इस्रोचे गगनयान मिशन काय आहे? ISRO Gaganyan mission in Marathi

इस्रोचे गगनयान मिशन काय आहे? ISRO Gaganyan mission in Marathi

गगनयान मिशन मध्ये इस्रो मानवाला प्रथमतः अंतराळात पाठवणार आहे अणि त्यांना सुरक्षित पृथ्वीवर परत देखील आणणार आहे.

गगनयान मिशन मध्ये फक्त तीन किंवा चार व्यक्तींना अंतरीक्ष यात्रींना अंतराळात ४०० किलोमीटर इतक्या अंतरावर सात दिवसांसाठी पाठवले जाणार आहे.यात दोन पुरुष तीन पुरुष अणि एक महिलेचा समावेश असणार आहे.

या तिघांना ह्या मिशन दरम्यान अंतराळात जायचे आहे अणि पुन्हा वापस यायचे आहे.

ह्या मिशन मध्ये प्रगत राॅकेट एल व्ही एम तीनचा प्रयोग केला जाणार आहे.यात गगनयान एक,गगनयान दोन अणि गगनयान तीन असे तीन राॅकेट असतील.

सुरूवातीला जे गगनयान एक अंतराळात पाठवले जाईल ते चाचणी करण्यासाठी रिक्त पाठवले जाईल यानंतर गगनयान दोन मध्ये टेस्टिंग करीता रोबोट पाठविण्यात येईल.

गगनयान एक अणि दोन यशस्वीपणे पार पडल्यानंतर अंतराळात तिसरे राॅकेट गगनयान तीन पाठविले जाईल.म्हणजे गगनयान तीन ह्या मोहीमेचा अखेरचा टप्पा असणार आहे.

हे मिशन सुमारे पाच ते सात दिवसांचे असेल.गगनयान तीन राॅकेट मध्ये सर्व चालकांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली जाईल.

ISRO Gaganyan mission in Marathi
ISRO Gaganyan mission in Marathi

२०२३ मध्ये गगनयान एक अणि दोन अंतराळात सर्वप्रथम पाठवले जाणार आहे.मग हे दोन्ही यान यशस्वीपणे आपले कार्य करू शकले तर २०२५ दरम्यान गगनयान तीन अंतराळात पाठविले जाणार आहे.

हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यावर भारत जगातील चौथा असा देश बनेल ज्याने आपल्या जमिनीवरून आपल्याच राॅकेटच्या साहाय्याने आपल्या देशातील माणसांना अंतराळात पाठविले.

याआधी अमेरिका चीन आणि रशियाने हा इतिहास नोंदविण्यात यश प्राप्त केले आहे.

गगनयान स्पेस क्राफ्ट हे दोन माॅडयुलच्या साहाय्याने बनवण्यात आले आहे यात पहिले माॅडयुल आहे क्रु माॅडयुल अणि दुसरे सर्विस माॅडयुल आहे.

हे दोघे माॅडयुल जोडुन एक कॅपसुल बनवले जाते.जे एक विशालकाय राॅकेटच्या मध्ये फीट करण्यात येते.क्रू माॅडयुल मध्ये सर्व क्रु मेंबर अंतराळ यात्री बसतात.

See also  Hostinger review in Marathi - तुमच्या ब्लॉग करता होस्टिंग प्लॅन कोणता घेणार? होस्टिंगर रिव्ह्यू मराठी 2023 - Hostinger detail review in Marathi

ह्या मिशनसाठी वायुसेनेच्या काही जवानांची निवड करण्यात आली आहे.

गगनयानला आंध्र प्रदेश मधील स्थित असलेल्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर मधुन अंतराळात पाठविले जाणार आहे.

गगनयान मिशनचे एकुण बजेट १० हजार करोड इतके असल्याचे सांगितले जात आहे.