अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना २०२३ विषयी माहिती Annasaheb Patil Aarthik Vikas Mahamandal Loan Scheme २०२३ information in Marathi
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?
ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे जिच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरूण वर्गास स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असते.
ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित कुशल तरुण वर्गास स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता
किंवा आधीपासून सुरू असलेल्या आपल्या व्यवसाय उद्योगात अधिक वाढ घडवून आणण्यासाठी आपल्या उद्योग व्यवसायाचा अधिक विस्तार विकास करण्यासाठी १० ते १५ लाख इतके बिनव्याजी कर्ज देण्यास येते.
हया घेतलेल्या कर्जाचे व्याज तरूणांना भरावे लागत नसते हे व्याज महामंडळ स्वता फेडत असते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना का करण्यात आली होती?
आपल्या महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडुन यावा यासाठी म्हणुन राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापित केले होते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही कौशल्य विभाग अणि उद्योजकता विकास विभागाच्या वतीने राबविली जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना का सुरू करण्यात आली होती?
आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना काम रोजगार प्राप्त व्हावे,त्यांना व्यवसायात भरारी घेत यश प्राप्त व्हावे,अणि उद्योग क्षेत्रात आपल्या महाराष्ट्र राज्याचा जास्तीत जास्त विकास घडुन यावा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेस आरंभ करण्यात आला होता.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील कुशल तरूण बेरोजगार तरुणांना आपला स्वताचा उद्योग व्यवसाय रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे हा मुख्य हेतु अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा आहे.
आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या तरूण बेरोजगार तरुणांना स्वताचा उद्योग व्यवसाय व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणे त्यांना उद्योग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अधिक प्रोत्साहन देणे.
तरूण कुशल बेरोजगार वर्गासाठी महाराष्ट्र राज्यात रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे.
आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या बेरोजगार तरुणांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने हे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असलेले तरूण बेरोजगार
किंवा सुरू असलेल्या व्यवसायात अधिक वाढ विस्तार विकास घडवून आणु इच्छित असलेले व्यक्ती देखील घेऊ शकतात.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी आपणास आॅनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे.
ह्या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज प्राप्त करण्यासाठी आपणास महास्वयंम ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आॅनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे?
- ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाण रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल
- व्याज परतावा प्राप्त करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
- उद्योग व्यवसाय सुरू करत असल्याचा परवाना
- बॅकेने दिलेले कर्ज मंजुरी पत्र अणि स्टेटमेंट
- व्यवसायाचा प्रकल्प फोटो अणि अहवाल
बॅकेतुन कर्ज घेताना लागणारी कागदपत्रे –
- लाईट बील
- आधार कार्ड
- बॅक अकाऊंट स्टेटमेंट
- राशन कार्ड
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय प्रशिक्षण सर्टिफिकेट
- उद्योग सुरू करण्याचे लायसन्स
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी अणि नियम काय आहेत?
- ह्या योजनेअंतर्गत एक व्यक्ती एकाचवेळी लाभ प्राप्त करू शकते.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीने याआधी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ मुख्यत्वे मराठा समाजातील सुशिक्षित कुशल तरुण बेरोजगार स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी घेऊ शकतात.याचसोबत
याचसोबत अशा जाती ज्यांच्या करीता कुठलेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीतील व्यक्ती देखील ह्या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदार १८ ते ४५ वयोगटातील असणे गरजेचे आहे.पुरूष अणि महिला वर्ग दोघे पात्र ठरतील योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुरूषांचे वय जास्तीत जास्त ५० असायला हवे अणि महिलांचे वय जास्तीत जास्त ५५ असायला हवे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपले वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असावे यापेक्षा अधिक असु नये.
ज्यांचे आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना ह्या योजनेअंतर्गत १० लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.अणि कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले तर आपणास हप्त्याच्या कर्जाची रक्कम आपल्या बॅक खात्यात डिबीटी दवारे पाठवली जाते.
आपण घेतलेल्या कर्जाची रक्कम जास्त असल्यास जवळपास तीन लाखापर्यंत व्याज रक्कमेचा परतावा ह्या योजनेअंतर्गत आपणास प्राप्त होतो.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर लगेच आठवडाभरात आपल्या अर्जावर कारवाई केली जात असते.
ह्या योजनेचा लाभ घेऊन ज्यांनी स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे अशा लाभार्थी व्यक्तींनी सहा महिन्याच्या आत आपल्या उद्योग व्यवसायाचे दोन फोटो योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपलोड करायचे आहे.
अर्जदारास योजनेचा पहिला हप्ता अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येतो.पहिल्या हप्त्यामध्ये मुददल अणि व्याज देखील समाविष्ट असते.तीन लाखाच्या कर्ज योजनेवर यात १२ टक्के इतके व्याज देखील दिले जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांगांना चार टक्क्यांपर्यंत निधी प्रदान करण्यात येत असतो.
दिव्यांग व्यक्ती कर्जासाठी अर्ज करत असेल तर त्याने त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक असणार आहे.अक्षम मापदंड अंतर्गत अर्ज करत असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.
लाभार्थी व्यक्तीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड नाही केली तर त्याला व्याजाचा परतावा देण्यात येणार नाही.हया योजनेअंतर्गत सुरू केला जात असलेला व्यवसाय महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेत असल्यास कर्जफेडीचा ईएम आय प्रति महिना असेल.
अर्जदार व्यक्ती कुठल्याही बॅकेतील थकबाकीदार नसावी.अणि योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याने अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक पात्रता –
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने किमान आठवी इयत्ता उत्तीर्ण असावे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एकुण तीन योजना राबविण्यात येतात-
१)गट प्रकल्प कर्ज योजना
२) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
३) गट कर्ज व्याज परतावा योजना –
ह्या योजने अंतर्गत १० ते ५० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.कर्जाचा परतफेड कालावधी देखील पाच वर्षे इतका असतो.
ह्या योजने मार्फत आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकामधील उमेदवारांच्या सहकारी संस्थेला तसेच भागीदारी संस्थेला बचत गटाला,एल एलपी एलपीओ सारख्या शासनप्रणित संस्थाना देखील बॅंकेकडुन स्वयंरोजगार उद्योग व्यवसाय सुरू करायला कर्ज दिले जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही श्रेणीतील उमेदवारास कर्ज प्रदान केले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कुठल्याही शासकीय कार्यालयात जावे लागत नाही आपण घरबसल्या आॅनलाईन पदधतीने ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो.याने आपल्या वेळ अणि पैसा दोघांची बचत होते.
आपण योजनेसाठी केलेल्या अर्जाचे स्टेटस देखील मोबाईल दवारे घरबसल्या चेक करू शकतो.