हिंदु फोबिया म्हणजे काय? Hindu phobia meaning in Marathi
आज नुकताच अमेरिकेतील जाॅर्जिया नामक राज्यामध्ये हिंदु फोबिया विरोधात एक महत्त्वाचा ठराव पास करण्यात आला आहे.
- ह्या ठरावामध्ये हे नमुद केले आहे की अमेरीकन हिंदु समुदायातील लोकांनी तेथील विविध क्षेत्रात आजपर्यंत आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे.
- उदा, शिक्षण,कला,संगीत,वित्त,माहीती तंत्रज्ञान,विज्ञान,वैद्यक,अभियांत्रिकी,व्यापार उद्योग,आयुवेर्द,योग,ध्यानसाधना,अन्न,संगीत
- ह्या ठरावात हिंदु फोबिया विरोधी प्रस्ताव मांडतांना हे देखील सांगितले आहे की कशापदधतीने अमेरिकन हिंदु समुदायाने तिथे आपले सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देऊन अमेरिका देशातील सांस्कृतिक जडणघडणीत देखील मोलाचा वाटा उचलला आहे.
- ह्या सर्व बाबी दिलेल्या प्रस्तावात हिंदु कट्टरता तसेच हिंदु फोबिया विरोधी प्रस्ताव मांडताना सांगितल्या गेल्या होत्या.
पण आपल्यातील खुप जणांना हेच माहीत नाहीये की हिंदु फोबिया म्हणजे नेमके काय आहे?म्हणून आजच्या लेखात आपण हिंदु फोबिया म्हणजे काय? हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
हिंदु फोबिया म्हणजे काय?
हिंदु फोबिया याचा अर्थ हिंदु भय असा होतो.हिंदु धर्माविषयी लोकांच्या मनात खोटे भय खोटी दहशतीची भावना निर्माण करणे म्हणजे हिंदु फोबिया निर्माण करणे होय.
हा शब्द हिंदु धर्म विरोधी लोकांकडुन हिंदु धर्माला अणि हिंदु धर्मातील संस्कृती जीवनशैली इत्यादी गोष्टींना लक्ष्य करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात आहे.हिंदु फोबिया हा एक हिंदु विषयी द्वेष निर्माण करणारा शब्द आहे.
हिंदु धर्माला एक कटटर हिंसावादी अणि असहिष्णू धर्म म्हणून जगासमोर सिदध करायला,हिंदु धर्माला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करीत आहे.
आपले हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी समाजकंटकांकडुन जागोजागी देशात तसेच परदेशात हा खोटा हिंदु फोबिया निर्माण केला जात आहे.
हिंदु धर्मविरोधी केल्या जात असलेल्या ह्या कटात विविध समाजकंटक,हिंदु धर्म विरोधी नेते,हिंदु धर्माचा द्वेष करणारे लोक इत्यादींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक चित्रपटांमध्ये कधीकधी हिंदु धर्माविषयी चुकीच्या बाबी चुकीची दृश्ये दाखवली जातात,हिंदु धर्माविषयी चुकीचा प्रचार प्रसार केला जातो.हिंदु देवी देवतांवर टिका टिप्पणी केली जाते.
ज्यामुळे लाखो करोडो हिंदु धर्मातील लोकांच्या धार्मिक भावना देखील दुखावत असतात.हा सुदधा एक हिंदु फोबियाचाच एक प्रकार म्हणता येईल.ज्याला निषेध म्हणून आज आपणास अनेक हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर देखील आंदोलन करण्यासाठी उतरताना दिसून येतात.
पण मुळात पाहायला गेले तर आपला हिंदू धर्म हा एक अत्यंत सहिष्णुता वादी धर्म आहे.हिंदु धर्मातील सर्व लोक बंधुभावाने एकमेकांशी वागतात.कोणाविषही कुठलाही द्वेष जगात मानत नाही.
अणि ह्याच सर्व बाबी अमेरिका देशातील जाॅर्जिया राज्यातील समितीत मांडल्या गेलेल्या ठरावात देखील नमुद केल्या गेल्या आहेत.
काय म्हटले आहे अमेरिकेतील जाॅर्जिया मधील सादर करण्यात आलेल्या ह्या ठरावात?
- हिंदु धर्म हा जगातील सर्वात जुना अणि मोठा धर्म आहे.
हिंदु धर्माचे आजवर संपुर्ण जगात शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये कोट्यवधी अनुयायी आहेत. - हिंदु धर्मामधील लोकांमध्ये एकमेकांप्रती शांती अणि सन्मानाची भावना देखील आहे.यामुळे आजपर्यंत हा हिंदू समुदाय अमेरिकेतील जाॅर्जिया मध्ये गुण्यागोविंदाने राहत आहे.