विठ्ठल माझा सोबती चित्रपटाचा रिव्युव्ह vitthal majha sobti movie review in Marathi

विठ्ठल माझा सोबती चित्रपटाचा रिव्युव्ह vitthal majha sobti movie review in Marathi

विठठल माझा सोबती हा चित्रपट फक्त मराठी अणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे.

विठ्ठल माझा सोबती ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.हया चित्रपटाची कथा देखील संदीप मनोहर नवरे यांनीच लिहिलेली आहे.हया चित्रपटाची निर्मिती पल्लवी मळेकर फक्त मराठी यांनी केली आहे.

चित्रपटात दाखवण्यात आलेले पटकथा संवाद विक्रम ऐडके यांनी लिहिलेले आहेत.हया चित्रपटाला संगीत देण्याचे काम गणेश सुर्वे अणि गौरव चाटी यांनी केले आहे.

चित्रपटातील छायांकन गौरव पोंक्षे अणि संकलन मनु आसथी यांनी केले आहे.

विठ्ठल माझा सोबती ह्या चित्रपटात अरूण नलावडे(विठ्ठलाच्या भक्ताच्या भुमिकेत)संदीप पाठक(विठ्ठलाच्या भुमिकेत)

vitthal majha sobti movie review in Marathi
विठ्ठल माझा सोबती चित्रपटाचा रिव्युव्ह vitthal majha sobti movie review in Marathi

आशय कुलकर्णी,अश्विनी कुलकर्णी,अभय राणे,राजेंद्र शिरसाटकर,दिव्या पुगावकर इत्यादी दिग्दज मराठी कलाकारांनी महत्वाची भुमिका साकारली आहे.

हा चित्रपट २३ जुन रोजी महाराष्ट्र राज्यातील थिएटर मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निसमित भक्तावर आधारीत आहे.या कथेत आपणास एक असे कुटुंब पाहावयास मिळते जिथे धन तर आहे पण कुटुंबातील राहत असलेल्या लोकांच्या नात्यात कुठलाही गोडवा प्रेम आपुलकी नाही.

त्या भक्ताच्या कुटुंबातील सदस्यां मध्ये रोज कलह वादविवाद होत असतात.त्याची सर्व मुले उनाड असतात वाया गेलेली असतात ज्यामुळे हा भक्त खुप परेशान असतो.

अशा वेळी त्या भक्ताच्या जीवनात मदतीसाठी एक व्यक्ती नोकर बनून धावून येते जिचे नाव विठ्ठल असे असते.

हा विठ्ठल घरात आल्यानंतर त्या भक्ताच्या कुटुंबातील सभासदांच्या मध्ये असलेले वादविवाद कलह आपापसातील मतभेद कशा पद्धतीने दुर होतात.त्याची वाया गेलेली उनाड पोरे कशी हळूहळू सुधारतात हे आपणास ह्या चित्रपटात पाहायला मिळते.

ह्या विठ्ठलाच्या भक्ताच्या आयुष्यात अचानक मदतीस धावून आलेला हा विठ्ठल नेमकी आहे तरी कोण?हा नेमकी कुठून आलेला आहे.

See also  केंद्र सरकारने राज्यांना ओएम एसएस अंतर्गत केली जात असलेली तांदूळ गव्हाची विक्री केली बंद शासनाच्या हया निर्णयामुळे कर्नाटकची अन्न भाग्य योजना अडचणीत - Anna Bhagya Yojana Scheme - Karnataka

जे त्या भक्ताला अनेको वर्षे जमले नाही ती गोष्ट हा विठ्ठल आपल्या लिलया करून काही दिवसात कशी साध्य करून दाखवतो हे आपणास ह्या चित्रपटात पाहायला मिळते.हे बघण्यासाठी आपण हा चित्रपट नक्की बघायला हवा.

विठ्ठल माझा सोबती हा एक भक्तिरसात तल्लीन करणारा विठ्ठलाच्या निसमित भक्तीवर आधारीत चित्रपट आहे.हा चित्रपट आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदशिर्त करण्यात आला आहे.

हया चित्रपटात आपणास एक विठ्ठलाचा भक्त दाखवला आहे जो दरवषी न चुकता विठ्ठलाची वारी करतो पण ह्या वर्षी त्याची वारी चुकते.आपल्या भक्ताने वारी चुकवली म्हणून साक्षात विठ्ठल आपल्या भक्ताच्या दारी येतो.