चंद्रयान ३ ची लॅडिग तारीख शक्यतो २७ आॅगस्ट पर्यंत पुढे ढकलली जाणार Chandrayaan 3 landing may get postponed to August 27
आपणा सर्वांनाच माहित आहे की आज २३ आॅगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश म्हणून ओळखला जाईल.
पण शक्यता अशी देखील दर्शवण्यात आली आहे की जर चंद्रयान ३ च्या लॅडिगसाठी पोषक वातावरण नसले घटक प्रतिकुल असेल तर चंद्रयान ३ ची लॅडिंगची तारीख २३ आॅगस्ट रोजी होणार नाही ती २७ आॅगस्ट पर्यंत पुढे देखील ढकलली जाऊ शकते.
म्हणजेच चंद्रयान ३ चा लॅडिंगचा कालावधी चार दिवस इतका पुढे ढकलला जाऊ शकतो.
कारण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की चंद्रयान ३ ची चंद्रावर लॅडिग करण्याआधी दोन तासांच्या आधी म्हणजेच आज चार वाजेच्या सुमारास लॅडर अणि चंद्राची स्थिती ह्यांचा आढावा घेतला जाईल.
यानंतर लॅडर अणि चंद्रावरील घटकांची अनुकुलता लक्षात घेऊन शास्त्रांकडुन ठरविण्यात येईल की लॅडरला चंद्रावर आज उतरवायचे किंवा नाही.
समजा इस्रोच्या शास्त्रज्ञांना लॅडर अणि चंद्राची स्थिती चंद्रयान ३ ला चंद्रावर उतरवण्यासाठी योग्य तसेच पोषक वाटली नाही तर अशा परिस्थितीत लॅडिगच्या तारखेला २७ आॅगस्ट पर्यंत पुढे ढकलले जाईल.
पण समजा इस्रोच्या शास्त्रज्ञांना असे वाटले की लॅडर अणि चंद्रावरील घटक अनुकुल आहेत.चंद्रावरील स्थिती अणि लॅडर दोघांचे वातावरण लॅडिगसाठी पोषक आहे.तर चंद्रयान ३ ची लॅडिग चंद्रावर आजच निर्धारित वेळेत केली जाईल.
अणि लॅडिगच्या प्रक्रियेस देखील संध्याकाळी ५ वाजुन २० मिनिटांनी सुरू करण्यात येईल.
चंद्रयान २ मध्ये शेवटच्या पाच मिनिटात केलेल्या एका चुकीमुळे मोहीम अयशस्वी ठरली होती तसा प्रकार चंद्रयान ३ मोहीमे मध्ये देखील होऊ नये म्हणून जोखिम टाळण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी हा निर्णय घेतला आहे.