टीसीएस पॅटर्न तलाठी भरती परीक्षेसाठी पुर्वतयारी कशी करायची? How to prepare for TCS pattern Talathi bharti exam

टीसीएस पॅटर्न तलाठी भरती परीक्षेसाठी पुर्वतयारी कशी करायची?how to prepare for TCS pattern talathi bharti exam

खुप विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास कसा करायचा?अभ्यासाची सुरुवात कशी अणि कुठून करायची?

आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण टीसीएस पॅटर्न तलाठी भरती परीक्षेसाठी पुर्वतयारी कशी करायची हया लेखातुन जाणुन घेणार आहोत.

१) योग्य त्या,मोजक्या निवडक अणि महत्वपूर्ण पुस्तकांचाच अभ्यास करायचा-

तलाठी भरती परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांनी अभ्यासासाठी योग्य त्या अणि काही निवडक अणि महत्वाच्या पुस्तकांचीच निवड करायला हवी.

काही उमेदवार एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकाशनाच्या नोटस तसेच वेगवेगळी पुस्तके अभ्यासासाठी रिफर करत असतात असे न करता आपण कुठलेही महत्वाचे एक किंवा दोन पुस्तक ज्यातुन आपला सर्व अभ्यासक्रम कव्हर केला जाईल असेच पुस्तक वाचायला हवे.

२) मागील वर्षीच्या टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणे –

यंदाची तलाठी भरती परीक्षा टीसीएस पॅटर्न नुसार घेतली जाणार आहे म्हणून याकरीता उमेदवारांनी जास्तीत जास्त टीसीएस पॅटर्न मधील जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

टीसीएस पॅटर्न मधील जुन्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह आपणास अनेक टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून देण्यात येतो.

३) पेपरचे विश्लेषण करणे –

आपणास पेपरचे विश्लेषण देखील करता यायला हवे.यात आपण टीसीएस पॅटर्न मधील जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घ्यायला हवा.

अणि आतापर्यंत तलाठी भरती परीक्षेत जुन्या प्रश्नपत्रिका मधील कोणते प्रश्न अधिक प्रमाणात विचारले गेले आहे त्याचे विश्लेषण करायला हवे.याने आपल्याला परीक्षेचा पॅटर्न लक्षात लक्षात येईल परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात याचा अंदाजा येईल.

४) परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात असायला हवा –

आपल्याला आपला परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम पाठ असणे खुप आवश्यक आहे कारण जर आपल्याला आपला अभ्यासक्रम माहीत असेल तरच आपण योग्यरीत्या परीक्षेची तयारी करू शकतो.म्हणुन सिलॅबस पाठ असणे खुप गरजेचे आहे.

See also  जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू - State tb control centre Mumbai recruitment 2023 in Marathi

याचसोबत कुठल्या विषयात कुठले मुददे अधिक प्रमाणात विचारले जातात त्यांचे वेटेज किती असते हे देखील आपणास माहीत हवे.

५) नवीन अभ्यासक्रम असलेल्या प्रश्नपत्रिका सोडवणे –

अभ्यासक्रमात कोणता नवीन बदल करण्यात आला आहे हे आपणास माहीत असायला हवे.यासाठी आपण नवीन अभ्यासक्रम असलेल्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे.

६) आॅनलाईन एमसी क्यु सोडविण्याचा सराव करणे –

टीसीएस पॅटर्न मधील घेतली जात असलेली परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याने आपणास जास्तीत जास्त एम सीक्यु प्रश्नपत्रिका आॅनलाईन पदधतीने सोडविण्याचा सराव करायला हवा.

याने परीक्षेत एम सी क्यु टाईप प्रश्न सोडवायला आपणास अधिक सोपे जाईल.

टीसीएस पॅटर्न मधील विचारले जाणारे ९९ टक्के प्रश्न हे बौद्धिक क्षमतेवर आधारीत असणार आहे.