Aditya-L1 Mission – सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत लाॅच करत आहे आदित्य एल वन मिशन India plan Aditya L1 mission in first week of September

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत लाॅच करत आहे आदित्य एल वन मिशन India will launch Aditya L1 mission in first week of September

काल २३ आॅगस्ट २०२३ रोजी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे.

चंद्रयान ३ मिशनच्या यशानंतर आता लवकरच इस्रो एक नवीन मिशन हाती घेऊन ते यशस्वी करण्याच्या तयारीला देखील लागले आहे.ह्या मिशनचे नाव आदित्य एल वन मिशन असे आहे.

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले आहे की आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य एल वन हे नवीन अंतराळ आधारित मिशन लाॅच करण्यात येणार आहे.

ह्या प्रथम अंतराळ आधारित आदित्य एल वन मिशनमध्ये सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे.

India plan Aditya L1 mission in first week of September
India plan Aditya L1 mission in first week of September

चंद्रयान ३ मिशन यशस्वी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच आदित्य एल वन ह्या नवीन मिशनच्या लाॅच करण्याची घोषणा इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी केली.

याबाबत अधिक सविस्तर माहीती देताना एस सोमनाथ म्हणाले आहे की आदित्य एल वन मिशन बाबद सर्व काही ठरलेल्या योजनेनुसार होत आहे.

सर्व काही अशाच पद्धतीने चालले तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य एल वन चे प्रक्षेपण केले जाऊ शकते.

हे प्रक्षेपण लंबवर्तुळाकार कक्षेत केले जाणार आहे तिथून ते एल वन बिंदुवर ठेवले जाईल ज्याकरीता १२० दिवस इतका कालावधी लागु शकतो.

म्हणजेच आता चंद्रावर अभ्यासासाठी पाऊल टाकल्यानंतर इस्रोने आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन हे नवीन मिशन सुरू केले आहे.

ही इस्रोची आतापर्यंतची एक सर्वात मोठी आव्हानात्मक मोहीम असणार आहे जिच्यासाठी इस्रोने वेगाने तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे.

आदित्य मिशन एल वनचे नाव संस्कृत शब्द आदित्य वरून ठेवण्यात आले आहे.याचा अर्थ सन म्हणजे सुर्य असा होतो.

अणि यात एल वन म्हणजे तो लॅगरेज पाॅईट जिथे याला उतरवण्यात येईल.

See also  बजरंग दलाचा इतिहास काय आहे? - Bajrang Dal history.

आदित्य एल वन मिशनचे उद्दिष्ट –

आदित्य एल वन मिशन सुर्याच्या कोरोनाचा अभ्यास करणार आहे.हा सुर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील‌ भाग असतो.

यात पृथ्वीवरील बदलत्या हवामानाचा अभ्यास केला जाईल.