बाल शिवाजी चित्रपटात आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका – AKASH THOSAR TO PORTRAY BAL SHIVAJI

बाल शिवाजी – आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका – AKASH THOSAR TO PORTRAY ‘BAL SHIVAJI’

बाल शिवाजी चित्रपटात आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका

आज ६ जुन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे.ह्या सोहळ्या निमित्त काही मराठी चित्रपटांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

ज्यात बाल शिवाजी ह्या चित्रपटाचे नाव देखील देण्यात आले आहे.

बाल शिवाजी ह्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सैराट चित्रपटातील परशया म्हणजेच मराठी अभिनेता आकाश ठोसर पडद्यावर दिसुन येणार आहे.

बाल शिवाजी ह्या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित केले गेले आहे.ज्यात आकाश ठोसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लुक मध्ये आपणास दिसून येत आहे.

बाल शिवाजी चित्रपटात आकाश ठोसर साकारणार शिवाजी महाराजांची भुमिका - AKASH THOSAR TO PORTRAY ‘BAL SHIVAJI’

आकाश ठोसर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हे पोस्टर रसिक प्रेक्षकांसोबत शेअर देखील केले आहे.पोस्टर मध्ये आकाश शिवाजी महाराज यांच्या लुकमध्ये पुर्णपणे दिसुन येत आहे.

पोस्टर मध्ये आकाशच्या हातामध्ये एक तलवार दाखवली आहे.त्याच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ अणि कपाळावर चंद्रकोर अणि भेदक अशी नजर असलेले चित्र दिसुन येत आहे.

आकाशने ह्या बाल शिवाजी चित्रपटाच्या पोस्टरला स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा असे कॅपशन देत आकाशने हे पोस्टर आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वर शेअर केले आहे.

आकाशच्या चाहत्यांनी रसिक प्रेक्षकांनी आकाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केलेल्या पोस्टरवर लाईक अणि कमेंट्सचा जणु पाऊसच पाडायला सुरुवात केली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते कलाकार यांनी आकाशला त्याच्या नवीन भुमिकेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

बालशिवाजी ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठे बिग बजेट ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

बालशिवाजी ह्या चित्रपटात आपणास छत्रपती शिवाजी महाराज १२ ते १६ ह्या वयोगटात असताना त्यांच्या जीवनात काय काय घडले?कोणत्या रंजक गोष्टी त्यांच्या जीवनात घडुन आल्या हे पाहायला मिळेल.

तसेच माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जगातील सर्वात धाडसी शौर्य पराक्रमी राजा कसे बनवले हे देखील ह्या चित्रपटात आपणास पाहावयास मिळणार आहे.

See also  Espionage म्हणजे काय? What is Espionage

बालपणापासूनच एक कुशल योद्धा तसेच शासक म्हणून शिवाजी महाराज यांची जडणघडण कशी झाली हे ह्या चित्रपटात दाखवले जाणार आहे.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर ही कथा एका आईची अणि मुलाची आहे.शिवरायांचा बालपणीचा काळ बालपणीचे शिवाजी ह्या चित्रपटात दाखवले जाणार आहे.

बालशिवाजी ह्या चित्रपटाबाबत सांगतांना चित्रपट निर्माता संदीप सिंग असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना आज सर्व जग ओळखते.

पण त्यांच्या बालपणीच्या घडलेल्या घटना प्रसंग रंजक गोष्टी ह्या सर्वांबाबद आपणास पाहीजे तशी फारशी माहिती नाही.आपण आजही त्यापासून अनभिज्ञ आहोत.हया सर्व गोष्टी आपणास ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

बाल शिवाजी ह्या चित्रपटाच्या कथेचे लेखन रवी जाधव अणि चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.हया चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग,रवी जाधव, अभिषेक व्यास,विशाल गुरनानी,सॅम खान अणि जुही पारेख मेहता ह्या सर्वांनी केली आहे.

दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असणार आहे.

चित्रपटात शिवाजी महाराज यांची भुमिका साकारण्यासाठी आकाश ठोसर याची एकमताने निवड करण्यात आली आहे.आकाश ठोसरच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.