भारताच्या चंद्रयान ३ मधील ऐतिहासिक कामगिरीसाठी गुगलनेही आपले Google doodle सादर करत केले कौतुक

भारताच्या चंद्रयान ३ मधील ऐतिहासिक कामगिरीसाठी गुगलनेही आपले Google doodle सादर करत केले कौतुक

चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगभरातुन भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

कारण आतापर्यंत कुठल्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या यानाची साॅफ्ट लॅडिंग करण्यात अद्याप यश प्राप्त केले नव्हते.

पण २३ आॅगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर साॅफ्ट लॅडिंग करत भारताने एक नवीन इतिहास रचला.

जे आजवर कोणी करू शकले नाही ते आपल्या भारत देशाने करून दाखवले आहे.त्यामुळे संपुर्ण जगभरातील नेते, अंतराळ संशोधन संस्था भारताचे अणि इस्रो मधील सर्व वैज्ञानिकांचे ह्या अमुल्य कामगिरीसाठी कौतुक केले जात आहे.

एवढेच नव्हे तर जगातील सर्वांत मोठी अंतराळ संशोधन संस्था नासाने देखील इस्रोला आपल्या ह्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताच्या वैज्ञानिकांच्या ह्या कौतुकास्पद ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी गुगलने देखील आज २४ आॅगस्ट २०२३ रोजी एक खास डुडल बनवले आहे.

अणि आपल्या ह्या डुडलच्या माध्यमातुन भारताला आपल्या चंद्रमोहीमेच्या यशासाठी गुगलने शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

गुगलने सादर केलेल्या आपल्या डुडल मध्ये चंद्रयान ३ हे चंद्राच्या भोवती प्रदक्षिणा घालताना आपणास दिसून येत आहे.

यानंतर चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साॅफ्ट लॅडिग करते अणि मग यानातुन रोव्हर बाहेर निघतो असे आपणास ह्या गुगलने साकारलेल्या डुडल मध्ये पाहायला मिळते.

१४ जुलै रोजी सोडण्यात आलेले भारताचे चंद्रयान ३ हे यान तब्बल ४० दिवसांचा प्रदीर्घ प्रवास करत शेवटी २३ आॅगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले.

Chandrayaan-३-मधील-ऐतिहासिक-कामगिरीसाठी-गुगलनेही-आपले-Google-doodle.webp
Chandrayaan-३-मधील-ऐतिहासिक-कामगिरीसाठी-गुगलनेही-आपले-Google-doodle.webp

असे करत भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला अणि एकमेव देश अशी ख्याती देखील प्राप्त केली.

चंद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर लॅंडिग झाले आता पुढे काय?

चंद्रयान ३ मधील प्रज्ञान रोव्हर आता पुढील १४ दिवसांच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल तेथील माहीती संग्रहित करेल.चंद्रावर असलेल्या पाण्याच्या साठयांचा शोध घेईल.

See also  महाराष्ट्र राज्यावर चक्रीवादळाचे संकट बिपरजाॅय चक्रीवादळ कोकणात धडकण्याची शक्यता - Cyclone Biparjoy Kokan news

चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढेल अणि पृथ्वीवर इस्रोकडे पाठवेल.