जागतिक हास्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – World laughter day in Marathi

जागतिक हास्य दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?world laughter day in Marathi

आज जागतिक हास्य दिवस आहे.संपुर्ण जगाला हसण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येत असतो.

World laughter day
World laughter day

हास्याला आपल्या मानवी जीवनात खुप अनन्यसाधारण महत्त्व आहे.कारण हास्यामुळेच आपल्या निरस जीवनाला रस प्राप्त होत असतो.हास्याने आपले मन नेहमी प्रफुल्लित राहत असते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर हसणे ही आपल्या जीवनाची महत्वपूर्ण अशी शक्ती आहे.

खळखळुन हसल्याने केवळ आपला चेहरा तसेच बाहय व्यक्तीमत्व खुलून दिसत नसते तर आपले मन देखील आनंदी राहत असते.कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी हास्य हे एक उत्तम औषध मानले जाते.

हास्यामध्येच मानवाच्या उत्तम निरोगी अणि दीर्घायुष्याचे रहस्य दडलेले असल्याचे सांगितले जाते.हसल्याने आपले गंभीरातील गंभीर आजार देखील लवकर बरे होत असतात.

Date of Mothers Day 2023 : मदर्स डे कधी आहे? इतिहास आणि महत्त्व

हास्याचे आपल्या जीवनात असलेले हेच महत्व पटवून देण्यासाठी आपण दरवर्षी जागतिक हास्य दिवस साजरा करत असतो.

आज अनेक अशा स्वयंसेवी संस्था आहेत.ज्यांच्या कडुन हास्याशी संबंधित विविध महत्वपूर्ण उपक्रम राबविले जातात.

जागोजागी आपणास मोठमोठे प्रौढ वृद्ध व्यक्ती एकत्रितपणे सकाळी सकाळी हास्य क्लब मध्ये हा हा हा असे जोरजोराने हसताना दिसतात म्हणजेच लाफिंग करताना दिसतात.

याचा मुख्य हेतु हा आपले आरोग्य उत्तम राहावे आपले मन नेहमी आनंदी राहावे असा आहे.

आज घराघरात जेवढेही टिव्ही सेट आॅफ बाॅक्स डीटीएच लावले जातात त्यावर लोक अधिककरून मनोरंजनासाठी हास्याचे काॅमेडी चित्रपट तसेच मालिका पाहणे अधिक पसंद करत असतात.

हसल्याने आपला खराब मुड देखील चांगल्या मुडमध्ये झटक्यात परिवर्तित होत असतो.हसयाने आपणास विविध प्रकारचे शारीरिक मानसिक सामाजिक लाभ प्राप्त होत असतात.

जागतिक पातळीवर हास्य दिवस साजरा करायला आरंभ १० मे १९९८ रोजी डाॅक्टर मदन कटारीया यांनी मुंबई शहरात केला असल्याचे सांगितले जाते.

See also  इलाॅन मस्कने बदलला टविटरचा लोगो - Elon Musk changed Twitter logo

ह्या खास दिवसाची सुरुवात लोकांना हास्याचे महत्व पटवून देण्यासाठी हसण्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी परस्परात तणाव कमी करण्यासाठी करण्यात आली होती.

आज आपणास जागोजागी उद्याने बागबगीचे मैदाने ही रोज सकाळच्या वेळी तरूण वृद्ध प्रौढ व्यक्तींच्या हास्याच्या गर्जनेने भरलेली दिसुन येतात.

जागतिक हास्य दिवसाच्या दिवशी आनंदाला विशेष प्राधान्य दिले जाते.स्वताही हसुन आनंदी राहण्याचा अणि इतरांचा देखील हसवून आनंदी करण्याचा हा दिवस आहे.इतरांना हसविण्यासाठी आपण एखादा विनोद किस्सा सांगु शकतो.

हसण्याचे फायदे कोणते असतात?

हसल्याने आपल्या मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती मध्ये वाढ होत असते.

हसल्याने आपले सर्व आजार लवकर बरे होत असतात.

हसल्याने आपले मानसिक आरोग्य देखील उत्तम राहते.

हसल्याने आपल्या शरीरामधील कारटीसोलची पातळी वाढुन आपला सर्व ताणतणाव चिंता कमी होत असते.

हसल्याने आपापासतील नात्यातील दुरावा अंतर नाहीसे होते.आपापसात असलेली वैमनस्य तसेच देषाची भावना दुर होण्यास मदत होते.

हसल्याने आपले व्यक्तीमत्व अधिक खुलुन दिसते.

हास्य आपणास सकारात्मक बनवत असते.