एम आर एफच्या शेअर्सने पार केला एक लाख रुपयांचा टप्पा बनला असे करणारा भारतातील पहिला स्टाॅक MRF share price cross 1 lakh in Marathi

एम आर एफच्या शेअर्सने पार केला एक लाख रुपयांचा टप्पा बनला असे करणारा भारतातील पहिला स्टाॅक mrf share price cross 1 lakh in Marathi

जगातील सर्वात महागडा १० स्टाॅक पैकी एक स्टाॅक म्हणुन सर्वांना परिचित असलेला तसेच टायर निर्माण करण्यासाठी प्रचलित असलेल्या एम आर एफ कंपनीच्या शेअर्सने बाजारात एक नवीन इतिहासाची नोंद केली आहे.

ह्या शेअर्सने आज मंगळवारी १३ जुन रोजी १ लाख रुपयेचा टप्पा पार पाडत इतिहास रचला आहे.एक लाख रूपयेचा टप्पा पार करणारा बाजारातील पहिला स्टाॅक आहे.

आज एम आर एफच्या शेअर्समध्ये १.३७ टक्के इतकी वाढ झालेली पाहावयास मिळाली आहे.अणि ह्या शेअर्सची किंमत १००३०० वर पोहोचली आहे.

ह्या कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यात ६५ हजार ९००.०५ इतकी किमान पातळी गाठलेली आहे.२०२३ मध्ये मे महिन्याच्या आरंभी एम आर एफ कंपनीचे शेअर्स एक लाखाच्या जवळ आलेले दिसुन आले होते.

पण एक लाखाचा टप्पा गाठण्यात ह्या शेअर्सला अपयश हाती आले होते.एक लाखाच्या टप्प्याला गाठण्यापासुन कंपनीचे शेअर्स ६६.५० रूपये इतके मागे होते.

फ्युचर मार्केट मध्ये हेच शेअर्स ८ मे २०२३ ह्या दिवशी १ लाखापर्यंत पोहोचले असल्याचे आपणास दिसून येते.

एम आर एफच्या शेअर्समध्ये वर्षभरात ४५ टक्के इतकी वाढ पाहावयास मिळाली आहे.आज १३ जून २०२३ रोजी हे शेअर्स १००३०० वर पोहोचलेले दिसुन आले आहे.

याआधी २०२२ मध्ये एम आर एफचे शेअर्स बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजवर ६८ हजार ५६१ रूपये वर पोहोचले होते.

२०२३ मध्ये एम आर एफच्या शेअर्समध्ये १४ टक्के तेजी दिसुन आली आहे.आज १३ जुन २०२३ रोजी ह्या शेअर्सने बाजारात प्रती शेअर एक लाख रूपये हा टप्पा गाठण्यात यश प्राप्त केले आहे.

१३ जुन २०२३ रोजी मार्केट उघडताच ह्या शेअर्सने अवघ्या काही मिनिटांत एक लाखाचा टप्पा पार केला.सकाळी ह्या शेअर्समध्ये ०.८९ टक्के वाढ पाहावयास मिळाली.अणि हा शेअर्स ९९८४९.९५ वर ट्रेंड करत होता.

See also  ब्लुमुन तसेच सुपरमुन कशाला म्हणतात? ह्या दोघांची वैशिष्ट्ये काय आहेत? Blue Moon,Supermoon meaning in Marathi

एम आर एफ ह्या टायर निर्माण करत असलेल्या कंपनीचे एकुण ४२.४१,१४३ इतके शेअर्स आहेत.ज्यातील ३०.६०,३१२ इतके शेअर्स सार्वजनिक भाग धारकांकडे आहेत.अणि प्रमोटर्सकडे ११,८०,८३१ इतके शेअर्स आहेत.