डिप्लोमा म्हणजे काय? Diploma Meaning in Marathi
डिप्लोमाला पाॅलीटेक्निक असे देखील म्हटले जाते.यात पाॅलीचा अर्थ अनेक अणि टेक्निकचा अर्थ कौशल्य असा होतो.
म्हणजे विविध प्रकारची तांत्रिक कौशल्ये थेअरी तसेच प्रॅक्टीकल संकल्पना आपणास डिप्लोमा कोर्स मध्ये शिकवले जात असतात.
आपल्याला प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम करीअर करण्यासाठी चांगल्या बोर्डाची पदवी घेणे आवश्यक असते.
कारण आपल्याकडे चांगल्या बोर्डाची पदवी किंवा डिप्लोमा असला तर आपणास कुठल्याही कंपनीत चांगल्या उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी प्राप्त होते.किंवा आपण आपला स्वताचा एखादा उद्योग व्यवसाय देखील सुरू करू शकतो.
जेव्हा आपण एखाद्या कोर्ससाठी प्रवेश घेत असतो तेव्हा वेगवेगळ्या कोर्सचा विचार करत असतो
कुठला कोर्स किती कालावधीचा आहे.त्यात आपणास एकुण किती खर्च येईल त्यात किती स्कोप आहे नोकरीच्या करिअरच्या संधी किती आहेत इत्यादी
अशा सर्व कोर्सेस मधील महत्वपूर्ण बाबींची आपापसात तुलना करून कुठला कोर्स आपल्यासाठी नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम ठरेल हे ठरवत असतो.मग आपण कुठल्याही कोर्ससाठी प्रवेश घेत असतो.
जेव्हा आपण एखादा शैक्षणिक तसेच व्यावसायिक कोर्स करण्याचा विचार करतो तेव्हा आपण असा कोर्स निवडत असतो जो खुप कमी कालावधीचा आहे.ज्यात आपणास वेळ अणि खर्चही जास्त येणार नाही.
अणि करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या विपुल संधी प्राप्त होतील.अशा वेळी आपण सर्व जण स्वस्त्यात मस्त एखादा एक दोन वर्षांचा डिप्लोमा करण्याचे ठरवत असतो.
महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या अंतर्गत डिप्लोमाच्या अनेक शाखांचा समावेश होतो.यात विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेता येत असतो.
डिप्लोमा नंतर देखील आपण पीजी किंवा मास्टर डिप्लोमा आपण करू शकतो.
महाराष्ट्र राज्य बोर्ड तांत्रिक शिक्षण महामंडळामार्फत एकुण ७० अभियांत्रिकी डिप्लोमा तसेच नाॅन इंजिनिअरींग डिप्लोमा जे एआय सीटीई दवारे मान्यता प्राप्त आहे ते आपणास आॅफर केले जातात.
डिप्लोमा कोणी करायला हवा?
असे विद्यार्थी ज्यांना लवकरात लवकर आपला एक ठाराविक कोर्स पुर्ण करून एका विशिष्ट क्षेत्रात डिग्री प्राप्त करून जाॅबला लागायचे आहे
किंवा स्वताचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी डिप्लोमा करणे अधिक फायदेशीर तसेच उत्तम ठरते.
ज्यांना इंजिनिअरींग करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील आपल्या क्षेत्रातील प्रॅक्टीकल नाॅलेज प्राप्त करण्यासाठी डिप्लोमा करायला हवा.
डिप्लोमा केल्यानंतर आपणास इंजिनिअरींगच्या थेट दुसरया वर्षात प्रवेश घेता येतो.इंजिनिअरींग मधील निम्मा अभ्यासक्रम हा डिप्लोमा मध्येच आपला कव्हर होऊन जात असतो.
ज्यांना सरकारी क्षेत्रात सरकारी नोकरी प्राप्त करायची आहे तसेच त्यांना एका विशिष्ट क्षेत्रात अत्यंत रूची आहे त्यांनी डिप्लोमा करायला हवा.
पण ज्यांचे अजुन फिक्स ठरलेले नाहीये की त्यांना कोणत्या क्षेत्रात आपले करीअर करायचे आहे अशा व्यक्तींनी दहावी नंतर डिप्लोमा न करता अकरावी बारावी करणे अधिक योग्य ठरेल.
अणि मग दोन वर्षांत आपल्याला कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे हे ठरल्यावर आपण कुठल्याही एका विशिष्ट क्षेत्रात डिप्लोमा करायला हवा.
डिप्लोमा मध्ये दोन प्रकारचे कोर्स समाविष्ट असतात –
1)अभियांत्रिकी तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा-
इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये कंप्यूटर टेक्नाॅलाजी इंजिनिअरींग, इनफरमेशन टेक्नाॅलाजी इंजिनिअरींग,
सिव्हील इंजिनिअरींग,मॅकेनिकल इंजिनिअरिंग,इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इत्यादी कोर्सेसचा समावेश होतो.ह्या कोर्सेसचा एकुण कालावधी तीन वर्षे इतका असतो.
दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्सेस मध्ये डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी,डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अॅण्ड मॅनयुफॅक्चरींग,रबर टेक्नाॅलाजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी,फायर सेफ्टी,इंटेरिअर डिझायनिंग इत्यादी डिप्लोमा कोर्सेसचा समावेश होतो.
2)गैर अभियांत्रिकी,नाॅन इंजिनिअरींग डिप्लोमा –
दहावी नंतर कोणते डिप्लोमा कोर्स आपण करू शकतो?
दहावी नंतर आपणास खालील दिलेले डिप्लोमा कोर्स करता येतात.
१)डिप्लोमा इन इंजिनीअरिंग –
२) डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग –
३) डिप्लोमा इन थ्रीडी अॅनिमेशन –
४) डिप्लोमा इन हाॅटेल मॅनेजमेंट –
५) डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी –
६) डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर –
७) डिप्लोमा इन डेंटल मॅकॅनिक्स –
८) डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन –
९) डिप्लोमा इन मॅकॅट्राॅनिक्स –
१०) डिप्लोमा इन इंटेरिअर डेकोरेशन –
११) डिप्लोमा इन आर्किटेक्चर –
१२) डिप्लोमा इन पॅरामेडिकल कोर्स –
डिप्लोमा करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?
डिप्लोमा करण्याचे पुढील काही महत्वाचे फायदे आहेत-
१) डिप्लोमा केल्यानंतर आपणास लवकरात लवकर जाॅबला लागता येते.
२) डिप्लोमा केल्यानंतर आपणास सरकारी नोकरी करीता देखील परीक्षा देऊन प्रयत्न करता येतो.
३) डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात काॅलेज कॅम्पस दवारे आपणास त्वरीत जाॅब मिळण्याची संधी असते.
४) डिप्लोमा केल्याने फक्त तीन वर्षांत ज्युनिअर इंजिनिअरची पदवी प्राप्त होते.
५) डिप्लोमा मध्ये इंजिनिअरींग मधील सर्व विषयाचे ७० टक्के नाॅलेज आपणास दिले जाते.ज्यामुळे डिप्लोमा नंतर इंजिनिअरींग करणे आपणास सोपे जाते.
डिप्लोमा करण्याचे तोटे कोणकोणते आहेत?
एखाद्या क्षेत्रात रूची नसताना देखील आपण डिप्लोमा केला तर ईच्छा तसेच मन नसताना देखील आपणास आपल्या मना विरूद्ध जाऊन त्या विशिष्ट क्षेत्रात आपले करीअर करावे लागेल.
डिप्लोमा मध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्यांनंतर परीक्षा द्यावी लागते.यात जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतात त्यांना काही अडचण येत नाही पण जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करत नाही अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्यांनंतर परीक्षा द्यावी लागल्यास त्यांचे विषय बॅक लाॅग राहुन जातात.
मग हे राहीलेले बॅक लाॅगचे विषय त्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रात क्लिअर करावे लागतात तसे न केल्यास त्यांना एक वर्ष ड्राॅप घ्यावा लागतो अणि काॅलेजात न जाता घरी बसुन राहीलेल्या विषयाचा अभ्यास करावा लागतो म्हणजे ते एक वर्ष वायडी पडत असतात.
मग अनेक वर्ष परीक्षा देऊनही विषय क्लिअर न झाल्याने बरेच विद्यार्थी डिप्लोमा सोडुन आर्ट्स वगैरेला अॅडमिशन घेत असतात.
ज्या विद्यार्थ्यांना सर्व सत्रात चांगले गुण मिळाले आहे जे विद्यार्थी थेअरी सोबत टेक्नीकल प्रॅक्टीकल नाॅलेज देखील प्राप्त करत असतील अशा विद्यार्थ्यांना डिप्लोमा मध्ये भरपुर करीअरची संधी आहे.
अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही खाजगी तसेच एम एनसी कंपनी मध्ये हमखास जाॅब लागु शकतो.पण जे विद्यार्थी कुठलेही प्रॅक्टिकल टेक्नीकल नाॅलेज प्राप्त न करता फक्त नावापुरता सर्टिफिकेट मिळविण्यासाठी डिप्लोमा केला तर यात आपणास कुठलाही स्कोप नाही.
डिप्लोमा झाल्यावर खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरी मिळु शकते का?
ज्या विद्यार्थ्यांला आपल्या क्षेत्राचे टेक्नीकल प्रॅक्टीकल नाॅलेज असेल अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एम एनसी कंपनी,खाजगी कंपन्या, वेगवेगळ्या पीएसयु पंचरत्न महारत्न नवरत्न अशा विविध कंपनीं मध्ये तसेच सरकारी क्षेत्रात देखील जाॅब भेटु शकतो.
डिप्लोमा मध्ये किती फी लागेल?
सरकारी काॅलेज मध्ये अॅडमिशन घेतल्यास कमी पैशात आपला डिप्लोमा कोर्स पुर्ण होऊन जाईल पण त्यासाठी आपल्याला दहावी मध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे.
पण खाजगी महाविद्यालयात अॅडमिशन घेतल्यास ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना ३० ते ४० हजार अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना २० ते २२ हजार इतका खर्च लागेल.
डिप्लोमाच्या अॅडमिशनला दहावीचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनी सुरूवात होते.