आज एकता कपुर यांचा वाढदिवस – Ekta Kapoor Birthday in Marathi

आज एकता कपुर यांचा वाढदिवस ekta kapoor birthday in Marathi

एकता कपूर ह्या सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र ह्यांच्या कन्या तसेच बाॅलिवुड अभिनेता तुषार कपुरच्या बहिण आहेत.याचसोबत एकता कपूर ह्या बालाजी टेलिफिल्मसच्या कार्यकारी प्रमुख देखील आहेत.

Ekta Kapoor Birthday

याचसोबत एकता कपूर प्रसिद्ध भारतीय दुरदर्शन निर्माता फिल्म प्रोडयुसर अणि डायरेक्टर देखील आहेत.

क्योकी सास भी कभी बहू थी ही मालिका त्यांची सर्वात प्रसिद्ध मालिका म्हणून ओळखली जाते.ही मालिका स्टार प्लस ह्या टिव्ही चॅनलवर प्रदर्शित करण्यात आली होती.

एकता कपूर यांचा जन्म ७ जुन १९७५ रोजी मुंबई येथे झाला होता.२०२३ मध्ये एकता कपूर ४८ वर्षाच्या पुर्ण झाल्या आहेत.

एकता कपुर यांना आपण एक छोट्याशा पडद्यावरील क्वीन म्हणून ओळखले जाते.एकता कपूर हिने आतापर्यंत अनेक मालिकांची निर्मिती केली आहे अणि त्या हिट देखील झाल्या आहेत.

एकता कपूर हिने निर्माण केलेल्या काही मालिका संपुन जवळपास पंधरा वर्षे झाली आहेत.तरी देखील आज सुद्धा ह्या मालिकेतील पात्र रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले आहेत.

एकता कपूर हिने तिच्या करिअरला आरंभ १९९५ मध्ये केला होता.सुरूवातीला अनेकदा एकता कपूर हिला अपयश हाती आले पण नंतर तिच्या निर्माण केलेल्या मालिका चांगल्याच गाजल्या.

क्योकी सास भी कभी बहू थी,कहाणी घर घर की, कसोटी जिंदगी की ह्या एकता कपूरच्या स्टार प्लस वरील गाजलेल्या काही प्रसिद्ध मालिका आहेत.

याचसोबत एकता कपूर हिने निर्माण केलेल्या नागीन,हम पाच ह्या मालिकाही फार प्रसिद्धी पावताना दिसुन आल्या.

एकता कपूर हिने तिच्या बालाजी टेलिफिल्मसच्या अंतर्गत आतापर्यंत १३० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती केली आहे.

एकता कपूर हिने अजुनही लग्न का केले नाहीये?

आपल्यातील खुप जणांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की एकता कपूरचे वय ४८ झालेले आहे तरी देखील अद्याप तिने विवाह का केला नाही ती अजुनही अविवाहित का आहे?

See also  पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रांचा साठा चीनने केली भारतापेक्षा अधिक अणुबॉम्बची निर्मिती -- SIPRI 2023 Report in Marathi

वीरे दी वेडिंग ह्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जेव्हा एकता कपूर हिला ती लग्न कधी करणार आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा एकताने गंमतीशीर पद्धतीने ह्या प्रश्नाचे उत्तर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिले होते.

एकता म्हणाली होती की सलमान खान याच्या लग्नानंतर दोन वर्षांनी मी लग्न करणार आहे.

याचसोबत एकता कपूर हिने लग्न न करण्यासाठी वडिलांनी ठेवलेली अट देखील कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.

एकदा आपल्या लग्नाविषयी विचारणा केली गेल्यावर एकता कपूर हिने सांगितले होते की तिचे वडील जितेंद्र ह्यांनी तिच्या समोर अट ठेवली होती की लग्न कर किंवा काम कर तेव्हा एकताला लग्न करायचे नसल्याने तिने दोघांमध्ये कामाची निवड केली.

याचसोबत एका मुलाखतीत एकता कपूर असे देखील म्हणाल्या होत्या की त्यांच्या ज्या मित्र मैत्रिणींनी विवाह केला होता आज त्यांना योग्य जोडीदार न भेटल्याने सिंगल जीवन जगावे लागते आहे त्यांचा घटस्फोट झाला आहे ज्यामुळे आज ते सिंगल राहु राहीले.

म्हणुन एकता कपूर त्यांच्यासाठी त्यांना समजुन घेईल ज्याच्याशी त्यांचे नाते मनापासून जुळेल अशा योग्य त्या जोडीदाराची वाट पाहत आहे.

एकता कपूर यांचा ज्योतिष शास्त्रावर अत्यंत विश्वास आहे.ज्योतिषींनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी आपल्या सर्व मालिकांच्या नावाची सुरूवात क ह्या अक्षरापासुन केली असल्याचे आपणास दिसून येते.

Leave a Comment