नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आहेत – 10 Benefits of Dance in Marathi

नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आहेत -Benefits of dance in Marathi

आज आपण आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस निमित्ताने नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आपणास होत असतात हे जाणुन घेणार आहोत.

१) नृत्य करण्याचा पहिला फायदा हा आहे की नृत्य केल्याने आपली शरीराची चरबी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते.याने आपल्या शरीराचा लठ्ठपणा देखील कमी होण्यास मदत होते.

असे सांगितले जाते की रोज अर्धा तास नृत्य केल्याने आपल्या शरीरातील १५० कॅलरीज इतकी चरबी बर्न होत असते.

२) जी व्यक्ती नृत्य करते त्याचा मेंदु देखील नेहमी अॅक्टिव्ह राहत असतो.अशा व्यक्तींचा मेंदु इतर व्यक्तींपेक्षा अधिक जलदगतीने प्रतिक्रिया देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते.

Benefits of Dance in Marathi
Benefits of Dance in Marathi

३) संशोधनात असे आढळले आहे की जे व्यक्ती नृत्य करतात त्यांची स्मरणशक्ती देखील खुप उत्तम असते.ते कुठलीही गोष्ट लवकर विसरत नाहीत.

४) ज्या व्यक्तींना ताणतणाव चिंता डिप्रेशनची समस्या असेल अशा व्यक्तींनी नृत्य करायला हवे असे सांगितले जाते अनेक डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तींना डिप्रेशन मधुन बाहेर काढण्यासाठी डान्सचा एक थेरपी म्हणून देखील उपयोग केला गेला आहे.

नृत्य केल्याने आपल्या मनातील सर्व नकारात्मक भावना विचार नाहीसे होतात.

५) नृत्य केल्याने आपले शरीर अधिक भरभक्कम तसेच मजबुत बनण्यास मदत होते.नृत्य केल्याने आपल्या शरीराला एक लवचिकता देखील प्राप्त होत असते.

६) नृत्य केल्याने आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम होत असतो.

७) शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच हदयाशी संबंधित आजार दुर करण्यासाठी नृत्य हा एक उत्तम उपाय मानला जातो.

८) जी व्यक्ती नृत्य करते अशा व्यक्तीला नेहमी शरीरात उत्साह अणि उर्जा जाणवते अशी व्यक्ती लवकर थकत देखील नाही.अशा व्यक्तीचे शरीर दुपटीने वेगात कुठलेही काम करण्यास सक्षम असते.

९) नृत्य केल्याने आपली बाॅडी देखील शेप मध्ये राहत असते.

१०) नृत्य केल्याने चेहरया ग्लो येत असतो शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगली राहते.

See also  युकेजी अणि एलकेजी चा फुलफाँर्म - UKG and LKG full form in marathi

Leave a Comment