राहुल गांधी यांची खासदारकी झाली रद्द | Rahul Gandhi disqualified as loksabha mp after conviction
कालच सुरत न्यायालयात मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती.अणि आज नवीन झटका राहुल गांधी यांना देण्यात आला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे ,लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे सभासदत्व रद्द केले आहे.अशी धक्कादायक बातमी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नुकतीच ऐकायला मिळाली आहे.
अशी शक्यता वर्तवली जात होती की ३० दिवसांच्या जामीनाच्या कालावधीत राहुल गांधी यांनी जर हाय कोर्टात अपील करून सुरत कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली तर राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक लढवता येईल.त्यांचे लोकसभा सभासदत्व रद्द होणार नाही.
पण राहुल गांधी यांनी हाय कोर्टात धाव घेण्याच्या अगोदर
अचानक लोकसभा सचिवालयाकडुन घेण्यात आलेल्या ह्या तडकाफडकी निर्णयामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांकडुन अत्यंत नाराजी अणि क्रोध व्यक्त केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
काॅग्रेस नेते राहुल गांधी हे केरळ राज्यात वायनाड येथील खासदार होते ते केरळ मधल्या मतदार संघामधुन निवडुन आले होते.
लोकसभा सचिवालयाकडुन नुकतेच एक नोटीफिकेशन पाठविण्यात आले आहे ज्यात असे दिले आहे की वायनाडचे खासदार २०२३ लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
असे सांगितले जाते आहे की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच प्रियांका गांधी यांनी एक टविट केले आहे ज्यात त्यांनी भष्टाचार करणारया लोकांची जणु लांबलचक लिस्टच समोर ठेवली आहे.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी –
प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करताच एक टविट केले आहे ज्यात त्या मोदी सरकार विरूद्ध टिका करताना म्हणाल्या आहे की भष्टाचार करणारया व्यक्तींना भाजप सरकार पाठीस घालत आहे.
भाजपकडुन साम दाम दंड भेद या चारही नीतींचा उपयोग करून राहुल गांधी यांचा आवाज दाबुन टाकला जात आहे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
भ्रष्टाचारी लोकांची चौकशी केली जाऊ नये म्हणून त्यांचा बचाव करत आहे.अणि गैरकृत्य तसेच गैरव्यवहार प्रकरणी प्रश्न उपस्थित करणारया लोकांवर खटले दाखल करता आहे अणि त्यांच्या वर कारवाया देखील करता आहे.असे प्रियंका ट्विटर अकाऊंट वरून टविट करत म्हणाल्या.
प्रियंका यांनी कोणी किती कोटींचा घोटाळा आतापर्यंत केला याची एक लिस्ट सुद्धा ट्विटरवर शेअर केली आहे.