भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाख मध्ये धावताना दिसुन येईल – India first Hydrogen Bus reached in leh

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाख मध्ये धावताना दिसुन येईल India first hydrogen bus reached in leh

आपल्या भारत देशात लवकरच प्रथमतः हायड्रोजन बससेवेस आरंभ करण्यात येणार आहे.

असे म्हटले जाते आहे की लडाखच्या अत्यंत थंड तापमानात धावणारया ह्या बसची विशेष रचना करण्यात आली आहे.

India first Hydrogen Bus
India first Hydrogen Bus

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० सालात स्वातंत्र्य दिनी लडाखला भारत देशातील पहिले कार्बन न्युट्रल राज्य बनवणार अशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

ही बससेवा सुरू करण्याचा शासनाचा मुख्य हेतु पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल करणे हा असणार आहे.याचकरीता ही हायड्रोजन वर चालणारी बस लडाख मधील रस्त्यांवर उतरवली जाणार आहे.

याने पर्यावरणास अनुकुल अशा वाहतुकीच्या नवीन युगाचा आरंभ होण्यास मदत होणार आहे.

भारतातील सर्वात मोठी उर्जा उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनटीपीसीच्या नेतृत्वामध्ये आंतर शहर सेवेकरीता लेह प्रशासनास एकुण पाच हायड्रोजन इंधन बस सेल पुरविण्यात येणार आहे.

म्हणजे देशातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनीने ह्या प्रकल्पाची धुरा आपल्या हातात घेतली आहे.

सर्वप्रथम राज्यामधील उच्च उंचीवर थंड वाळवंटात तसेच पब्लिक रोडवर असलेल्या ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पहिली चाचणी करण्यात येईल.यानंतर प्रथम हायड्रोजन इंधन सेल बस सेवेस आरंभ करण्यात

येईल.

एनटीपीसीचा फुलफाॅम काय होतो?

एनटीपीसीचा फुलफाॅम national thermal Power corporation असा याचा होतो.यालाच आपण राष्ट्रीय ताप विद्युत निगम लिमिटेड असे म्हणुन देखील ओळखतो.

एनटीपीसी काय आहे?

  • एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे.ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी म्हणून ओळखली जाते.
  • एनटीपीसी मध्ये भारत सरकारचा ८९.५ टक्के इतका वाटा आहे.एनटीपीसीची स्थापणा ७ नोव्हेंबर १९७५ रोजी करण्यात आली होती.
  • एनटीपीसीचे मुख्यालय भारतातील नवी दिल्ली येथे स्थित आहे.
  • एनटीपीसीचे मुख्य काम हे औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचे तंत्रज्ञान बांधकाम आणि ऑपरेशन आहे.
See also  पेटीअमच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीनंतर पेटीयम मध्ये पैसे लावणे गुंतवणूकदारांना किती फायदेशीर ठरणार? - Paytm shares rise as CLSA maintains Buy rating