बीपीओ म्हणजे काय?बीपीओ कंपनीचे प्रकार कोणते आहेत?बीपीओ कंपनी कोणते काम करते?कर्मचारी BPP वेतन किती दिले जाते? – What is BPO , types of BOP

बीपीओ म्हणजे काय?बीपीओ कंपनीचे प्रकार कोणते आहेत?बीपीओ कंपनी कोणते काम करते?कर्मचारी BPP वेतन किती दिले जाते? – What is BPO , types of BOP

मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे असतात.

ह्या सर्व कामांमध्ये काही अशी कामे देखील असतात जी कंपनी स्वता करत नसते.तर त्याची आऊटसोर्सिंग करीत असते.

ह्या कामात डेटा एन्ट्री,काॅल सेंटर,सेल्स मार्केटिंग,कस्टमर सपोर्टिग इत्यादी कामांचा समावेश होतो.

डेटा एन्ट्री,काॅल सेंटर,सेल्स मार्केटिंग,कस्टमर सपोर्टिग अशा काही कामांसाठी मोठमोठ्या कंपन्या इतर बीपीओ कंपनीला हायर करत असतात यालाच बीपीओ(business process outsourcing) असे म्हटले

जाते.

What is BPO
What is BPO

बीपीओ कंपनी म्हणजे काय?

ज्या कंपनी अशी कामे करत असतात त्यांना बीपीओ कंपनी असे संबोधिले जाते.

बाजारात अॅमेझाॅन सारख्या ज्या मोठमोठ्या ईकाॅमर्स कंपन्या असतात त्यांची भरपुर प्रोडक्ट सर्विसेस मार्केटमध्ये असतात जे ते आपल्या क्लाईंटला पुरविण्याचे काम करतात.

ह्या प्रोडक्ट सर्विसेस विषयी क्लाईंटच्या मनात खुप काही डाऊट समस्या वगैरे असतात.खुप काही प्रश्न असतात जे त्यांना कंपनीला विचारायचे असतात.खुप काही तक्रारी देखील असतात.ज्या त्यांना कंपनीकडे दाखल करायच्या असतात.

ह्या क्लाईंटच्या सर्व समस्या अडीअडचणींना दुर करण्याचे, त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम कंपन्या स्वता न करता बीपीओ दवारे करीत असतात.

कंपनीच्या प्रोडक्ट सर्विस संबंधित ज्या काही शंका तक्रारी अडचणी कस्टमरच्या मनात आहेत ह्या सर्व दुर करण्याचे काम बीपीओ करत असते.

हया सर्व कामांसाठी कंपनी बीपीओ कंपनीला काही ठाराविक रक्कम सुद्धा देत असते.

कंपनीला आऊटसोर्सिंग केल्याने कोणते फायदे होतात?

याने कंपनीला खुप आर्थिक फायदा देखील होत असतो.कंपनीवर कामाचा जास्त ताण देखील पडत नाही.कंपनीला याने आपल्या इतर महत्वाच्या कामांना अधिक वेळ देता येत असतो.

See also  बी एचके फुलफाँर्म - BHK full form in Marathi

याने नवीन कर्मचारींना हायर करण्यासाठी,कंपनीतील नवीन स्टाफला कंपनीतील कामासाठी प्रशिक्षित करण्यासाठी,त्यांचे वेतन देण्यासाठी जो काही खर्च कंपनीला करावा लागणार असतो कंपनीचा तो सर्व खर्च वाचत असतो.

जेव्हा एखादा ग्राहक कंपनीच्या एखाद्या प्रोडक्ट सर्विस विषयी तक्रार करण्यासाठी कंपनीला फोन लावत असतो तेव्हा त्या ग्राहकाचा काॅल कंपनी स्वता उचलत नसते तर त्या कंपनीने हायर केलेली बीपीओ कंपनी हे सर्व काॅल हाताळण्याचे काम करत असते.

बीपीओ कंपनीचे प्रकार कोणकोणते आहेत?

बीपीओ कंपनीचे प्रकार कोणकोणते आहेत?

बीपीओ कंपन्या ह्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात.

१) डोमेस्टिक बीपीओ कंपनी

२) मल्टीनॅशनल बीपीओ कंपनी

१) डोमेस्टिक बीपीओ कंपनी –

ज्या डोमेस्टिक कंपनीचे ग्राहक फक्त एका विशिष्ट देशातील असतात अशी कंपनी एका विशिष्ट देशातील आपल्या क्लाईंटच्या तक्रारी अडचणी समस्या दुर करण्यासाठी डोमेस्टिक बीपीओ कंपनीला हायर करत असते.

२) मल्टीनॅशनल बीपीओ कंपनी –

ज्या इंटरनॅशनल कंपनीचे ग्राहक फक्त एका विशिष्ट देशातील नसतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळ्या देशातील असतात अशी कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या क्लाईंटच्या तक्रारी अडचणी समस्या दुर करण्यासाठी मल्टीनॅशनल बीपीओ कंपनीला हायर करत असते.

मल्टीनॅशनल बीपीओ मध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला डोमेस्टिक बीपीओ कंपनी मध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गापेक्षा जास्त वेतन प्राप्त होते.

बीपीओ कंपनी कोणते काम करते?

बीपीओ कंपनी पुढील दिलेली कामे करीत असतात-

१) डेटा इंट्री करणे

२) कस्टमर केअर सर्विस देणे

३) चॅट सपोर्ट तसेच टेक्नीकल सपोर्ट देणे

४) काॅल सेंटर सर्विस देणे

५) बॅक आॅफिस वर्क करणे

६) फ्रंट आॅफिस वर्क करणे

७) सोशल मिडिया हाताळणे

८) डेटा अॅनलाईज करणे

बीपीओ मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्या अंगी कोणकोणते कला गुण कौशल्य असणे आवश्यक आहे?

बीपीओ मध्ये काम मिळण्यासाठी आपल्या अंगी चांगले संवाद कौशल्य असायला हवे.याचसोबत आपल्याला इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

See also  बालमजुरी विरोधी घोषवाक्ये - Child labor slogans in Marathi

आपल्याला कंप्युटर विषयी मुलभुत माहिती असायला हवी कंप्युटर कसा आॅपरेट करता हे माहीत असायला हवे.

कंप्युटर वर वेगाने टाईप करता येणे आवश्यक आहे.यासाठी आपला टाईपिंग स्पीड चांगला असावा.बीपीओ मध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.

बीपीओ मध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला किती वेतन दिले जाते?

बीपीओ मध्ये काम करत असलेल्या फ्रेशर्सला दरमहा १० ते १५ हजार एवढे वेतन दिले जाते.

अणि समजा आपल्याला बीपीओ मध्ये कामाचा चांगला अनुभव असेल आपले शिक्षण देखील झाले असेल आपल्या अंगी उत्तम कला कौशल्य आहे तर आपणास बीपीओ मध्ये २५ ते ३० हजारांपर्यंत वेतन दिले जाते.