लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार विषयी माहिती – Lata Dinanath Mangeshakar award information in Marathi

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार विषयी माहिती Lata Dinanath Mangeshakar award information in Marathi

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले, विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना यंदाचा लता मंगेशकर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा आशा भोसले यांना दिला जाईल.आशा भोसले यांचे नाव सर्वात जास्त गाण्याची रेकाॅर्डिग करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

तसेच विद्या बालन प्रसाद ओक पंकज उधास यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा मुंबई येथे प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी केली आहे.

ह्या पुरस्काराचे वितरण २४ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे श्री शंनमुखानंद हाॅल येथे होणार आहे म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनी ह्या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

आजच्या लेखात आपण लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार ह्या पुरस्कार विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जातो?

लता दिनानाथ मंगेशकर ह्या पुरस्काराची स्थापणा यांच्या भारत देशातील महान गायिका लता मंगेशकर यांच्या आठवणीत तसेच सम्मानात करण्यात आली होती.

लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी २०२२ मध्ये ९२ वय असताना निधन झाले होते.

समाज अणि जनतेसाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आपले योगदान देणाऱ्या, तसेच देशातील जनतेला चांगला मार्ग दाखवला त्यांची प्रेरणा बनले अशा व्यक्तीला हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते.

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२२ मध्ये त्यांच्या समाज अणि जनतेसाठी केलेल्या अनमोल कार्यासाठी देण्यात आला होता.

See also  चालु घडामोडी मराठी 11 मे २०२३- Current Affairs in Marathi

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चंॅरिटेबल ट्रस्ट यांनी असे सांगितले आहे की हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो.

अणि ह्या वर्षी २०२३ मध्ये हा दुसरा पुरस्कार ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना दिला जाणार आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जातो?

भारतीय संगीत नाटक तसेच इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला जातो.

भारतीय संगीता मध्ये पंकज उधास,मास्टर दीनानाथ मंगेशकर चित्रपट अणि नाटय क्षेत्र सेवा विशेष पुरस्कार प्रसाद ओक यांना देण्यात आला आहे.

चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेसाठीचा विशेष पुरस्कार हा प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री विद्या बालन यांना देण्यात आला आहे.