बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त केलेल्या ३२ पदव्या 32 degree of babasaheb ambedkar
बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरूवातीचे शिक्षण दापोली तसेच सातारा जिल्ह्यात झाले होते.
यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी १९०७ मध्ये मुंबई विद्यापीठातुन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
त्याकाळी अस्पृश्य जातीतील मॅट्रीक उत्तीर्ण झालेले ते भारतातील पहिले विद्यार्थी होते.भिमराव आंबेडकर यांच्या ह्या यशासाठी अभिनंदन करण्यासाठी एक सभा देखील भरवली गेली होती.
त्यांचे गुरूवर्य कृष्णाजी केळकर यांनी ह्या सभेमध्ये भगवान बुद्ध चरित्र हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणून भेट म्हणून दिले होते.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१२ मध्ये मुंबई विश्व विदयालयातुन पदवीची परीक्षा उत्तीर्ण करत पदवी प्राप्त केली होती.
संस्कृत मध्ये शिक्षण प्राप्त करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे त्यांनी पारसी भाषेत आपले बीए ची पदवी प्राप्त केली होती.
मुंबई विश्व विदयालयातुन बीए ची पदवी प्राप्त केल्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिष्यवृत्ती मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे यानंतर परदेशात एम ए करण्यासाठी गेले.
आपले एम ए चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिका देशातील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१५ मध्ये आपली पदव्युत्तर परीक्षा देखील उत्तीर्ण केली अणि त्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली.
१९१६ मध्ये अमेरिका देशातील कोलंबिया विश्व विदयालयातुन बाबासाहेब यांनी पीएचडी ही डाॅक्टरेट पदवी प्राप्त केली.
यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स मध्ये एम एस्सी डिएस्सी ह्या पदव्या प्राप्त केल्या.
याचसोबत बाबासाहेब आंबेडकर यांनी बार गेट लाॅ साठी देखील आपले नाव नोंदवले होते.
यानंतर भारतात आल्यावर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात सैनिक अधिकारी तसेच वित्तीय आर्थिक थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.
यानंतर आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पुर्ण करण्यासाठी बाबासाहेब पुन्हा परदेशात लंडन तसेच जर्मनीला देखील गेले.तिथे त्यांनी बी एस सी एम एस सी तसेच बॅरिस्टर ही उपाधी देखील प्राप्त केली होती.
बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठात एल एलडी डिग्री प्रदान केली तसेच उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डीलीट doctor of literature ही उपाधी देखील प्रदान केली होती.
अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत 32 डिग्री प्राप्त केल्या आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांना एकुण अकरा भाषेंचे ज्ञान होते.