गुगल वन डार्क वेब रिपोर्ट फिचर म्हणजे काय? Google one dark web report feature meaning in Marathi

गुगल वन डार्क वेब रिपोर्ट फिचर म्हणजे काय? Google one dark web report feature meaning in Marathi

गुगल वनच्या सबस्क्राईबर करीता गुगलने एक नवीन फिचर लाॅच केले आहे.

हया नवीन फिचरच्या साहाय्याने आपणास डार्क वेब वर लीक केल्या जात असलेल्या आपल्या महत्वपूर्ण डेटाची माहीती प्राप्त करता येणार आहे.

आपला कोणता डेटा डार्क वेबवर लीक केला जातो आहे याची सुचना आपणास ह्या फिचरमुळे मिळणार आहे.याआधी हे फिचर फक्त युएस मधील वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आले होते.

पण आता हे फिचर भारतात देखील सुरू करण्यात आले आहे.पण ह्या फिचरचा वापर करण्यासाठी आपणास गुगल वनच्या सर्विसचे सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.

गुगल वन ह्या सर्विसचे सबस्क्रिप्शन घेतलेल्या सर्व वापरकर्त्यांना आपल्या डार्क वेब वरील लीक होत असलेल्या महत्वपूर्ण खाजगी डेटाची माहीती प्राप्त व्हावी त्यांच्या डेटाची सुरक्षा व्हावी म्हणून हे फिचर गुगल वन ह्या कंपनीने आपल्या युझर्ससाठी सुरू केले आहे.

गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट ह्या फिचरचा वापर करून वापरकर्ता आपला मोबाईल नंबर,इमेल अॅड्रेस नाव इत्यादी खाजगी माहीती डार्क वेबवर लीक झाली आहे यावर लक्ष ठेवू शकतात.

डार्क वेब कशाला म्हणतात?

डार्क वेब हे एक इंटरनेट वरील असे प्लॅटफॉर्म आहे जिथे बेकायदेशीर रीत्या कुठल्याही व्यक्तीच्या चोरलेल्या डेटाची खाजगी माहीतीची विक्री केली जाते.

इथे सायबर गुन्हेगार हॅकर्स चोरलेल्या डेटाची विक्री करत असतात.डार्क वेबला अॅक्सेस करणे अवघड असल्याने सायबर गुन्हेगार हॅकर्स यांच्यावर लक्ष ठेवणे आपणास कठिन जात असते.

See also  डिजीटल फास्टिंग म्हणजे काय याचे फायदे कोणकोणते आहेत? DIGITAL FASTING MEANING AND ITS BENEFITS in Marathi

थोडक्यात सांगायचे म्हटले तर डार्क वेब हा इंटरनेट वरील लपलेला भाग आहे जिथे अनेक बेकायदेशीर व्यवहार कृत्य घडत असतात.

गूगल वन डार्क वेब रिपोर्ट फिचरचे फायदे कोणकोणते आहेत?

ह्या फिचरचा फायदा हा आहे की समजा गुगल वन सबस्क्राईबरची एखादी खाजगी माहीती डेटा डार्क वेबवर कुठेही लीक करण्यात आला तर गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट फिचर दवारे त्या सबस्क्राईबरला लगेच अलर्ट पाठविण्यात येतो‌ की तुमची ही माहीती डार्क वेब वर लीक करण्यात आली आहे.

गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट ह्या फिचरचा वापर करून आपण आपली जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इत्यादी माहीती डार्क वेबवर लीक करण्यात आली आहे का हे चेक करू शकतो.

गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट ह्या फिचरमुळे आपणास डेटा मॅनेज करण्यासाठी सल्ला अणि रिअल टाईम अपडेट प्राप्त होत असते.

एखादे सोशल मिडिया अॅप किंवा साॅफ्टवेअर आपल्या डेटाची चोरी करत असेल तर याची सुचना देखील वापरकर्त्याना ह्या फिचरदवारे दिली जाते.

गुगल वनचे सबस्रकिप्शन न घेतलेल्या इतर वापरकर्त्याना देखील ह्या फिचरचा वापर करता येणार आहे पण यात त्यांना फक्त आपल्या ईमेल आयडी वर लक्ष ठेवता येईल.मोबाईल नंबर,जन्म तारीख इत्यादी सारख्या डार्क वेबवर लीक होत असलेल्या वैयक्तिक माहीतीचा आढावा घेता येणार नाही.

गुगल वनच्या ह्या डार्क वेब रिपोर्ट फिचरमुळे सायबर गुन्हेगारी,हॅकिग इत्यादींला आळा बसण्यास मदत होईल.

आपल्या डेटाचा बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी वापर केला जाणार नाही.

गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट फिचरचा वापर कसा करायचा?

गुगल वनच्या डार्क वेब रिपोर्ट फिचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपणास स्वताचे एक प्रोफाईल तयार करावे लागते.

यानंतर आपल्याला कुठल्या डेटावर माहीतीवर लक्ष ठेवायचे आहे ते निवडुन घ्यायचे आहे.

डार्क वेब रिपोर्ट फिचर कसे सेट करायचे?

  • सर्वप्रथम आपणास यासाठी आपल्या डिव्हाईस मधील गुगल वन वेबसाईटवर जायचे आहे.
  • यानंतर डार्क वेब रिपोर्ट फिचर सर्च करायचे आहे अणि सेट अप बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्याला कोणता डेटा माॅनीटर करायचा आहे ते निवडुन घ्यायचे आहे.
  • यानंतर आपल्याला आपले माॅनिटरींग प्रोफाइल तयार करण्यासाठी दिलेल्या सुचनांचे पालन करावे लागेल.
  • यानंतर स्कॅन करण्यासाठी डनवर क्लिक करायचे आहे यानंतर आपला डेटा किंवा इतर खाजगी माहीती डार्क वेबवर लीक करण्यात आला आहे किंवा नाही हे आपणास दिसून जाईल.
See also  पर्सनल क्लाउड स्टोरेज म्हणजे काय ? Personal Cloud Storage Marathi information