ प्राप्त व्हावा यासाठी आर्थिक समावेशन केले जाते.

आर्थिक समावेशनात कशाकशाचा समावेश होतो?

आर्थिक समावेशनात पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश होत असतो –

See also  श्री गणेशाची मूर्ती स्थापना करताना या गोष्टींची काळजी घ्या

● बँक खाते सेविंग खाते

● इ़ंशुरंस सुविधा

● पेमेंट अणि रिमीटनस सर्विस

● आर्थिक सल्ला

● परवडेल अशी क्रेडिट सुविधा

● सरकार कडुन दिले जाणारे अनुदान प्राप्त करून देणे

● लोन सुविधा

आर्थिक समावेशनाचा मुख्य हेतु काय आहे?

सर्वांना बँकिंग तसेच वित्तीय सेवा सुविधांचा समान रीतीने लाभ प्राप्त व्हावा कोणालाही यापासुन व़ंचित राहावे लागु नये यासाठी सर्वांना आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करणे हा आर्थिक समावेशनाचा मुख्य हेतु आहे.

आर्थिक समावेशनात प्रामुख्याने समाजात जे काही आर्थिक दृष्ट्या व़ंचित लोक आहेत अशा लोकांना सर्व आर्थिक सेवा सुविधांचा लाभ प्राप्त व्हावा ह्या गोष्टीचा विशेष विचार केला जातो.

समाजात असे लोक देखील आहेत ज्यांना बँकेच्या कामकाजाचे ज्ञान नसल्याने सरकारकडुन दिल्या जात असलेल्या आर्थिक सेवा सुविधांचा लाभ प्राप्त होत नसतो.

काही लोक तर असेही आहेत ज्यांना बँकेच्या कामकाजाचे चा़ंगले ज्ञान असुनही बँकी़ग सेवा सुविधांचा
लाभ प्राप्त होत नसतो कारण बँकेच्या अटी नियमा़ंमुळ ते काही योजनांसाठी जसे की लोन तसेच इन्शुरन्स वगैरे इत्यादी सुविधांसाठी पाऋ ठरत नसतात.

अशा व़ंचित लोकांना बँकेच्या सेवा सुविधांचा लाभ प्राप्त व्हावा त्यांना त्यात समाविष्ट केले जावे समाजातील कमी भाग्यवान लोकांना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आर्थिक समावेशन केले गेले.

भारत देशातील आर्थिक समावेशन योजना कोणकोणत्या आहेत?

भारत देशातील आर्थिक समावेशन योजनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

● प्रधानमंत्री वय वंदना योजना

● प्रधानमंत्री जन धन योजना

● अटल पेंशन योजना

● प्रधानमंत्री मुद्रा योजना

● सुकन्या समृद्धी योजना

● प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

इत्यादी.