महाराष्ट्र राज्यावर चक्रीवादळाचे संकट बिपरजाॅय चक्रीवादळ कोकणात धडकण्याची शक्यता – Cyclone Biparjoy Kokan news

Cyclone Biparjoy Kokan news

महाराष्ट्र राज्यावर चक्रीवादळाचे संकट बिपरजाॅय चक्रीवादळ कोकणात धडकण्याची शक्यता biper joy cyclone warning in kokan

Cyclone Biparjoy Kokan news

देशातील तटीय क्षेत्रांवर एक नवीन चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे.दक्षिण पुर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशन मध्ये रुपांतरीत झाले आहे.

ज्यामुळे येत्या चोवीस तासात एक नवीन बिपरजाॅय चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे दबावाचे क्षेत्र पश्चिम दक्षिण पश्चिम गोवापासुन ९२० किलोमीटर, दक्षिण पश्चिम मुंबई पासुन १ हजार १२० किलोमीटर दक्षिण पोरबंदर पासुन १२० किलोमीटर अणि पाकिस्तान मध्ये दक्षिण कराची पासुन १ हजार ५२० किलोमीटर इतक्या अंतरावर बनलेले होते.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे कमी दाबाचे क्षेत्र हळुहळू उत्तर पश्चिम दिशेकडे वळु शकते.त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत भयानक वादळ येण्याचा अंदाज हवामान खात्याकडुन वर्तवला जात आहे.

कोकण विभागातील तटीय क्षेत्र विभागात म्हणजे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग इत्यादी क्षेत्रात येत्या चोवीस ते ४८ तासात भयंकर वादळ येण्याची दाट शक्यता आहे.

याचसोबत मुंबई ठाणे पालघर क्षेत्रात वेगवान वारयासोबत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

८ जुन ते ९ जुन दरम्यान हे चक्रीवादळ आपले भयंकर रौद्र रूप दाखवू शकते.९० किलोमीटर तासाच्या वेगाने हवा चालु शकते.

केरळ ह्या राज्यात ८ ते ९ जुन ह्या कालावधी दरम्यान पाऊसाचे आगमन होऊ शकते.

ह्या काळात समुद्र अत्यंत खवळलेल्या स्थितीत असणार असल्याने ह्या चक्रीवादळाच्या कालावधीत मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांनी अजिबात समुद्र किनारी जाऊ नये असा सल्ला देखील हवामान खात्याने दिला आहे.

ह्या नवीन चक्रीवादळाला बिपरजाॅय चक्रीवादळ असे नाव बांगलादेश ह्या देशाने दिले आहे.अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दबावाकडे हवामान खात्याने आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

अरबी समुद्रातील तापमान अधिक असल्याने वादळाला अधिक ऊर्जा प्राप्त होण्याची शक्यता आहे.

See also  कोविन पोर्टल वरील डेटा टेलिग्रामवर लीक झाल्याचा दावा लाखो लोकांची आधार कार्ड,पॅन कार्ड वोटर आयडी कार्ड डिटेल धोक्यात - Cowin portal data leakage in Marathi