नाबार्डचा फुलफाँर्म काय होतो? – NABARD full form in Marathi

नाबार्डचा फुलफाँर्म काय होतो? – NABARD full form in Marathi

नाबार्डचा फुलफाँर्म national for agriculture and rural development असा होत असतो.

नाबार्ड काय आहे?Nabard meaning in Marathi

राष्टीय कृषी अणि ग्रामीण विकास म्हणजेच नाबार्ड ही एक भारत देशातील एक सर्वात मोठी बँक आहे.ही बँक देशातील कृषी क्षेत्राचा अणि ग्रामीण क्षेत्राचा विकास व्हावा म्हणुन वित्त पुरवठा करण्याचे काम करते.

म्हणुनच ह्या बँकेला कृषी बँक म्हणुन ओळखतात.ह्या बँकेचे काम देशातील ग्रामीण,कृषी अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करणे हे आहे.

नाबार्डची स्थापणा का करण्यात आली?

भारतातील ग्रामीण क्षेत्रात वास्तव्यास असणारया व्यक्तींना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते.

म्हणुन भारत सरकार कडुन ग्रामीण भागांचा विकास घडवून आणण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला ज्या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांचा विकास व्हावा त्यांच्या सर्व अडीअडचणी दुर व्हावा म्हणुन नाबार्ड बँकेची स्थापणा केली गेली.

नाबार्डचे मुख्य हेतु काय आहे?

नाबार्डचा मुख्य हेतु कृषी अणि ग्रामीण क्षेत्रात विकास घडवून आणने हा आहे.

तसेच कृषी,लघुउद्योग,कुटीरोद्योग इत्यादी ग्रामीण अर्थव्यवस्थास वित्तपुरवठा करण्यासाठी पतनियोजन करणे,

भारत सरकारकडुन निर्देशित करण्यात आलेल्या वित्तीय संस्थांना प्रत्यक्षात कर्जपुरवठा करणे,ज्या वित्तीय संस्था ग्राणीण भागास अल्प तसेच दिर्घमुदतीवर कर्ज देतात त्यांच्यासाठी पुर्नवित्तपुरवठा करणे हा नाबार्डचा हेतु आहे.

See also  राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय विषयी थोडक्यात माहिती National Defence College information in Marathi

नाबार्डची स्थापणा कधी करण्यात आली होती?

नाबार्डची स्थापणा १२ जुलै १९८२ रोजी करण्यात आली होती.यानंतर कृषी अणि पतपुरवठयाशी संबंधित असलेली जेवढीही कामे भारतीय रिझर्व बँक करायची ती सर्व कामे नाबार्डकडे सोपवली गेली.

नाबार्डचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

नाबार्डचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात आहे.

नाबार्डची एकुण किती उपकार्यालय आहेत?

नाबार्डची एकुण एक ते दोन उपकार्यालय आहेत.

नाबार्डची किती प्रशिक्षण केंद्र आहेत?

साधारतण नाबार्डची एकुण पाच ते सहा प्रशिक्षण केंद्र आहेत.

नाबार्डचा सर्व कारभार सांभाळण्याची जबाबदारी कोणाची असते?

नाबार्डचा सर्व कारभार सांभाळण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते.

२०२२ मधील नाबार्डचे नवीन चेअरमन कोण आहेत?

शाजी के व्ही यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी नाबार्डच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

नाबार्डचे काम काय आहे?

नाबार्ड ही प्रामुख्याने कृषी अणि ग्रामीण विकास घडवुन आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली राष्टीय बँक आहे.ही बँक कृषी,कुटीरोद्योग ग्रामीण उद्योगाच्या विकासाकरीता पतपुरवठा सुलभ करण्याचे काम करते.

नाबार्डदवारे कृषी अणि ग्रामीण उद्योग विकासाकरीता विविध योजनांतर्गत कर्ज देखील प्रदान केले जाते.

ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायात वेगाने वाढ व्हावी यासाठी कुटिरोद्योगास अधिक गती यावी म्हणुन नाबार्ड जलदगतीने कार्य करीत आहे.

नाबार्डकडुन कृषी व्यवसाय क्षेत्रातील शेतकरी वर्गाला दिलासा म्हणुन कर्ज दिले जाते.

नाबार्डचे काम शेती,लघुउद्योग,कुटिरोद्योग इत्यादी क्षेत्रांना गुंतवणुक करण्यासाठी आपल्या उत्पादनात वाढ करण्यासाठी वित्तपुरवठा करणे हे आहे.

स्थापणेच्या वेळी नाबार्डचे भांडवल किती होते?

जेव्हा नाबार्डची स्थापणा झाली तेव्हा नाबार्डचे भांडवल जवळजवळ शंभर कोटीच्या आसपास होते.नंतर ह्या भांडवलात वाढ करण्यात आली अणि हे दोन हजार कोटीपर्यत नेण्यात आले.

नाबार्डचे अधिकार –

सर्व प्रकारच्या सहकारी,राज्य सहकारी तसेच क्षेत्रीय बँकाची तपासणी करण्याचा हक्क नाबार्डकडे आहे.