राजमुद्रा म्हणजे काय? Rajmudra meaning in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ही स्वराज्याचा जणु एक अलंकारच आहे. हया राजमुद्रा वर लिहिण्यात आलेल्या दोन ओळी समस्त स्वराज्याच्या उदयाची कथा तसेच स्वराज्याचे उद्दिष्ट सांगुन जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवर लिहिण्यात आलेल्या दोन ओळी अत्यंत अर्थपूर्ण आणि गांभीर्याने लिहिण्यात आलेल्या आहेत.
ह्या दोन ओळींसाठी आजवर कित्येक मावळ्यांनी आपले प्राण देखील गमावले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा हा त्यांचा एक अधिकृत शिक्का आहे.ही राजमुद्रा त्यांच्या सर्व अधिकृत आदेश तसेच पत्रांवर वापरली जायची.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा –
“प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णु विश्ववंन्दिता ।।
शाहसुनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अर्थ –
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जात असतो.अणि संपुर्ण जगात वंदनीय होतो.एकदम त्याचप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी महाराज यांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल.
अणि ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
प्रति पदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी अणि जगात सर्वांनी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी महाराज यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर अमावस्येच्या रात्री पासुन पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत जसा चंद्राचा आकार वाढत जात असतो एकदम त्याचप्रमाणे शिवरायांचे स्वराज्य देखील वाढेल.
अणि भविष्यात ह्या राजमुद्रेचा लौकिक होऊन ह्या राजमुद्रेची समस्त जग करेल ह्या राजमुद्रेचा चमक लोकांच्या कल्याणासाठी अणि हितासाठी असेल.
राजमुद्रा म्हणजे काय?
एखाद्या दस्त ऐवजाचा अधिकृत पणा दर्शवणारे राजचिन्ह यालाच राजमुद्रा असे म्हटले जाते.
छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रेवरील ओळी –
छत्रपती शिवाजी महाराज यांची जशी स्वतंत्र राजमुद्रा होती तशीच संभाजी महाराज यांची देखील एक स्वतंत्र राजमुद्रा आहे.
१६ जानेवारी १६८१ रोजी शंभु राजे यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता.छत्रपती झाल्यावर संभाजी महाराज यांनी स्वताची राजमुद्रा तयार केली.
ही राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे हिचा आकार पिंपळाच्या पानाप्रमाणे आहे.
श्री शंभो:शिवजातस्य
मुद्रा द्रौरिव राजते ।
यदंकसेविनी लेखा
वर्तते कस्यो न परी ।
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अर्थ –
शंभो श्री शिव पुत्र यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे.ही राजमुद्रा जणु काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे.
ह्या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक व्यक्ती संभाजी महाराज यांच्या आश्रय तसेच छत्रछायेखाली असेल.छत्रपतींच्या ह्या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.