जागतिक बॅकेने दक्षिण आशियातील पहिला रोड सेफ्टी प्रोजेक्ट ह्या देशात केला लाॅच -World Bank launches its first road safety project in South Asia

जागतिक बॅकेने दक्षिण आशियातील पहिला रोड सेफ्टी प्रोजेक्ट -World Bank launches its first road safety project in South Asia

जागतिक बॅकेने दक्षिण आशियातील सर्वात पहिला रोड सेफ्टी प्रोजेक्ट नुकताच भारताच्या शेजारील देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेश ह्या देशात लाॅच केला आहे.

ह्या प्रोजेक्ट करीता जागतिक बॅक अणि बांगलादेश सरकार मध्ये ढाका येथे ३५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा एक करार देखील झाला आहे.

World Bank launches its first road safety project in South Asia
World Bank launches its first road safety project in South Asia

जागतिक बॅकेने बांगलादेश आणि ढाका सोबत सुरू केलेला आशियातील आपला पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प आहे.

हया प्रकल्पाची अंमलबजावणी सर्वप्रथम बांगलादेश मधील दोन राष्ट्रीय महामार्गावर केली जाणार आहे ह्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे नाव गाझीपुर एलेंगा एन 4 अणि नाटुर नवाजगंज एन 6 असे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जागतिक बँकेने 14 जून 2023 रोजी बांगलादेश सरकारसोबत ढाका येथे स्वाक्षरी केलेल्या USD 358 दशलक्ष वित्तपुरवठा करारासह दक्षिण आशियातील आपला पहिला समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केला आहे.

ह्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बांगलादेशचे दोन राष्ट्रीय महामार्ग गाझीपूर एलेंगा N4 आणि नाटोर नवाबगंज N6 यांची निवड करण्यात आली आहे.

ह्या प्रकल्पामुळे या दोन्ही मार्गावरील रस्ते वाहतूक मृत्यू 30 टक्क्यांहून अधिक कमी होण्यास मदत होणार आहे.

हा प्रकल्प सुधारित अभियांत्रिकी डिझाइन,चिन्ह आणि चिन्हांकन, शपादचारी सुविधा,गती अंमलबजावणी आणि आपत्कालीन काळजी यासह सर्वसमावेशक रस्ता सुरक्षा उपायांचा प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करेल.

अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी बांगलादेशातील ढाका,खुलना,राजशाही,रंगपूर आणि मैमनसिंग या पाच विभागांतून जाणाऱ्या दोन महामार्गांवर रस्ते चिन्हे, दुभाजक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर आणि बस बे बांधले जाणार आहेत.

हा प्रकल्प टोल फ्री क्रमांकासह दुचाकी रुग्णवाहिकांसह रुग्णवाहिका सेवा प्रायोगिक तत्त्वावर चालवेल.जी रस्ते अपघातातील जखमींना त्वरीत रुग्णालयात पोहोचवेल.

See also  भारत बनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश -Chandrayaan3 makes a soft landing on the Moon.