तलाठी भरती 2023 साठी टीसीएस पॅटर्नची काही महत्वाची पुस्तके TCS pattern talathi bharti 2023 book list in Marathi
तलाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २६ जुन २०२३ पासुन सुरु होत आहे.
आज बाजारात तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
पण वेळेच्या अभावामुळे आपण ती सर्व पुस्तके वाचु शकत नसतो अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की तलाठी भरतीसाठी अशी कोणकोणती महत्वाची पुस्तके आहेत.जी वाचुन आपण तलाठी भरती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.
आजच्या लेखात आपण तलाठी भरतीसाठी अभ्यासावयाची काही महत्वाची पुस्तके कोणकोणती आहेत हे जाणुन घेणार आहोत
अणि तलाठी भरतीसाठी विपुल प्रमाणात शिफारस करण्यात येणारी पुस्तके कोणकोणती आहेत हे देखील बघणार आहोत.
१)मराठी व्याकरण –
मराठी व्याकरणासाठी मो.रा वाळंबे यांचे सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक आपण अभ्यासु शकतात.
तसेच मागील वर्षीच्या जुन्या प्रश्न पत्रिकांचा सराव करण्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे यांचे परिपुर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक देखील अभ्यासु शकतो.
२) इंग्रजी व्याकरण –
इंग्रजी व्याकरणासाठी आपण पाॅल अणि सुरी हे पुस्तक रिफर करू शकता.तसेच बाळासाहेब शिंदे यांचे संपुर्ण इंग्रजी व्याकरण हे पुस्तक देखील आपण अभ्यासु शकतो.
तसेच एसपी बक्षी सरांचे वस्तुनिष्ठ सामान्य इंग्रजी हे पुस्तक देखील आपण अभ्यासु शकतात.याचसोबत एम जे शेख सरांचे टीसीएस आयबीपीएस समाविष्ट असलेले पुस्तक अणि सचिन जाधवर सरांचे पुस्तक देखील आपण वाचु शकता.
३) जनरल नॉलेज करीता –
जनरल नॉलेज करीता आपण एकनाथ तात्या पाटील यांचा ठोकळा वाचायला हवा.अणि आतापर्यंत वाचलेली सर्व महत्वाची जनरल नॉलेज मधील पुस्तके पुन्हा एकदा वाचु शकतात.
४) अंकगणित बुद्धीमत्ता –
अंकगणित अणि बुदधीमत्तेसाठी मराठीमध्ये कोकिळा पब्लिकेशनचे पुस्तक आपण वाचु शकतात.याचसोबत आर एस अग्रवाल सर यांचे पुस्तक वाचू शकता.
बुदधीमत्तेसाठी सचिन ढवळे सर अणि अंकगणितासाठी आपण पंढरीनाथ राणे तसेच अनिल अंकलगी सरांचे पुस्तक देखील अभ्यासु शकतात.
५) चालु घडामोडी –
चालु घडामोडी करीता आपण सिंपलीफाईड किंवा परिक्रमा या दोघांपैकी कुठलेही एक पुस्तक वाचु शकतो.
TCS pattern मधील प्रश्नांसाठी अभ्यासावयाची पुस्तके –
टीसीएस पॅटर्न मधील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी खालील दिलेल्या दोन पुस्तकांपैकी कुठलेही एक पुस्तक विकत घ्यायला हवे.
१)बी पब्लिकेशनचे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मधील प्रश्नपत्रिका वर्गीकरण अणि विश्लेषण.
२)स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मधील ३९ प्रश्नपत्रिका विश्लेषण
याचसोबत टीसीएस पॅटर्न मधील उपलब्ध जुन्या प्रश्नपत्रिकांचा आढावा देखील आपण घेऊ शकतात.