तिहार जेल विषयी जाणुन घ्यायची रोचक तथ्ये-Amazing facts about Tihar jail in Marathi-

तिहार जेल विषयी जाणुन घ्यायची रोचक तथ्ये amazing facts about tihar jail in Marathi

दिल्ली मधील रोहिणी कोर्ट गोळीबारातील मुख्य आरोपी असलेल्या गॅगेस्टर तिल्लु ताजपुरीया याची तिहार जेलमध्ये प्रतिस्पर्धी टोळीमधील व्यक्तींकडुन हत्या करण्यात आली असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.

ह्याच निमित्ताने आजच्या लेखात आपण दिल्ली येथील तिहार जेलविषयी काही महत्त्वाची रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.

 • किरण बेदी जेव्हा तिहार जेल येथील इन्चार्ज होत्या तेव्हा त्यांनी इथे विपश्यना केंद्राची स्थापना केली होती.हया विपश्यना केंद्राची वर्ग सुरूवातीला जीएन गोयंका यांनी घेतले होते.
 • तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका कैदीने आय ए एसची परीक्षा देखील उत्तीर्ण केली असल्याचे सांगितले जाते.
 • तिहार जेलमध्ये दोन कैदींनी २०१५ दरम्यान दहा फुट लांब इतकी सुरंग खोदुन पळण्याचा प्रयत्न केला होता ज्यात एक पळुन जाण्यात यशस्वी ठरला तसेच एक कैदीला पकडण्यात तिहार जेल मधील पोलिसांना यश प्राप्त झाले होते.
 • भारतातील सर्वात मोठे जेल म्हणुन तिहार जेल ओळखले जाते इथे देशातील मोठमोठे गॅगस्टर आरोपी गुन्हेगार यांना डांबुन ठेवण्यात येत असते.
 • तिहार जेल हे दक्षिण आशिया मधील सर्वात मोठे जेल म्हणुन ओळखले जाते.
 • तिहार जेल याला तिहार आश्रम असे देखील म्हटले जाते.
 • तिहार जेलमध्ये का कैद्यांना ठेवण्यास आरंभ १९५७ पासुन करण्यात आला होता.यानंतर १९८४ मध्ये तिहार जेलच्या आजुबाजुला असलेला परिसर देखील तिहार जेल सोबत जोडला गेला अणि मग ह्या पुर्ण काॅम्पलेक्सला तिहार जेल असे नाव देण्यात आले होते.
 • सध्या तिहार जेल हे दिल्ली कारागृह डिपार्टमेंटच्या वतीने चालविण्यात येत आहे.याचे सध्या ९ नॅशनल जेल आहे.हे दिल्ली क्षेत्रात असलेल्या दोन कारागृहांपैकी एक मानले जाते.
 • दुसरया कारागृहाचे नाव रोहिणी कारागृह काॅम्पलेक्स असे असल्याचे सांगितले जाते.
 • पी चिदंबरम जे भारताचे भुतकाळातील अर्थमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांना २०१९ दरम्यान एका घोटाळ्यात अटक करण्यात आली होती अणि तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते.पण नंतर त्यांची जामीनावर सुटका देखील झाली होती.
 • तिहार जेलमध्ये एकूण सहा हजार कैदींना ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे.
 • तिहार जेल येथील प्रशासनाचे असे म्हणने आहे की तिहार हे जेल नसुन एक मानवाच्या वाईट वृत्ती मध्ये परिवर्तन घडवुन आणणारी संस्था आहे.येथील आलेल्या प्रत्येक कैद्याला मानवतेची शिकवण देत माणसात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो.
 • येथील शिक्षा भोगलेल्या कैदींना पुन्हा नव्याने आपल्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहित देखील केले जाते.
 • टीजे एस हा तिहार जेलचा ब्रॅड म्हणून ओळखला जातो.असे सांगितले जाते की ह्या ब्रॅड अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सर्व वस्तू प्रोडक्ट येथील जेल मधील कैदी बनवतात असे सांगितले जाते.
See also  पुस्तक परीक्षण - ईकिगाई - Book Review of Ikigai in Marathi