11 वा राष्ट्रीय तळागाळातील नवोपक्रम पुरस्कार 2023 -11th national grassroots innovation award 2023 information in Marathi
नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे नॅशनल ग्रासरूट अणि उत्कृष्ट पारंपरिक ज्ञान पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.
ह्या सर्व पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे १० एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते.हयावेळी ह्या पुरस्काराच्या वितरणाची ही अकरावी आवृत्ती होती असे सांगितले जात आहे.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आरबी सीसी जवळील क्रीडा मैदानावर नवोपक्रम अणि उद्योजकता (festival of innovation and entrepreneurship) २०२३ ह्या महोत्सवाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे.
फाईन म्हणजे काय?what is FINE in Marathi
फेस्टिवल आॅफ इनोव्हेशन अॅण्ड इंटरप्रिनरशीप यालाच संक्षिप्त मध्ये फाईन असे संबोधिले जाते.
फाईन हा एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञान अणि नवनिर्मितीस प्रोत्साहन दिले जाणार आहे याचसोबत ह्या उपक्रमा दवारे उद्योजकतेला देखील प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगितले जाते.
जेणेकरून भारतातील जास्तीतजास्त बेरोजगार नागरीक उद्योजकतेकडे वळतील.अणि स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करतील.अणि आपल्या भारत देशात नवनवीन उद्योजक निर्माण होण्यास मदत होईल.
राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन पुरस्कार म्हणजे कायnational grassroot innovation award in Marathi
राष्ट्रीय ग्रासरूट इनोव्हेशन पुरस्कार हा एक दविवार्षिक पुरस्कार आहे.हा एन आय एफ इंडिया(national innovation foundation of India)कडुन राबविण्यात येत असलेला एक महत्वाचा उपक्रम आहे.
एन आय एफ काय आहे?
नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापणा ही २००० मध्ये करण्यात आली होती ह्या संस्थेची स्थापना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने करण्यात आली आहे.
तळागाळातील तांत्रिक नवकल्पना आणि उत्कृष्ट पारंपारिक ज्ञान मजबूत करण्यासाठी आपल्या भारत देशाने सुरू केलेला हा एक देशातील एक अत्यंत महत्त्वाचा असा राष्ट्रीय उपक्रम आहे.
आपल्या भारत देशामध्ये एक सर्जनशील आणि ज्ञान-आधारित समाज बनवणे त्यासाठी आवश्यक ती मदत देखील करणे हे ह्या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
एन आय एफच्या वतीने विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये 1093 तळागाळातील नवप्रवर्तक आणि शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
असे सांगितले जात आहे की ह्यासाठी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने देशातील 625 हून अधिक जिल्ह्यांमधून 325,000 तांत्रिक कल्पना,नवकल्पना आणि पारंपारिक ज्ञान पद्धतींचा डेटाबेस देखील तयार करून ठेवला आ