नागपुर महानगरपालिका मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू- Nagpur Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

Nagpur Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

नागपुर महानगरपालिका कडुन विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहे.

ह्या भरतीदरम्यान सर्व पात्र अणि योग्य उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सदर भरतीसाठी इच्छुक अणि पात्र असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे अणि मुलाखतीच्या दिवशी देण्यात आलेल्या पत्यावर सांगितलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.

ज्या उमेदवारांची मुलाखती दरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना नागपूर येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव –

१)अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी –

एकुण पदसंख्या -३४

वेतन –

ज्या उमेदवारांची अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड केली जाईल त्यांना दरमहा ३५ हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस झालेले असणे आवश्यक आहे.

तसेच सदर उमेदवाराने महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल मध्ये आपल्या नावाची नावनोंदणी देखील केलेली असावी.

ज्या उमेदवारांना सदर वैद्यकीय क्षेत्रात अधिकारी पदावर काम करण्याचा अनुभव आहे त्यांना सदर भरतीसाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

इतर महत्त्वाच्या सुचना तसेच पात्रतेच्या अटी –

● सदर भरतीसाठी फक्त महाराष्ट राज्यातील उमेदवारांना अर्ज करता येईल.

● जे उमेदवार उच्च शैक्षणिक अर्हता धारक तसेच अनुभवी आहे त्यांना सदर भरतीसाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

● जे उमेदवार अर्ज छाननी मध्ये पात्र ठरतील त्यांचीच मुलाखत घेण्यात येईल.

See also  लहान मुलांसोबत घरात इंग्रजी मध्ये कसे बोलायचे?How To Speak English With Kids In Marathi

● सर्व उमेदवारांनी जाहीरातीत दिलेल्या नमुन्यातच आपला अर्ज सादर करायचा आहे इतर कुठल्याही फाॅरमॅटमधील अर्ज स्वीकारले जाणार नाही.

● कुठल्याही क्षणी भरती तसेच निवड प्रक्रिया रदद करण्याचा हक्क नागपूर महानगरपालिका यांचेकडे राखीव असणार आहे.

● मुलाखतीसाठी येणारया उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही.

वयोमर्यादा अट –

सदर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी वयोमर्यादा अट कमाल ६५ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पद्धत –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी आॅफलाईन पद्धतीने भरतीसाठी आपला अर्ज सादर करायचा आहे.

मुलाखत सुरू होण्याची तारीख –

सर्व उमेदवारांची मुलाखत घेण्यास २१ फेब्रुवारी २०२३ पासुन प्रारंभ होणार आहे.जोपर्यत पदभरले जात नाही तोपर्यंत ही मुलाखत २१ तारखेपासून दर मंगळवारी घेतली जाणार आहे.

ज्या मंगळवारी सरकारी सुटटी असेल त्यादिवशी मुलाखत घेतली जाणार नाही.याची भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

मुलाखतीचे स्थान –

सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी नागपुर महानगरपालिका सिव्हिल लाईन आरोग्य विभाग पाचवा माळा नागपूर येथे उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीची वेळ –

सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी सकाळी ११ वाजेपासून दुपारी दोन वाजे दरम्यान सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सोबत उपस्थित राहायचे आहे.

निवडप्रक्रिया –

भरतीदरम्यान सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

ऑफिशिअल वेबसाईट – Nmcanagpur.Gov.In

मुलाखतीला येताना आणायची कागदपत्रे –

● नुकताच काढलेला एखादा पासपोर्ट साईज फोटो

● ईमेल आयडी मोबाईल नंबर

● महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र

● जन्म तारखेचे प्रमाणपत्र,शाळा काॅलेज सोडल्याचे प्रमाणपत्र,आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्.

● पदासाठी लागणारी मुळ शैक्षणिक वर्षांची अंतिम वर्षातील गुणपत्रिका पदानुसार शासनातर्फे प्राप्त नोंदणी प्रमाणपत्र

● पदासाठी लागणारा पीजी डिप्लोमा तसेच पीजी डिग्री