सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय?सायबर सिक्युरिटी एक्सपर्टचे काम काय असते?सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कसे बनावे?how to become cyber security experts in Marathi

Table of Contents

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय?-How to become cyber security experts in Marathi

आज इंटरनेटच्या जगतात हॅकिंग डेटा चोरी करणे लीक करणे यासारखे कृत्ये सरार्सपणे घडताना आपणास दिसून येत आहे.

मागच्या वेळी आपण टिव्हीवर न्युज मध्ये एक बातमी वाचली होती ज्यात असे दिले होते की

कोरोनाची लस घेण्यासाठी कोवॅक्सीन पोर्टलवर नागरीकांनी आॅनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आपली जी माहिती आधार कार्ड,पॅन कार्ड,मतदान कार्ड, पासपोर्ट नंबर इत्यादी जी काही माहिती भरली होती ती टेलिग्रामवर लीक करण्यात आली आहे.

तेव्हा आपणास डेटाची सुरक्षा सायबर सिक्युरिटी किती महत्वाची आहे डेटा सुरक्षा आवश्यकता का आहे हे लक्षात आले.

अणि हाच एक प्रकार नव्हे तर नेहमी हॅकर्स कडुन कुठल्या ना कुठल्या दिग्दज कंपनीचा सिस्टमचा डेटा हॅक करण्यात आला असे आपणास सोशल मिडियावर देखील ऐकु येत असते.

ह्या वाढत्या हॅकिंगच्या,सिस्टममधील डेटा चोरीच्या,डेटा लीकच्या घटनांमुळे सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची मागणी अणि गरज दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.

अशा परिस्थितीत सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनणे हे आपल्यासाठी करीअरचे एक उत्तम आॅप्शन ठरू शकते.

आजच्या लेखात आपण सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कसे बनायचे या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

See also  भारतीय तटरक्षक दलात २५५ जागांसाठी भरती सुरू - Indian Cost Guard Recruitment 2023 In Marathi

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय?

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय?

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट यालाच आपण मराठीत सायबर सुरक्षा तज्ञ असे म्हणतो.हा एक सायबर सुरक्षा तज्ञ असतो जो सिस्टमची नेटवर्कची काळजी घेण्याचे त्याची सुरक्षा करण्याचे काम करतो.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्टचे काम काय असते?

सिस्टम मध्ये स्टोअर असलेला,सेव्ह असलेला कंपनीचा गोपनीय डेटा,फाईल्स महत्वाचे डाॅक्युमेंट तसेच इतर कुठलीही माहिती याला हॅकर्सपासुन सुरक्षित ठेवण्याचे,वाचवण्याचे काम सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट करीत असतात.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट हे कुठल्याही हार्डवेअर तसेच साॅफ्टवेअर मध्ये असलेले बग्ज,ईरर कमजोरी शोधुन काढत असतात आणि ते ईरर बग्ज कमजोरी दूर करण्याचे काम करत असतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपल्या सिस्टमला तसेच सिस्टम मधील डेटाला हॅकर्स पासुन सुरक्षित ठेवण्याचे काम हे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट करीत असतात.

इंटरनेटवर होत असलेल्या सायबर क्राईमला सायबर हल्ले यांना आळा घालण्यासाठी आज सायबर एक्सपर्टची नितांत आवश्यकता आहे.

सायबर एक्सपर्टचे प्रकार किती अणि कोणकोणते आहेत?

१) इथिकल हॅकर –

इथिकल हॅकर हा एक प्रोफेशनल अणि सर्टिफाईड सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतो जो सिस्टम मधील डेटा फाईल्स यांना हॅकर्सपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी सिस्टम मध्ये असलेले बग्ज ईरर प्राॅब्लेम कमजोरी टेस्टिंग दवारे शोधुन काढत असतो.अणि मग हे सर्व बग्ज ईरर प्राॅब्लेम दुर करत असतो.

इथिकल हॅकर हा त्याला अवगत असलेल्या हॅकिंगच्या नाॅलेजचा वापर लीगल पद्धतीने सिस्टमला अधिक मजबूत करण्यासाठी करीत असतो.

२) सायबर इनफरमेशन सिक्युअर अॅनेलिस्ट –

सायबर इनफरमेशन सिक्युरीटी अॅनॅलिस्ट याचे मुख्य काम कुठल्याही सिस्टम मधील सुरक्षेत असलेले धोके सर्वप्रथम शोधुन काढणे अणि मग ते विश्लेषण करून नीट व्यवस्थित समजून घेणे हे असते.

३) कंप्युटर फाॅरेनसिक एक्सपर्ट-

कंप्युटर फाॅरेनसिक एक्सपर्ट हे गुन्हेगारी संबंधित डेटाला गोळा करतात,मग त्या गोळा केलेल्या डेटाचा योग्य तो अर्थ लावून त्याचे मुल्यांकन करतात.

कंप्युटर फाॅरेनसिक एक्सपर्ट हे सिस्टम मधील डिलीट झालेल्या डेटाला पुन्हा रिकव्हर करण्याचे काम करतात.

See also  जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू - State tb control centre Mumbai recruitment 2023 in Marathi

सायबर सिक्युरिटी मध्ये करीअर करण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?

  • समस्या सोडविण्याची कला कौशल्य
  • लवकर शिकण्याची कला कौशल्य
  • हॅकिंगचे उत्तम ज्ञान
  • टेक्निकल बाबींचे नाॅलेज
  • क्रिएटिव्हीटी
  • टेक्नॉलॉजीची आवड
  • इंटरनेट कंप्युटरचे वेगवेगळ्या आॅपरेटिंग सिस्टीमचे तसेच नेटवर्किंगचे नाॅलेज
  • इत्यादी,

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कसे बनायचे?

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनण्यासाठी सायबर सिक्युरिटी मध्ये आपणास एखादा डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स करावा लागतो.

पण सायबर सिक्युरिटी संबंधित सर्टिफिकेट कोर्सला डिप्लोमाला प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपले कुठल्याही एका शाखेतून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.यानंतर आपण मास्टरची डिग्री देखील प्राप्त करू शकतो.

काही संस्थेत बारावी उत्तीर्ण असल्यास देखील ह्या कोर्ससाठी प्रवेश प्राप्त होत असतो.

आयटी कंप्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना ह्या क्षेत्रात विशेष प्राधान्य दिले जात असते म्हणून जर आपण बीसीए,बीटेक,बी एससी,बीई केलेले असेल तर आपल्यासाठी अधिक उत्तम ठरते.

आयटी कंप्युटर सायन्स क्षेत्रामधील मास्टर डिग्री –

१) मास्टर आॅफ कंप्युटर अॅप्लीकेशन

२) एम टेक इन इनफरमेशन टेक्नॉलॉजी किंवा एम टेक इन सायबर सिक्युरिटी

३) एम ई इन इनफरमेशन टेक्नॉलॉजी

इत्यादी.

१२ वी नंतर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनण्यासाठी सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणते बॅचलर डिग्री कोर्स आपण करू शकतो?

जर आपणास १२ वी नंतर सायबर सिक्युरिटी मध्ये करीअर करायचे असेल तर आपण पुढील दिलेले काही बॅचलर डिग्री कोर्स करू शकतात.

बॅचलर डिग्री कोर्स –

१)बी ई इन सायबर सिक्युरिटी

२) बीएससी इन सायबर सिक्युरिटी

३) बीसीए इन सायबर सिक्युरिटी किंवा बीसीए इन क्लाऊड अॅण्ड सिक्युरीटी

४) बीटेक सीएसई नेटवर्किंग अॅण्ड सायबर सिक्युरिटी

५) बीटेक इन कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

६) बॅचलर ऑफ सायबर एक्सपर्ट –

बॅचलर डिग्री नंतर मास्टर डिग्री प्राप्त करण्यासाठी करावयाचे मास्टर डिग्री कोर्स खालील प्रमाणे आहेत –

मास्टर डिग्री कोर्स –

See also  रानभाज्या महोत्सव महाराष्ट्र कृषि विभाग -2020

१) पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायबर सिक्युरिटी

२)एम एस सी इन सायबर सिक्युरिटी

३) एम टेक इन सायबर सिक्युरिटी

४) एम सी ए इन सायबर सिक्युरिटी

ह्याच सोबत बारावी नंतर वरील कोर्स व्यतिरिक्त आपण सायबर सिक्युरिटी मध्ये एखादा डिप्लोमा यानंतर पीजी डिप्लोमा करू शकतो किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स देखील देखील करू शकतो.

सायबर एक्सपर्ट डिप्लोमा,सर्टिफिकेट कोर्स –

१) डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी -हया कोर्सचा कालावधी सहा महिने इतका आहे.

२)पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी

सायबर सिक्युरिटी कोर्स प्रदान करत असलेल्या भारतातील नामांकित संस्था –

१)आय आयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) दिल्ली

२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर

३)कालीकट युनिव्हसिर्टी

४) आय आय बीएम इंस्टीटयुट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट

५) निमास क़लकत्ता तसेच इंडियन स्कूल ऑफ इथिकल हॅकिंग

६) हितम हैदराबाद

७) इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी,दिल्ली

सायबर सिक्युरिटी कोर्सची फी –

सायबर सिक्युरिटी कोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात तसेच संस्थेत वेगवेगळ्या पद्धतीने फी आकारली जाऊ शकते.

सायबर सिक्युरिटी मध्ये सर्टिफिकेट कोर्स करायचे म्हटले तर आपणास ४ ते १० लाखापर्यंत खर्च येऊ शकतो.

सायबर सिक्युरिटी मध्ये अंडर ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे म्हटले तर दीड ते तीन लाख अणि पोस्ट ग्रॅज्युएट करायचे म्हटले तर दीड लाख ते साडे तीन लाख इतका खर्च आपणास लागु शकतो.

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनल्यावर आपणास कोणकोणत्या पदावर नोकरी मिळु शकते?

सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनल्यावर आपणास कंपनीत तसेच एखाद्या शासकीय संस्थेत विविध पदांवर नोकरी प्राप्त होऊ शकते.

१)सायबर सिक्युरिटी अॅनॅलिस्ट

२) नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर

३) चीफ इनफरमेशन सिक्युरीटी आॅफिसर

४) सिक्युरीटी साॅफ्टवेअर डेव्हलपर

५) सिक्युरीटी अॅडमिनिस्ट्रेटर

इत्यादी

सायबर सिक्युरिटी एक्सपर्टचे वेतन किती असते?

सायबर सिक्युरिटी एक्सपर्टला सुरूवातीला ८० हजार ते १ लाख इतकी मंथली सॅलरी मिळते कामातील अनुभव कला कौशल्य यानुसार यात कालांतराने अधिक वाढ केली जाते.