तलाठी भरती परीक्षा २०२३ चा संपूर्ण अभ्यासक्रम Talathi bharti exam 2023 syllabus in Marathi
तलाठी भरती परिक्षेचे स्वरूप खालील दिलेल्या प्रमाणे असणार आहे –
१) मराठी – २५ प्रश्न ५० गुण
२) इंग्रजी -२५ प्रश्न ५० गुण
३) सामान्य ज्ञान -२५ प्रश्न ५० गुण
४) अंकगणित अणि बुद्धीमत्ता चाचणी-२५ प्रश्न ५० गुण
तलाठी भरती परीक्षा मध्ये एकुण चार विषय असतात.हया वेळेची तलाठी भरती परीक्षा आॅनलाईन पद्धतीने टीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे.ही परीक्षा मराठी अणि इंग्रजी या दोन भाषेत घेतली जाणार आहे.प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील.
परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
एकुण २०० गुणांसाठी चारही विषय मिळुन शंभर प्रश्न विचारले जातील.परीक्षेत कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नसणार.
परीक्षेचा कालावधी -परीक्षेचा कालावधी २ तास १२० मिनिटे
१) मराठी –
विभक्ती
संधी आणि संधीचे प्रकार
नाम
सर्वनाम
म्हणी
वाक्य प्रचार त्याचा अर्थ तसेच उपयोग शब्द समुहा विषयी एक शब्द
समानार्थी तसेच विरूद्धार्थी शब्द
क्रियापद
विशेषण
क्रियाविशेषण
काळाचे प्रकार
समास
अलंकार
शब्दांच्या जाती
२) इंग्रजी –
One word substitution
Tense and kind of tenses
Synonyms and antonyms
Phrases
Spelling
Vocabulary
Proverbs
Question tag
Use proper form of verb
Sentence structure
Verbal comprehension passage
Spot the error
३) अंकगणित-
गणित
अंकगणित
काळ
वेग
काम
बेरीज
वजाबाकी
गुणाकार
भागाकार
सरासरी
चलन
घड्याळ
संबंधित उदाहरणे
मापनाची परिमाणे
४) बुदधीमत्ता-
अंक मालिका
अक्षरमालिका
वेगळा शब्द तसेच अंक ओळखणे
सहसंबंध
अंक
अक्षर
आकृती
वाक्यावरुन निष्कर्ष
वेन आकृती
५) सामान्य ज्ञान –
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
पंचायत राज व राज्य घटना
भारतीय संस्कृती
भौतिक शास्त्र
रसायनशास्त्र
जीवशास्त्र
महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य –
भारताच्या शेजारील देशांची माहीती
चालु घडामोडी -सामाजिक,आर्थिक, राजकीय, क्रिडा,मनोरंजन
तलाठी कोण असतो त्याचे काम काय असते?
तलाठी हा महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवर काम करत असलेला गट क संवर्गातील अधिकारी असतो.तलाठी हा एक जमीन महसुल व्यवस्थेत काम करत असलेला एक महत्वाचा कर्मचारी असतो.तलाठी हे वर्ग तीन मधील महत्वाचे पद आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी तलाठीला पटवारी ह्या दुसरया नावाने देखील ओळखले जाते.आपल्या गावातील सर्व जमिनीच्या व्यवहाराची कामे बघण्याचे प्रमुख कार्य तलाठी हाच करीत असतो.
गावातील आठ अ उतारा तसेच सात बारा बघण्यासाठी देखील आपणास गावातील तलाठी कडे जावे लागत असते.तलाठी हा गाव पातळीवरील नोंद वहींचे कागदपत्र एक ते एकवीस क्रमांक असलेल्या गाव नमुन्यात ठेवत असतो.