जागतिक अस्थमा दिवसाचे महत्त्व काय आहे? – World Asthma Day

जागतिक अस्थमा दिवसाचे महत्त्व काय आहे? – World Asthma Day

World Asthma Day
World Asthma Day

आज २ मे २०२३ आहे म्हणजेच जागतिक अस्थमा दिवस आहे.दरवर्षी मे महिन्या मध्ये पहिल्या मंगळवारच्या दिवशी हा जागतिक अस्थमा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जात असतो.

ह्यावेळी २०२३ मध्ये मे महिन्यात २ मे रोजी मे महिन्यातील पहिला मंगळवार आहे म्हणून २ मे २०२३ रोजी ह्या वर्षीचा जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जाणार आहे.

ह्या वर्षीची जागतिक अस्थमा दिवसाची थीम asthma care for all अशी ठेवण्यात आली आहे.

दरवर्षी लोकांमध्ये अस्थमा ह्या श्वसनाशी संबंधित असलेल्या आजाराविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

ह्यावर काय उपचार केला जाऊ शकतो कशापदधतीने उपचार केला जाऊ शकतो ह्या आजारांपासून बचाव कसा करायचा याविषयी समाजात जागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो.

दमा हा एक श्वाच्छोश्वासाशी संबंधित आजार आहे.हा आजार जडलेल्या व्यक्तींना लवकर दम लागत असतो अणि श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो.अणि कधी कधी वेळेवर उपचार प्राप्त न झाल्याने ह्या आजारामुळे रूग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

हा श्वसनाशी संबंधित आजार लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रौढ लोकांपर्यंत कोणालाही जडु शकतो.

ह्या दिवशी अस्थमाला प्रतिबंध कसा घालायचा त्यापासून आपला बचाव कसा करावा याबाबत जनजागृती केली जाते.

अनेक तज्ञ डॉक्टर देखील आपणास नेहमी सल्ला देत असतात की ज्या रूग्णांना दम्याच्या आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे.अशा व्यक्तींनी आपल्या रोजच्या आहारात अणि जीवनशैलीत परिवर्तन घडवुन आणायला हवे.

जागतिक अस्थमा दिवस साजरा करण्यास आरंभ हा १९९३ मध्ये करण्यात आला होता.हा दिवस साजरा करण्यास आरंभ global initiative for asthma ने जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने केला असल्याचे सांगितले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मांडलेल्या मतानुसार आज जगात ३४५ मिलियन पेक्षा अधिक व्यक्ती अस्थमा ह्या आजाराने ग्रस्त तसेच पीडीत आहेत.२०१६ मधील हाती आलेल्या अहवालात असे दिले आहे की ह्या आजारामुळे २०१६ मध्ये ४१५,९२० इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे.

See also  सोलो ट्रिप करण्याचे फायदे - Solo trip benefits in Marathi

दरवर्षी हा जागतिक अस्थमा दिवस एका खास थीम सोबत साजरा केला जात असतो ह्यावर्षी हा दिवस अस्थमा केअर फाॅर आॅल सर्वांसाठी दम्याची काळजी ह्या थीमसोबत जागतिक पातळीवर साजरा केला जाणार आहे.

हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे दमा आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने त्यांच्या मध्ये ह्या आजारा विषयी जागृकता निर्माण करणे हा आहे.

आपणास दम्यापासुन बचाव कसा करता येऊ शकतो?

दम्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आपणास योगासने करणे आवश्यक आहे ज्यात सुर्यनमस्कार प्राणायम भूजंगासन इत्यादी योगासनांच्या प्रकाराचा समावेश होतो.

दम्याचा आजार असलेल्या रूग्णांनी हिरवा भाजीपाला विपुल प्रमाणात आहारात समाविष्ट करायला हवा जीवनसत्त्व ई क अणि अ असलेल्या अन्न पदार्थाचे अधिक सेवन करायला हवे.

बाहेर रस्त्याने जात असताना नाका तोंडात धुळ घाण जाऊ नये म्हणून तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधायला हवा.