महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये – Swadhar Yojana In Marathi

महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये – Swadhar Yojana In Marathi

महाराष्ट्र राज्यातील एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरीता महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी लाभदायक अशी एक योजना सुरू केली आहे.ह्या योजनेचे नाव स्वाधार योजना असे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ह्या योजनेअंतर्गत अकरावी बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते.

याचसोबत जे विद्यार्थी डिप्लोमा प्रोफेशनल नाॅन प्रोफेशनल कोर्स पदवी करीत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील ह्या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला एकुण ५१ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जात असते.

सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने अणि देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवून त्यांच्या जीवणाला एक योग्य आकार प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

महाराष्ट्र सरकारकडुन सुरू करण्यात आलेल्या ह्या स्वाधार योजनेचा सर्व अनुसूचित जाती अणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना लाभ प्राप्त करून दिला जाणार आहे.

डिप्लोमा प्रोफेशनल नाॅन प्रोफेशनल कोर्स पदवी करीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील ह्या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.

फक्त ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असु नये.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बाहेरगावी शिकत असावा.तो ज्या शहरातील महाविद्यालयात अकरावी बारावी साठी प्रवेश घेतो आहे तिथला स्थानिक रहिवासी नसावा.

विद्यार्थ्यांने ६० टक्के गुण मिळवून दहावी तसेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अणि जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांना किमान दहावी बारावी मध्ये ४० टक्के असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी जे शिक्षण करतो आहे त्याचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये.
योजनेसाठी अर्ज करत असलेला विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवा.

याचसोबत विद्यार्थ्यांकडे आपली ओळख पटण्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र म्हणून जवळ असणे आवश्यक आहे.अणि विद्यार्थ्यांने आपले आधार कार्ड बॅक खाते सोबत लिंक केलेले असावे.

See also  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू - AIATSL Bharti 2023 in Marathi

विद्यार्थ्यां जवळ उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांने बॅकेत आपले खाते ओपन केलेले असावे कारण लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांना आपल्या बँक खात्यावर प्राप्त होत असते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपला आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज दाखल करायचा आहे.

ह्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन निवास तसेच इतर शैक्षणिक सोयी सुविधांकरीता अनुदान दिले जात असते.

जे विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये वास्तव्य करीत असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Leave a Comment