SBI ने माझ्या खात्यातून 206.5 रुपये का कापले? Why SBI deducted RS 206.5 from my account in Marathi

SBI ने माझ्या खात्यातून 206.5 रुपये का कापले?Why SBI deducted RS 206.5 from my account in Marathi

मित्रांनो एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने जर तुमच्या बचत खात्यातून काही पैशांची कपात केली आहे.म्हणजेच तुम्हाला न कळवता तुमच्या खात्यातून पैसे कट केले आहे.तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

ज्या एसबीआय खातेधारकांच्या बचत खात्यातुन २०६.५ रूपये इतकी कपात करण्यात आली आहे.त्यांना हे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे की बॅकेने आपल्या खात्यातून हे पैसे का कट केले आहे.

जर तुम्ही एसबीआय ह्या बँकेचे खातेधारक आहात अणि तुम्ही एसबीआय कडुन आपल्या कस्टमरला दिल्या जात असलेल्या सर्व बॅकिंग सेवांचा सुविधांचा देखील लाभ घेत आहात.

अणि बॅकेने अचानक तुमच्या खात्यातून काही रक्कम डेबिट केली आहे.तर अजिबात घाबरू नका कोणीही अज्ञात व्यक्तीने तुमच्या खात्यातून पैसे काढलेले नाहीये.

कारण ही रक्कम एसबीआय बॅकेकडुन वर्षातुन एकदा प्रत्येक एसबीआय कडुन बॅकिंग सेवा दिल्या जाणारया ग्राहकांच्या बचत खात्यातुन वजा तसेच कपात केली जाते.

ही कपात केली जात असलेली रक्कम ही १४७.५ रूपये किंवा २०६.५ रूपये २९५ रूपये अशी असु शकते.

मित्रांनो अचानक आपल्या खात्यातून काही पैसे अचानक डेबिट होत असतात अशा वेळी साहजिकच आहे की आपल्या मनात शंका तसेच प्रश्न निर्माण होणार की

मी आज दिवसभरात कोणताही आॅनलाईन पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार केला नाही कोणाला पैसे पाठवले नाही,किंवा एटीएम वर जाऊन माझ्या खात्यातुन पैसेही काढले नाहीत.तरी देखील बॅकेने माझ्या सेविंग खात्यातुन पैसे का कापले?कोणी माझ्या नकळत माझ्या खात्यातुन पैसे तर काढले नाही ना?

पण असे काहीही नाहीये मित्रांनो फक्त एकाच व्यक्तीच्या नव्हे तर एसबीआय मध्ये खाते असलेल्या अणि एसबीआय कडुन दिल्या जाणारया सर्व बॅकिंग सुविधांचा लाभ घेणारया प्रत्येक ग्राहकाकडुन दरवर्षी १४७.५,२०६.५,२९५ एवढी रक्कम खात्यातुन वजा करून घेतली जात असते.ही रक्कम दरवर्षी एकदाच कपात केली जाते

See also  बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू का मानले? legacy of Mahatma Phule and Dr. BR Ambedkar -

अणि अशा एसबीआय बॅक खातेधारकांच्या खात्यातुनच वजा केली जाते जे एसबी आयच्या बॅकिंग सेवांचा सुविधांचा लाभ घेत आहेत.

उदा,जे खातेधारक युवा,गोल्ड,कॉम्बो किंवा माय कार्ड (इमेज) डेबिट कार्ड/एटीएम कार्ड इत्यादी अशा आॅनलाईन पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बॅकेकडुन पुरविल्या जात असलेल्या बॅकिंग सेवांचा सुविधांचा लाभ उठवत आहेत अशा खातेधारकांच्या बचत खात्यातुन बॅक ही रक्कम दरवर्षी एकदा डेबिट करत असते.

ही रक्कम वार्षिक देखभाल शुल्क annual maintenance charge म्हणुन वजा केली जात असते.

जे ग्राहक एसबीआयचे डेबिट कार्ड एटीएम कार्ड वापरत असतात त्यांना हा १७५ +३१.५ रूपये इतका चार्ज भरावा लागतो.

ह्या व्यवहारावर साधारणत १८ टक्के इतका जीएसटी लागत असल्याने बाकीचे ३१.५ रूपये जीएसटी रककमेमध्ये जोडले जात असतात.असे एकुण १७५+३१.५ मिळुन २०६.५ रूपये आपल्या खात्यातून एसबीआय डेबिट करत असते.

आशा करतो आता तुम्हाला कळाले असेल की दरवर्षी  एसबीआय बॅक खातेधारकांच्या बचत खात्यातुन २०६.५ रूपये इतके पैसे कट का होत असतात.