इथिकल हॅकर म्हणजे काय?इथिकल हॅकर कसे बनावे?how to become ethical hacker in Marathi

इथिकल हॅकर म्हणजे काय?इथिकल हॅकर कसे बनावे?how to become ethical hacker in Marathi

इथिकल हॅकर हा सुद्धा एक हॅकरच असतो.पण इथिकल हॅकर हा आपल्या सिस्टमध्ये आपल्या नकळत प्रवेश करत डेटाची चोरी वगैरे करत नाही.

आपल्या डेटाला हॅक देखील करत नाही उलट आपल्या सिस्टमला अधिक सिक्युअर करण्यासाठी तो आपली मदत करत असतो.

इथिकल हॅकर हा आपल्या सिस्टमध्ये कोणकोणत्या कमतरता आहे कोणते ईरर आहे हे जाणुन घेण्यासाठी आपल्या परवानगीने आपल्या सिस्टम मध्ये प्रवेश करत असतो.

अणि आपल्या सिस्टम मध्ये कोणत्या ठिकाणाहून हॅकर प्रवेश करू शकतो हे जाणुन घेतात अणि सिस्टमला अधिक मजबूत करण्यासाठी आपले साहाय्य करीत असतात.

आज बाजारात अशा अनेक कंपन्या उपलब्ध आहेत ज्या आपल्या सिस्टमला हॅकर्स पासुन प्रोटेक्ट करण्यासाठी इथिकल हॅकरची मदत घेत असतात.जेणेकरून त्यांच्या कंपनीचा डेटा इनफरमेशन सिक्युअर राहील तो कुठेही लीक होणार नाही.

आपल्याला देखील इथिकल हॅकर बनायचे असेल तर आपल्याजवळ इथिकल हॅकर म्हणुन करीअर करण्यासाठी उत्तम संधी आहे.

इथिकल हॅकिंग हे एक बाजारात उपलब्ध असलेले,सर्वाधिक मागणी असलेले,स्कोप असलेले करिअरचे आॅप्शन आहे.

टेक्नॉलॉजी अणि कंप्युटरची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक बेस्ट करीअर आॅप्शन ठरू शकते.

सध्या जागोजागी सिस्टम हॅक करण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने सिस्टमला हॅकर्स पासुन सुरक्षित ठेवण्यासाठी इथिकल हॅकर्सची डिमांड दिवसेंदिवस वाढताना दिसुन येत आहे.

See also  डिप्लोमा इन फायर ऐन्ड सेफ्टी मॅनेजमेंट विषयी माहिती fire and safety management diploma course in Marathi

आजच्या लेखात आपण इथिकल हॅकर म्हणजे काय? इथिकल हॅकरचे काम काय असते? इथिकल हॅकर बनण्यासाठी काय करायला हवे इत्यादी सर्व बाबींची माहिती जाणून घेणार आहोत.

इथिकल हॅकर म्हणजे काय?इथिकल हॅकरचे काम काय असते?

how to become ethical hacker in Marathi
how to become ethical hacker in Marathi

इथिकल हॅकर हा एक लीगल पद्धतीने काम करणारा हॅकर असतो.हा सर्वप्रथम आपली परवानगी घेतो मग आपल्या सिस्टमला हॅक करत असतो.

आपली सिस्टम केल्यानंतर आपल्या सिस्टम मध्ये हॅकर कुठून प्रवेश करू शकतात हे जाणुन घेण्यासाठी तो काही टेस्टिंग करत असतो.

ह्या टेस्टिंग दरम्यान आपल्या सिस्टम मध्ये कोणकोणत्या ठिकाणी बग्ज तसेच ईरर आहेत जिथुन हॅकरला सिस्टम मध्ये प्रवेश करता येईल हे तो जाणुन घेतो.अणि आपल्याला कळवत असतो.यानंतर आपल्याला आपल्या सिस्टम मधील सर्व कमकुवतपणा भरून काढता येतो.

याने आपले सिस्टम अणि सिस्टम मध्ये असलेला डेटा हॅकर्स पासुन नेहमी सुरक्षित राहतो.आज अनेक मोठमोठ्या दिग्दज कंपन्या आपल्या सिस्टमला हॅकर्स पासुन सुरक्षित ठेवण्यासाठी इथिकल हॅकर्सची मदत घेत असतात.

याबदल्यात इथिकल हॅकर्सला लाखो रुपये देण्यासाठी देखील मोठमोठ्या दिग्दज कंपन्या तयार असतात.

इथिकल हॅकरला कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे?

इथिकल हॅकर बनण्यासाठी आपल्याला इंटरनेट अणि कंप्युटरचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.ह्या क्षेत्रातील नवनवीन अपडेटसची तसेच टेक्नीकल बाबींची आपणास माहीती असायला हवी.

इथिकल हॅकर्सला हॅकर्स प्रमाणे देखील विचार करता येणे आवश्यक आहे.जेणेकरून हॅकर्स कुठुन सिस्टम मध्ये प्रवेश करू शकतो हे जाणुन घेण्यास त्याला मदत होईल.अणि तो सिस्टम मधील त्या कमकुवत पार्टला त्रुटींना भरून काढुन अधिक मजबूत करू शकेल.

इथिकल हॅकर्सला वेगवेगळ्या कंप्युटर प्रोग्रामिंगचे प्रोग्रामिंग लँग्वेजचे उत्तम नाॅलेज असायला हवे.याचसोबत त्याला लिनक्स विंडोज इत्यादी सारख्या वेगवेगळ्या आॅपरेटिंग सिस्टीमचे देखील उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे.

नेटवर्क मध्ये असलेल्या समस्या दुर करण्याची क्षमता आपल्यात असणे आवश्यक आहे.

इथिकल हॅकर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची अट काय असते?

इथिकल हॅकर बनण्यासाठी इथिकल हॅकिंगच्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी इथिकल हॅकिंगचा डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स करावा लागतो.

See also  भारतीय खाण ब्युरो नागपुर येथे कार्यालय अधिक्षक तसेच लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी भरती सुरू - IBM Nagpur Recruitment 2023 In Marathi

ह्या कोर्सला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपले कुठल्याही एका शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.पण काही संस्थेत बारावी उत्तीर्ण असल्यास देखील ह्या कोर्ससाठी प्रवेश प्राप्त होत असतो.

आयटी कंप्युटर मध्ये पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना ह्या क्षेत्रात विशेष प्राधान्य दिले जात असते म्हणून जर आपण बीसीए,बीटेक,बी एससी,बीई केलेले असेल तर आपल्यासाठी अधिक उत्तम ठरते.

इथिकल हॅकर बनण्यासाठी कोणता सर्टिफिकेट कोर्स करावा लागतो?

खुप कंपन्या इथिकल हॅकर म्हणून आपल्या कंपनीत जाॅब देण्यासाठी इथिकल हॅकिंग सर्टिफिकेशनची मागणी करत असतात कारण कुठलाही प्रोजेक्ट हातात घेत असताना आपल्या कंपनीत एकुण किती सर्टिफाईड इथिकल हॅकर उपलब्ध आहेत हे त्यांना दाखवणे आवश्यक असते.

सर्टिफाईड इथिकल हॅकर बनण्यासाठी आपणास eccouncil.org दवारे घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.यानंतर आपणास certified ethical hacker म्हणुन एक सर्टिफिकेट दिले जाते.

यानंतर आपण कुठल्याही कंपनीत सर्टिफाईड इथिकल हॅकर म्हणून काम करू शकतात.

उत्तम इथिकल हॅकर बनण्यासाठी इथिकल हॅकिंगचा डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स करण्यासोबत आपल्याला ह्या क्षेत्राचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे.कारण नाॅलेज अणि अनुभवाच्या जोरावरच आपण ह्या क्षेत्रात उच्चतम करीअर करू शकतो.

इथिकल हॅकिंगचा डिप्लोमा -नोकरीची संधी

इथिकल हॅकिंगचा डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स केल्यावर कोणकोणत्या क्षेत्रात आपणास नोकरीची संधी उपलब्ध होते?

इथिकल हॅकिंगचा डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स पुर्ण केल्यानंतर आपण पुढील काही क्षेत्रात काम करू शकतो.

1) वेगवेगळ्या खाजगी कंपन्या करीता इथिकल हॅकर बनुन आपण काम करू शकतो.

2)तसेच पोलिस दल,लष्कर,गुप्तचर तसेच फाॅरेनसिक विभागात देखील आपण इथिकल हॅकर म्हणून काम करू शकतो.

भारतात इथिकल हॅकर्सला साधारणतः किती वेतन दिले जाते?

भारतात इथिकल हॅकर्सला सुरूवातीला ३ लाख ते ४ लाख इतके मासिक वेतन दिले जाते.आपल्या अंगी असलेल्या नाॅलेज अणि कला कौशल्य यानुसार यात १५ लाख ते २० लाखापर्यंत इतकी कालांतराने अधिक वाढ केली जाते.

See also  महाराष्ट्र सरकार देत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ५१ हजार रुपये - Swadhar Yojana In Marathi

Leave a Comment