ऑपरेशनकुकी माॅन्स्टर म्हणजे काय? – Operation Cookie Monster

ऑपरेशनकुकी माॅन्स्टर म्हणजे काय?

नुकतेच काही दिवसांपूर्वी कायदा अंमलबजावणी अधिकारींच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेकडुन जागतिक पातळीवर एक विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

ह्या मोहीमेचे नाव ऑपरेशन कुकी माॅन्स्टर असे आहे.

ही मोहीम सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी तसेच त्यांचा निपटारा करण्यासाठी राबविण्यात आली होती.

ऑपरेशन कुकी माॅन्स्टर अंतर्गत जगातील सर्वात प्रसिद्ध सायबर क्राईम वेबसाईट तसेच सायबर गुन्हेगारांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या हॅकर मार्केट प्लेस ज्याचे नाव जेनिसिस मार्केट आहे त्याला सीज केले गेले आहे.म्हणजे ह्या मार्केटवर कायमची जप्ती आणण्यात आली आहे.

ह्या मोहिमेअंतर्गत शंभर पेक्षा अधिक सायबर गुन्हेगारांना अपराधींना अटक देखील करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या ऑपरेशनकुकी माॅन्स्टरचे नेतृत्व अमेरिकन गुप्तहेर संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन म्हणजेच एफबी आय कडुन करण्यात आले होते याचसोबत डच राष्ट्रीय पोलीस संघटनेने देखील ह्या आॅपरेशनचे नेतृत्व केले होते.

ह्या ऑपरेशनकुकी माॅन्स्टर विषयी असे सांगितले जात आहे की सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्याला रोखण्यासाठी राबविण्यात आलेले हे एक अत्यंत महत्वपूर्ण आॅपरेशन होते

हे ऑपरेशनही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात एकुण सतरा देशांमधील कायदा अंमलबजावणी संस्थांनी देखील आपला सहभाग नोंदविला होता.

एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार जेनेसिज मार्केट हे २०१८ पासुन सक्रिय असलेले मार्केट आहे.हे जेनेसिज मार्केट रशिया ह्या देशात कार्यरत आहे.अणि याचे संचालन देखील रशिया मधुनच केले जात होते.

जेनेसिज मार्केट वर सायबर गुन्हेगार यांना आपल्या सायबर गुन्ह्याची अंमलबजावणी करता यावी

डिजीटल फिंगरप्रिंट तयार करता यावे याकरीता लाॅग इन डिटेल्स,आयपी अॅड्रेस इत्यादी सायबर गुन्ह्यासाठी वापरल्या जात असलेल्या डेटाची विक्री केली जात होती.

याचसोबत ह्या प्लॅटफॉर्मवर सायबर गुन्हेगार यांना कुठल्याही युझरची पर्सनल डिटेल्स आयडी पासवर्ड इत्यादी महत्वाची माहीती खुप कमी किंमतीत म्हणजे अवघ्या एक डाॅलर पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करून दिली जात होती.

See also  जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day

ह्यात सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून दिला जात असलेल्या डेटाची किंमत त्याच्या संवेदनशीलतेनुसार असायची यात ७० सेंट ते हजार डाॅलर पर्यंत विक्री साठी डेटा उपलब्ध होता अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अहवालात असे सांगितले आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर २० लाखापेक्षा अधिक युझर्सचा चोरलेला पर्सनल डेटा जसे की लाॅग इन डिटेल्स,आयडी पासवर्ड,डिजीटल फिंगरप्रिंट इत्यादी विक्री साठी ठेवण्यात आला होता.

अणि ह्या चोरलेल्या डेटाची त्याच्या संवेदनशीलतेनुसार निर्धारित करण्यात आलेली निश्चित रक्कम ह्या प्लॅटफॉर्मवर पे करुन अणि तो संवेदनशील डेटा खरेदी करून सायबर गुन्हेगार आपल्या सायबर गुन्ह्यांना अंमलात आणत होते.

पण ह्या ऑपरेशनकुकी माॅन्स्टर मोहीमेमुळे सायबर गुन्ह्यांच्या संख्येत घट होणार आहे कारण ह्या मोहीमे अंतर्गत हॅकर्स जिथून हॅकिंग साठी डेटा गोळा करायचे ते जेनेसिज मार्केट सीज करण्यात आले आहे.

त्यामुळे हॅकर्सला हॅकिंग सायबर क्राईम करण्यासाठी जो पर्सनल डेटा हया वेबसाईटवरुन उपलब्ध होत होता तो आता सायबर गुन्हेगारांना उपलब्ध होणार नाही