मेघदूत आणि दामिनी अँप – शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित हवामान सल्ला देईल.

मेघदूत आणि दामिनी अँप

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित हवामान सल्ला

मेघदूत

भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र आणि भारतीय कृषि संशोधन परिषदेने विकसित केलेले ‘मेघदूत अँप” हे अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना आपले नाव, मोबाईल क्रमांक, राज्य आणि जिल्हा निवडून, नोंदणी करून वापरता येईल.

‘मेघदूत अँप” हे १० भाषांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, उडिया, बंगाली, कन्नड इत्यादी भाषांचा समावेश आहे. मेघदूत अँप हे तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा,ढगांची स्थिती इत्यादी घटकांचा अंदाज शेतकऱ्यांना पुरविते. मेघदूत अँप हे सामाजिक माध्यमे जसे की व्हॉट्सअप आणि फेसबुक इत्यादिबरोबर

एकत्रित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळवून देण्याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मेघदूत हे अँप उपलब्ध केले असून

हे अँप शेतकऱ्यांना विशेषतः स्थान, पीक परिस्थिती, पशू-पक्षी व्यवस्थापन हवामान आधारित सल्ला देईल.

‘मेघदूत अँप’द्रारे शेतकऱ्यांना तापमान, पाऊस, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या संबंधित घटक जेशेती कामात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांचा अंदाज पुरविते त्याबरोबरच पीक व्यवस्थापन (पेरणी, सिंचन, खते, पीक संरक्षण इत्यादी.) आणि जनावरांच्या व्यवस्थापनासाठी मदत करते.

प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी आठवड्यातून माहिती मेघदूत अँपमध्ये अद्ययावत केली जाते.

वापरकर्त्या शेतकऱ्यांना त्यांचे नाव, ‘प्रमणध्वनी क्रमांक आणि जिल्ह्याचे स्थान नोंदवावे लागेल. जेणेकरून त्यांना क्षेत्राशी संबंधित माहिती मिळू शकेल.

मेघदूत अँपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेत आपल्या पिकांचे यथायोग्य नियोजन करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचं संभाव्य नुकसानही टाळण्यास हातभार लागणार आहे.

यापूर्वी एसएमएसद्वारे (5४5) आणि संकेतस्थळावर माहिती दिली जात होती. मात्र, या अँपमुळे आता शेतकऱ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल.

मेघदूत अँपच्या माध्यमातून देशभरातील ६५८ जिल्ह्यात माहिती दिली जाते.

मेघदूत अँपमध्ये शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होत आहे.

पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार असून पिकाला फायदा होणार आहे.

See also  महाराष्ट्र राज्याविषयी महत्वपुर्ण माहिती - Maharashtra information in Marathi

मेघदूत अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी एका क्लिकवर हवामान विभाग आणि कृषि विभागाशी संबंधित सल्ला मिळणार आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अगदी बांधावर उभे राहून शेतकऱ्यांना माहिती मिळेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.

मेघदूत अँप गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

मेघदत अप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे .

दामिनी : विजेची पूर्वसूचना देणारे मोबाईल अँप

मेघदूत आणि दामिनी अँप
मेघदूत आणि दामिनी अँप

शेतकऱ्यांना विजांसह होणाऱ्या पावसाचा अंदाज कळावा तसेच अंदाजाप्रमाणे शेती आणि शेतातील कामाचे यथोचित नियोजन करण्यासाठी भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने ‘दामिनी* हे मोबाईल ऑप्लिकेशन विकसित केले आहे.

दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनमुळे शेतकरी बांधवांना वादळी पाऊस तसेच विजेच्या कडकडाटाचे पूर्वानुमान अर्धा ते एक तास आधी मिळणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी मोबाईल अँप्लिकेशन विकसित केले असून त्याच्या वापरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच शहरी भागातील विजेच्या कोसळण्यामुळे होणारे नागरिकांचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे.

उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेने दामिनी या मोबाईल अँप्लिकेशनसाठी लाईटनिंग लोकेशन मोडेल विकसित केले असून माहितीचे संकलन करण्यासाठी निरनिराळ्या भागात सेन्सर बसविले आहे.

दोनशे कि.मी. पर्यंत होणाऱ्या विजेच्या घडामोडी जाणून घेण्याची क्षमता ही प्रत्येक सेन्सर मध्ये आहे

दामिनी या मोबाईल ऑप्लिकेशनद्वारे शेतकरी तसेच नागरिकांना विजांच्या कडकडाटाचा अंदाज अर्धा तास आधी मिळत असल्यामुळे त्यांना शेतात काम करताना सुरक्षितस्थळी जाणे शक्‍य होणार आहे.

वादळी वाऱ्यांबरोबर होणारा पाऊस आणि वीज कोसळण्याच्या संभाव्य आपत्ती टाळणे शक्‍य होणार आहे.

दामिनी अँप डाऊनलोड करण्यासाठी इथे लिंक करावे

दामिनी अँप डाऊनलोड केल्यानंतर आपणास आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिन कोड व व्यवसाय इत्यादी माहिती समाविष्ट करून नोंदणी करावी. तसेच आपल्या फोनमध्ये लोकेशन एक्सेसला परवानगी द्यावी.