अमेरिका ह्या देशाने गरोदरपणाच्या काळात बाळाचे संरक्षण करणारया पहिल्या आर एसव्ही लशीला दिली मान्यता -The US approved the first RSV vaccine to protect babies during pregnancy

अमेरिका ह्या देशाने गरोदरपणाच्या काळात बाळाचे संरक्षण करणारया पहिल्या आर एसव्ही लशीला दिली मान्यता The US approved the first RSV vaccine to protect babies during pregnancy

नुकतेच अमेरिका ह्या देशाकडुन गरोदरपणाच्या काळात बाळाचे संरक्षण करण्यासाठी पहिल्या आर एसव्ही लशीला मान्यता देण्यात आली आहे.

असे करत गरोदरपणाच्या काळात बाळाचे संरक्षण करण्यासाठी आर एस व्ही लशीचा वापर करणारा अमेरिका हा जगातील पहिला देश देखील बनला आहे.

फायझर नावाच्या एका कंपनीने ह्या लसीची निर्मिती केली आहे.ही लस गरोदरपणाच्या ३२ ते ३६ व्या आठवड्या पर्यंत महिलांना देता येईल.

ह्या लसीमुळे जोपर्यंत गर्भ सहा महिन्यांचा होत नाही तोपर्यंत श्वसन व्यवस्थेतील संसर्ग तसेच कुठल्याही गंभीर आजारांपासून ही लस बाळाचे संरक्षण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

21 ऑगस्ट 2023 रोजी, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने नवजात बालकांचे रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) पासून संरक्षण व्हावे म्हणून ही पहिली लस मंजूर केली आहे.

ही लस गरोदरपणाच्या काळात मातेस उशिरा देण्यात येत असते आणि अभ्रकांना त्यांच्या जीवनाच्या पहिल्या सहा महिने इतक्या कालावधी पर्यंत संरक्षण देण्याचे काम करते.

See also  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र –NSC information Marathi