नारळी पौर्णिमा 2022 शुभ मुहूर्त अणि पुजा विधी- Narali Pornima 2022 Shubh Muhurat And Puja Vidhi In Marathi
आजच्या लेखात आपण 2022 मधील नारळी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे?तसेच पुजेचा संपुर्ण विधी काय असतो?पुजा कशा प्रकारे केली जाते?हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
2022 मध्ये नारळी पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे?
इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 12 आँगस्ट 2022 रोजी शुक्रवारच्या दिवशी ह्या वर्षी नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
नारळी पौर्णिमा शुभ मुहूर्त-
सुर्योदयाची अणि सुर्यास्ताची वेळ –
2022 मध्ये 12 आँगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुर्योदय हा सकाळी सहा वाजुन पाच मिनिटांनी होणार आहे तर सुर्यास्त होण्याची वेळ संध्याकाळी सहा वाजुन अठठावन्न मिनिट असणार आहे.
पौर्णिमेस आरंभ अणि समाप्ती-
पौर्णिमेला आरंभ हा 11 आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजुन 37 मिनिटांनी होणार आहे.
पौर्णिमेची समाप्ती 12 आँगस्ट रोजी 7 वाजुन पाच मिनिटांनी होणार आहे.
कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा?
कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओम वरुणाय नम ह्या मंत्राचा जप करायला हवा.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या देवाची विधिवत पुजा केली जाते?
नारळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान इंद्र अणि समुद्रदेव वरूणदेव यांची विधीवत पुजा केली जाते.
नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला नारळच का अपर्ण करतात?
नारळाचे महत्व –
नारळ हे एक पवित्र फळ आहे.नारळ हे फळ शुभ सुचक मानले जाते.नारळ हे फळ कुठल्याही शुभ कार्यासाठी,मंगलप्रसंगी वापरले जात असते.
नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते अणि आपल्याला माहीतच आहे की श्री ह्या शब्दाचा अर्थ लक्ष्मी असा होत असतो.
पुजा विधी –
ज्योतिष शास्त्रात सांगितल्यानुसार या दिवशी नारळ पिवळया कपडयात गुंडाळले जाते.मग ते केळीच्या पानावर ठेवून त्याची चांगल्या पदधतीने सजावट करण्यात येते.
मग त्या सजवलेल्या नारळाची वाजत गाजत मिरवणुक काढली जाते.यानंतर नारळाची शिखा समुद्राकडे ठेवून त्याची विधीवतरीत्या पुजा केली जाते.
पुजा करताना मंत्रोच्चारण देखील केले जाते.अणि मग मंत्रोच्चारण करत समुद्र देवास नारळ अर्पित केले जात असते.
समुद्राला नारळ अपर्ण करत असताना वरुणदेवाला प्रार्थना केली जाते की आमच्यावर संतापु नको खवळु नको.आमचे रक्षण कर अणि सदैव आमच्या डोक्यावर तुझा कृपार्शिवाद राहु दे.असे म्हटले जाते की याने समुद्र देव आपले सर्व समुद्री संकटांपासुन रक्षण करतात.
श्रावण महिना हा महादेवाला समर्पित महिना असल्याने या दिवशी महादेवाची पुजा देखील काही ठिकाणी केली जाते.
नारळी पौर्णिमा हा नारळाशी संबंधित विशेष दिन आहे.