QCVM Machine म्हणजे काय? | What is QCVM Machine?

What is QCVM Machine

QCVM machine म्हणजे काय? | What is QCVM Machine

देशातील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात निर्माण होणारा काॅईन्सचा तुटवडा दुर करण्यासाठी आरबी आयकडुन एक महत्वाची घोषणा केली आहे.

आरबी आयकडुन तब्बल बारा शहरांमध्ये १९ ठिकाणी क्यु आर कोडवर आधारीत काॅईन‌ वेडिंग मशिनचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे.

यामुळे आता नागरीकांना क्यु आर कोड स्कॅन करून अणि युपीआय दवारे पेमेंट करून काॅईन वेडिंग मशिनमधुन नाणे काढता येणार आहे.

अणि हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर बॅकाना देखील असे मशिन बसवण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.

याने नागरीकांना अनेक फायदे होणार आहे जसे की नाणी प्राप्त होतील.मशिनचा उपयोग करून नाण्यांचे वितरण करणे सुलभ होणार आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच QCVM मशिन विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

What is QCVM Machine
What is QCVM Machine

QCVM चा फुलफाॅम काय होतो?

क्यु सीव्ही एमचा फुलफाॅम qr code based coin vending machine असा होतो.

QCVM मशिन काय आहे?

हे एक आॅटोमॅटेड मशिन आहे.यादवारे आपणास नोटांच्या जागी काॅईन वितरीत केले जाणार आहे.हे मशिन नोट ऐवजी युपी आय द्वारे आपल्या अकाऊंट मधुन पैसे स्वीकारते अणि त्या किंमतीची नाणी देण्याचे काम करते.

हे सर्व आपण सविस्तरपणे एका उदाहरणादवारे समजुन घेऊया.

उदा,

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला एअरपोर्ट तसेच रेल्वे स्टेशनवर जागोजागी वेडिंग मशिन लावलेले दिसुन येत असतात.

नाॅरमल वेडिंग मशिन मध्ये जे खाण्या पिण्याचे पदार्थ असतात ते मशिन मध्ये नोट टाकल्यावर आपणास प्राप्त होत असतात.

किंवा सध्या एक नवीन पदधत आली आहे ज्यात आपणास वेडिंग मशिनवर एक क्यु आर कोड दिला जातो.यात आपल्याला हा दिलेला क्यु आर कोड स्कॅन करावा लागतो अणि आपल्या मोबाईल दवारे पेमेंट करावे लागते.यात आपल्याला आॅटोमॅटीकली निवडता येते आपल्याला कोणते पेय तसेच खाद्य पदार्थ हवे आहे ते.यानंतर ते खाद्य पेय आपणास मशिन द्वारे मिळुन जात असते.

एकदम याचप्रमाणे हया नवीन आलेल्या पद्धतीत जर समजा आपल्याला रिक्षाचालकाला किंवा भाजीवाला वाला यांना पैसे देण्यासाठी काॅईन हवे आहे.

अणि आपल्या कडे खिशात काॅईन उपलब्ध नसेल तेव्हा आपल्या आजुबाजुला आर बी आय दवारे लावण्यात आलेले अशा प्रकारचे क्युआर कोड आधारीत काॅईन वेडिंग मशिन उपलब्ध असेल तर आपण तिथे त्या मशिनवर दिलेल्या क्यु आर कोडला स्कॅन करून युपीआय दवारे पेमेंट करायचे आहे.

समजा आपल्याला एक रूपयाचे बारा काॅइन हवे असतील तर आपल्याला युपी आयदवारे पेमेंट करायचे आहे अणि आपल्याला एक रूपयाचे बारा काॅइन हवे आहे असे पेमेंट करताना सिलेक्ट करायचे आहे.यानंतर आपणास बारा काॅईन मिळून जातील.

फक्त पेमेंट हे आपणास युपीआय दवारेच करावे लागणार आहे.

Vloggers साठी उपयोगी युट्युब टुल्स । Useful YouTube tools for Vloggers In Marathi

आरबी आयचा हे काॅईन वेडिंग मशिन सुरू करण्याचा मुख्य हेतु काय आहे?

आर बी आयचे असे म्हणने आहे की आपल्या भारत देशात जेवढेही काॅईन आहेत त्यांचे योग्यरीत्या वितरण व्हायला हवे.यात सुधारणा घडुन यायला हवी.

भारताच्या एका विभागात विपुल प्रमाणात काॅईन उपलब्ध आहे काॅईनचा पुरवठा देखील अधिक आहे अणि दुसरया विभागात लोकांना काॅईनची आवश्यकता आहे

पण त्यांना काॅईन उपलब्ध होत नाहीये असा प्रकार कुठेही घडु नये आपल्या देशात जेवढेही काॅईन आहेत त्यांचे योग्यरीत्या वितरण व्हायला हवे म्हणून आरबी आयने हा क्यु आर कोड आधारित काॅईन वेडिंग मशिनचा पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे.

प्रोजेक्ट कुठे लाॅच केला जाईल?

आर बी आयकडुन आपल्या भारत देशात तब्बल बारा शहरांमध्ये १९ ठिकाणी रेल्वे स्टेशनवर शाॅपिंग माॅल्स मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी हे क्युआर कोड आधारीत वेडिंग मशिन बसवले जाईल.

यानंतर ह्या प्रोजेक्ट मध्ये काय गडबड आहे समस्या आहे हे बघितले जाईल हा प्रोजेक्ट व्यवस्थित काम करतो आहे की नाही याची चाचपणी केली जाईल मग सर्व गोष्टींचा अभ्यास करून झाल्यावर संपुर्ण भारतात हा प्रोजेक्ट लाॅच केला जाणार आहे.

ऍपलचा हा व्हिडिओ ऍक्सेसिबल तंत्रज्ञानाचे दैनंदिन प्रभाव दाखवतो । व्हिडिओ पहा

बॅक नोट द्वारे काॅईन काढता येत असताना आर बी आयने युपीआय सिस्टम का आणले?

आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला असेल की काॅईन वेडिंग मशिन मध्ये नोट टाकुन जर आपण काॅईन प्राप्त करू शकतो तरी देखील आरबी आयने हे युपी आय सिस्टम का सू्रू केले.

याला देखील एक महत्वाचे कारण आहे.आरबी आयचे असे म्हणने आहे की आरबी आयने खुप ठिकाणी मार्केट आवारात असे मशिन बसवले होते ज्यात लोक नोट टाकतील अणि त्याबदल्यात त्यांना काॅईन मिळतील.

पण काही व्यक्ती वेडिंग मशिन मध्ये फेक नोट ओळखण्याची सिस्टम नसल्याने बनावट बॅकेच्या नोटा टाकुन काॅईन काढता आहे असे आरबी आयच्या निदर्शनास आले.

म्हणुन आरबी आयने युपीआय पेमेंट सिस्टम सुरू करण्याचे ठरवले जेणेकरून लोकांना आपल्या मोबाईल मधुन युपीआय दवारे सहजपणे पेमेंट पण करता येईल अणि त्यांना काॅईन पण उपलब्ध होऊन जातील.अणि पुन्हा असा फसवणुकीचा प्रकार देखील घडणार नाही.

याचसोबत देशातील सर्व भागात नागरीकांना समान पद्धतीने काॅईन उपलब्ध व्हावे एका भागात काॅईन भरपुर आहेत अणि दुसरीकडे पुरेसे काॅईन उपलब्ध नाही अशी काॅईन उपलब्धीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी म्हणून आरबी आयने हा क्यु आर कोड आधारित काॅईन वेडिंग मशिनचा पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे.