दिब्रुगड जेलविषयी जाणुन घ्यायच्या १० महत्वाच्या गोष्टी – What is Dibrugarh jail famous for?

दिब्रुगड जेलविषयी जाणुन घ्यायच्या १० महत्वाच्या गोष्टी -What is Dibrugarh jail famous for?

पंजाब मध्ये पोलिसांकडुन अटक करण्यात आलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला आसाम येथील दिब्रुगड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

खुप जणांना हा प्रश्न पडला आहे की पंजाब मध्ये अटक करण्यात आलेल्या अमृतपाल सिंग याला पोलिसांनी देशाच्या दुसरया टोकास असलेल्या आसामच्या जेलमध्येच का पाठवले आहे?असे ह्या जेलचे काय वैशिष्ट्य आहे.

आजच्या लेखात आपण ह्या दिब्रुगड जेलचे वैशिष्ट्य अणि याविषयी काही महत्त्वाच्या इतर बाबी जाणुन घेणार आहोत.

दिब्रुगड जेलचे वैशिष्ट्य काय आहे?

दिब्रुगड जेल हे एक अत्यंत सुरक्षित कडक सुरक्षा व्यवस्था असलेले जेल म्हणुन ओळखले जाते.

१)असे सांगितले जाते की हे जेल १७० वर्षांपेक्षा अधिक जुने आहे आजवर कुठलाही गुन्हेगार ह्या जेलमधुन पळाला नाहीये.म्हणजेच यावरून स्पष्ट होते की सुरक्षेच्या दृष्टीने ह्या आसाम येथील जेलमध्ये अमृतपाल सिंग याला त्याच्या साथीदारांसोबत ठेवण्यात आले आहे.

२) अजुन एक महत्वाची बाब म्हणजे हे जेल शहराच्या मध्यभागी असल्याचे सांगितले जात आहे जेणेकरून एखादा गुन्हेगार पळाला तरी देखील पोलिस त्याला तत्काळ पकडु शकतात तो जास्त दुर पळुन जाऊ शकत नाही.

३) दिब्रुगड जेलमध्ये चोवीस तास बहुस्तरीय सुरक्षा ठेवली जाते.

४) अमृतपाल सिंग याला ठेवण्यात आसाम येथील दिब्रुगड तुरूंगात आल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आली आहे.जेलच्या आवारात ब्लँक कॅट कमांडो, सीआरपीएफला तैनात करण्यात आले आहे.

५) ज्या ठिकाणी अमृतपाल अणि त्याच्या इतर साथीदरांना ठेवण्यात आले आहे तिथे नवीन लेटेस्ट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे जेणेकरून अमृतपाल सिंग अणि त्याच्या साथीदारांनी पळण्याचा प्रयत्न केला किंवा काही संशयास्पद हालचाल केली तर तत्काळ पोलिसांना लक्षात येईल.

६) हे जेल खासकरून देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यातील समाविष्ट भारतीयांना ठेवण्यासाठी १८५७ च्या दरम्यान बांधले गेले आहे असे याबाबत सांगितले जाते.

See also  गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ताचा संपुर्ण अर्थ अणि साँग लिरिक्स - Sukhkarta Dukhharta Aarti meaning and song lyrics in Marathi

७) भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर भारत देशाच्या विरोधात हालचाली करणारया अनेक गुन्हेगार व्यक्तींना ह्याच जेलमध्ये ठेवण्यात आले आहे असे देखील ह्या जेलविषयी सांगितले जाते.

८) याआधी इथे उलफा अतिरेकींना ठेवण्यात आले होते पण आता ह्या यादीमध्ये खलिस्तानी समर्थक देखील समाविष्ट झाले आहेत असे आपणास पाहावयास मिळते.

९) हे ईशान्य दिशेला असलेले पहिले काॅक्रेट जेल म्हणुन देखील ओळखले जाते.

१०) राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत ह्या जेलमध्ये ठेवण्यात आलेल्या आरोपींना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आप्तेष्टांना आठवड्यातून दोनदा भेटु दिले जाते पण यासाठी आधी कैद्याला जिल्हा अधिकारींची परवानगी घ्यावी लागते.

अमृतपाल सिंग याला आसाम येथील दिब्रुगड जेलमध्ये का ठेवण्यात आले आहे?

सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अमृतपाल सिंग याला आसाम येथील दिब्रुगड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

याचसोबत असे देखील सांगितले जाते आहे की सुरवातीला अमृतपाल सिंग याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार होते.

पण तिहार जेलमध्ये आधीच पंजाब मधील अनेक गुंडांना ठेवले गेले आहे अशात अमृतपाल सिंग याला देखील तिथे ठेवले तर यांच्या मध्ये संपर्क होऊ शकतो ही भीती शासनाला होती म्हणून अमृतपाल सिंग याला आसाम येथील दिब्रुगड जेलमध्ये इतरांपेक्षा अलिप्त कडक सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.