सीता नवमीचे महत्व काय आहे? ह्या दिवशी सीतेचे पुजन केल्याने कोणते लाभ प्राप्त होतात?

सीता नवमीचे महत्व काय आहे? ह्या दिवशी सीतेचे पुजन केल्याने कोणते लाभ प्राप्त होतात?

आज २९ एप्रिल म्हणजे श्रीरामाच्या पत्नी माता सीता यांच्या नवमीचा दिवस आहे.माता सीता यांनीच हनुमानाला चिऱंजिवित्वाचे वरदान दिले होते.

सीता नवमीचे महत्व काय आहे
सीता नवमीचे महत्व काय आहे

आज माता सीता अणि प्रभु श्रीराम हे एक आदर्श दांपत्य म्हणून ओळखले जाते.माता सीता एक आदर्श पत्नी असणयासोबत एक आदर्श कन्या, आदर्श माता अणि आदर्श सुन देखील होत्या.

धर्मग्रंथात असे सांगितले गेले आहे की कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने माता सीतेचे पुजन केले तर त्याच्यावर येणारी सर्व संकटे विपदा अडीअडचणी दूर होत असतात.

असे म्हटले जाते की ह्या दिवशी माता सीता त्रेतायुगात पुष्य ह्या नक्षत्रामध्ये अवतरली होती त्यामुळे २९ एप्रिल ह्या दिवशी सीतानवमी साजरी केली जात असते.

सीता नवमी ही वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा करण्यात येत असते.

ज्या स्त्री किंवा पुरुषाला आपल्या जीवनातील कुठलीही समस्या अडीअडचण,रोगराई आजार,घरगुती वादविवाद इत्यादी समस्या दूर करायची असेल त्याने ह्या दिवशी माता सीतेचे पुजन करायला हवे.

सीतानवमीला आरंभ हा काल २८ एप्रिल रोजीच संध्याकाळच्या वेळी चार वाजुन एक मिनिटांनी प्रारंभ झाला होता अणि आज २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजुन बावीस मिनिटांनी हा कालावधी संपणार आहे.

पुजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी दहा वाजुन अठ्ठावन्न मिनिटे ते दुपारी १ वाजुन अठोतीस मिनिट असा असणार आहे.

आजच्या दिवशी माता सीतेचे अणि श्रीरामाची मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने पुजा अर्चा केली जाते.आजच्या दिवशी उपवास देखील केला जातो.

असे म्हटले जाते की ह्या दिवशी देवी सीतेची उपासना केल्याने नवविवाहीत स्त्रियांना संततीची प्राप्ती होती.पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून देखील स्त्रिया पुजा करतात.

See also  जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढायचे? - 2023 Jeevan Pramaan Patra Online Marathi information

घरातील‌ सर्व भांडण तंटा वादविवाद कलह दूर होत असतात.

आपणास अणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना निरोगी जीवन प्राप्त होते.

सीता नवमीचे महत्व काय आहे
सीता नवमीचे महत्व काय आहे

सीता जन्माची कथा –

असे सांगितले जाते की जमिनीचे खोदकाम करत असताना जनक ह्या राजाला एक भांड्यामध्ये एक कन्या सापडली जनक राजा याने ह्या मुलीला दत्तक घेऊन मुलीचा दर्जा दिला तेव्हापासून माता सीता यांचे पिता जनक राजा असल्याचे म्हटले जाऊ लागले.

असे देखील सांगितले जाते की लहानपणी खेळताना माता सीता यांना एक शिवधनुष्य सापडले जे त्यांनी खेळता खेळता उचलले देखील तेव्हा सीतेचे पिता राजा जनक यांना कळले की सीता ही कोणी साधारण कन्या नसुन एक देवीकन्या आहे.

म्हणुन राजा जनक यांनी आपल्या कन्येचा विवाह एका अशा व्यक्तीशी लावून देण्याचे ठरवले जो शिवधनुष्य उचलू शकतो ज्याच्यात शिवधनुष्य पेलण्याची क्षमता असेल त्याला तोडण्याचे ज्याच्यात असेल.

सीतेचे नाव सीता असे का पडले?

असे सांगितले जाते की सीता ही राजा जनक यांना जमीन नांगरताना सापडली होती म्हणून त्यांनी तिचे नाव सीता असे ठेवले

सीतेचा अर्थ जमीन किंवा नांगराचे टोक असा होत असतो.