एच यु आय डी नंबर म्हणजे काय?- What Is HUID Number In Gold Jewelry 

एच यु आय डी नंबर म्हणजे काय? । What Is HUID Number In Gold Jewelry 

अलीकडेच केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडुन‌ एक महत्वाची घोषणा करण्यात आली ज्यात असे स्पष्टपणे सांगितले आहे की

एचयूआयडी क्रमांकाशिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींची विक्री भारतात 1 एप्रिलपासून प्रतिबंधित असणार आहे.

अशावेळी आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला असेल हा एच यु आयडी नंबर काय असतो?याचे एवढे महत्त्व काय आहे?

आपल्या मनात निर्माण झालेल्या ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहे.

आजच्या लेखात आपण एचयूआयडी नंबर म्हणजे काय असतो?याचे महत्त्व तसेच फायदे कोणकोणते आहेत हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

एच यु आय डी नंबर म्हणजे काय? What Is HUID Number In Gold Jewellery 

एच यु आय डी नंबर म्हणजे काय? What Is HUID Number In Gold Jewellery  Image source

जे लोक सध्या सोने खरेदी करण्याच्या विचार करत आहे किंवा तसा बेत आखत आहे अशा व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्वाची सुचना आहे.

आपल्या भारत देशात १ एप्रिल २०२३ पासुन फक्त अशाच सोन्याच्या दागदागिण्यांची तसेच वस्तुंची विक्री केली जाणार आहे.ज्याच्या वर एच यु आयडी कोड तसेच नंबर दिलेला असेल.म्हणजे आता कुठल्याही दुकानदाराला एच यु आयडी नंबर शिवाय आपले जुने दागिने कस्टमरला विकता येणार नाहीये.

एच यु आयडी हा एक हाॅलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन कोड आहे.म्हणजे जसे भारतातील प्रत्येक नागरीकाला तो भारताचा नागरिक आहे हे सिद्ध करण्यासाठी एक आधार नंबर देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे दागिण्याची ओळख पटण्यासाठी देण्यात आलेला एचयूआयडी हा युनिक ओळख क्रमांक तसेच कोड आहे.हा एक सहा अंकी युनिक अल्फा न्युमरीक कोड आहे ज्यात संख्या अणि अक्षरांचा देखील समावेश असतो.

२०२३ मधील महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आणि तारखा 

प्रत्येक ज्वेलरी दुकानदारांकडुन हा नंबर ज्वेलरी वर टाकला जाणे अनिवार्य करण्यात आले आहे.हया नंबर दवारे आपण दागिन्या विषयी सर्व माहिती प्राप्त करू शकतो.जसे की सदर दागिना किती शुद्ध आहे?त्याचे वजन किती आहे?तो दागिना कोणी विकत घेतला आहे.

फक्त त्यासाठी ही माहीती ज्वेलरी दुकानदारांकडुन बी आय एस पोर्टलवर अपलोड केली जाणे आवश्यक आहे.

ग्राहक व्यवहार विभागाकडुन असे सांगितले गेले आहे की एच यु आयडी ही एक अशी सुरक्षित प्रणाली आहे जी कुठल्याही प्रकारे डेटाची गोपनीयता किंवा सुरक्षितता धोक्यात आणत नाही.

यात दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्याला एक युनिक आयडेंटिफायर म्हणजेच दागिण्याला ओळखण्यासाठी एचयूआयडी कोड नियुक्त केला जातो,ज्यामुळे शोधण्यायोग्यता मिळते.

हॉलमार्किंगच्या वैधतेकरीता आणि हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबद्दलच्या तक्रारी हाताळण्याकरीता हे खुप महत्त्वपूर्ण अणि फायदेशीर ठरते.

एच यु आयडीचा फुलफाॅम काय होतो? HUID Full Form In Marathi

एच यु आयडीचा फुलफाॅम Hallmark Unique Identification असा होतो.

एच यु आयडी नंबर ही सिस्टम भारतात कधीपासून लागु करण्यात आली आहे?

एच यु आयडी नंबर ही सिस्टम ही भारत देशात १ जुन २०२१ पासुन लागु करण्यात आली होती.

एच यु आयडीचा फुलफाॅम काय होतो?HUID Full Form In Marathi